1 उत्तर
1
answers
एअरस्पेस म्हणजे काय?
3
Answer link
*_🙄हवेतले कोट्यावधी रुपये..एअरस्पेस म्हणजे काय असतं ?_*
_बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बंद असलेली हवाई हद्द पाकिस्तानने भारतासाठी मोकळी केल्याची कालची बातमी वाचली का ? या बातमीचा अर्थ 'हे शांततेसाठी उचललेले पाऊल आहे किंवा 'पाकिस्तान भारतासमोर नमले' असा आहे असं वाटत असेल तर तसं काही नाही !! ही तर पाकिस्तानची 'गरीबी हटाव' मोहीम आहे. सध्या पाकिस्तानला कडकी लागलीय. आई जेवायला घालीना, बाप भीक मागू देईना अशी पाकिस्तानची अवस्था आहे त्यातून या आकाशातून पडणाऱ्या फुकट खैरातीचा रस्ता पण बंद झाला होता.पण या आकाशातून पडणाऱ्या पैशाच्या पावसाबद्दल सामान्य माणसांना फारच कमी माहिती असते, म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एअरस्पेस हवाई नाक्याबद्दल !!_
*_🛫एअरस्पेस चार्जेस_*
जागा किंवा येण्याजाण्याचा रस्ता वापरल्याच्या बदल्यात भाडं देण्यासारखा हा प्रकार आहे. एखाद्या देशाच्या हद्दीतून जर विमान न्यायचं असेल तर त्या देशाला एक ठराविक रक्कम फी म्हणून द्यावी लागते. हवाई हद्द दोन प्रकारची असते एक हॉरीझाँटल म्हणजे आडवी तर दुसरी वर्टीकल म्हणजे उंची प्रमाणे. यापैकी आडव्या हवाई हद्दीचा अर्थ फक्त जमीनीपुरताच नाही, तर समुद्रातही एका ठराविक अंतरापर्यंत ही हद्द विस्तारीत असते. भारताच्या बाबतीत समुद्रात ‘१२ नॉटिकल मैल’ म्हणजे जवळजवळ २२ किलोमीटर पर्यंत भारताची हद्द ठरवली गेली आहे.हवाई हद्दीच्या बाबतीत प्रत्येक देशाचे स्वतःचे असे वेगळे कायदे आहेत. विमान कोणत्या प्रकारचं आहे, त्याचं वजन किती आहे आणि ते किती अंतर कापणार आहे यावरही फी ठरवली जाते. त्या खेरीज आलेले विमान त्या देशातल्या एखाद्या विमानतळावर उतरणार आहे की वरच्यावर कलटी मारून निघून जाणार आहे यावर हा आकार अवलंबून असतो.
◼लँडींग चार्जेस - विमानतळावर उतरण्याचे पैसे.
◼पार्कींग अॅन्ड हाउसिंग चार्जेस- काही तास विमान विमानतळाच्या जागेवर उभे ठेवण्यासाठी द्यायचा भार.
◼युजर डेवलपमेंट फी.
◼विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रवाशामागे 'डिपार्टींग पॅसेंजर फी'.
◼विमानात नव्याने बसणाऱ्या प्रवाशापोटी - 'एंबार्कींग फी'.
◼जर विमातळावर इंधन भरले तर फ्युएल थ्रूपुट चार्ज.
◼विमान न उतरता देशाच्या हद्दीतून वरचेवर निघून जाणार असेल तर 'रूट नॅव्हीगेशन फॅसीलीटी चार्जेस' (RNFC) भरावे लागतात.
*_📣पाकिस्तानला बसलेला फटका_*
बालाकोट स्फोटानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने भारताकडून येणाऱ्या विमानांसाठी आपली हद्द बंद केली. ही बंदी लवकरच उठवली जाणार होती, पण काल पर्यंत ही बंदी कायम होती. अखेर आज पाकिस्तानने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.यात खरं तर पाकिस्तानचंच नुकसान झालंय. फेब्रुवारीपासून पाकिस्तानने तब्बल १०० मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे ६,८७,३०,००,००० रुपये उत्पन्न गमावलं आहे. रोजच्या तब्बल ४०० उड्डाणे पाकिस्तानच्या हद्दीतून जायची ती फेब्रुवारीनंतर अन्य मार्गाने वळवण्यात आली.एकट्या बोईंग ७३७ साठी भारताकडून ५८० डॉलर्स (३९,८७३ रुपये) मोजले जातात. हीच रक्कम आकाराने मोठ्या ‘एअरबस ३८०’ किंवा ‘बोईंग ७४७’ साठी आणखी जास्त असते.
*_📍तसं बघायला गेलं तर दोन देशांच्या भांडणात हवाई हद्द बंद करण्याची परंपरा जगभर प्रचलित आहे. अरब देशातील ४ देशांचे कतार सोबत बिनसल्याने त्यांनी कतारसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.आता तुम्हाला कळलं असेल की विमानाचं तिकीट एवढं महाग का असतं._*