फोन आणि सिम प्रिंटर

माझ्याकडे कॉम्पुटर नाही तरीपण मी प्रिंटर आणि मोबाईल वापरून प्रिंट्स काढू शकतो का ?

1 उत्तर
1 answers

माझ्याकडे कॉम्पुटर नाही तरीपण मी प्रिंटर आणि मोबाईल वापरून प्रिंट्स काढू शकतो का ?

3
तुमच्या कुठे तरी वाचनात येते किंवा तुमचा एखादा टेक्नोसॅव्ही मित्र तुम्हाला सांगतो कि हल्लीचे स्मार्टफोन हे कॉम्पुटर प्रमाणे काम करु लागले आहेत. पुर्वी ज्या छोट्या छोट्या कामासाठी कॉम्पुटर शिवाय पर्याय नव्हता ते काम आता स्मार्टफोन करु लागले आहेत, जसे कि ईमेल करणे , छोटे-मोठे प्रेझेंटेशन करणे, डॉक्युमेंट स्कॅन करणे , आलेल्या ईमेल ला लगेच उत्तर देऊन वेळ वाचवणे किंवा ईमेल फॉरवर्ड करणे आदी. मग जोश जोश मध्ये तुम्हीही एक महागडा स्मार्टफोन खरेदी करता, त्यावर काम सुरुही करता,मात्र अचानक एके दिवशी काही कामानिमित्त एका आॅफीसमध्ये जावे लागते आणि त्याठिकानी तुम्हाला आलेल्या ईमेल चे प्रिंट हवे असते, इमेल तर तुमच्या स्मार्टफोन वर असतो मात्र त्याचे प्रिंट काढायचे कसे ? एक पर्याय म्हणजे तुमचा इमेल एखाद्या प्रिंटर जोडलेल्या काम्पुटर वर उघडने आणि प्रिंट करणे,दुसरा पर्याय म्हणजे सरळ तुमच्या आॅफीस मध्ये परत येऊन तुमच्या काम्पुटरवर इमेलचे आऊटपुट काढुन परत तुमच्या कामासाठी जाणे.तिसरा पर्याय म्हणजे तुमच्या एखाद्या सहकाऱ्याला तो इमेल फॉरवर्ड करणे आणि त्याला इमेलचे प्रिंट काढुन आणायला सांगने. मात्र वरीलपैकी एकही पर्याय आता तुम्हाला शक्य वाटत नाही अशा वेळी तुमच्या डोक्यात विचार येतो कि हा स्मार्टफोन येवढी सगळी कामे करतो मग याला प्रिंटच का काढता येऊ नये ?
निदान आज तुमचे काम तरी अडले नसते.आता मात्र तुमच्या या आर्त हाकेला गुगलच्या अण्ड्राईड ने ओ दिली आहे, होय , आता तुमच्या स्मार्टफोनवरुन तुम्ही थेट प्रिंटरला प्रिंट देऊ शकता.मात्र यासाठी तुमच्या स्मार्टफोन मध्ये अण्ड्राईडची लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम असणे जरुरआहे.गुगलच्या क्लॉऊड प्रिंटींग या तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला आहे.

काय आहे गुगल क्लाऊड प्रिंट तंत्रज्ञान?

गुगल क्लाऊड प्रिंट या तंत्रज्ञानामध्ये तुमचा प्रिंटर इंटरनेटला कनेक्ट करता येतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जगभरातून कुठूनही तुमच्या प्रिंटरवर प्रिंट पाठवू शकता, तसेच इतरांनाही तुमच्या प्रिंटरचा अ‍ॅक्सेस देऊ शकता. एवढेच काय तर तुम्ही तुमच्या प्रिंटरवर लॅपटॉप, टॅबलेट किं वा मोबाईलवरून जगभरातून प्रिंट पाठवू शकता. यासाठी तुम्हाला हवे फक्त जी-मेलचे अकाउंट.
गुगल क्लाऊड प्रिंट ही सेवा वापरण्यासाठी बाजारात क्लाऊड रेडी प्रिंटर्ससुद्धा उपलब्ध आहेत.
जर तुमचा प्रिंटर क्लाऊड रेडी नसेल तरी सुद्धा तुम्ही हा प्रिंटर गुगल क्लाऊड प्रिंट साठी वापरु शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रिंटर कनेक्टेड असलेल्या काम्पुटरवर काही सेटिंग कराव्या लागतील. जसे गुगल क्रोम सेटिंगमध्ये जाऊ न शो अ‍ॅडव्हान्स सेटिंगवर क्लिक  करा.त्यामध्ये गुगल क्लाऊड प्रिंट सेक्शनमध्ये साईन इन टू गुगल क्लाऊड प्रिंटवर क्लिक  करा.त्यानंतर प्रिंटर कन्फर्मेशन मेसेज येतो. त्यावेळी खाली अ‍ॅड प्रिंटर्सला क्लिक  करा.अ‍ॅड प्रिंटरला क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्पुटर कनेक्टेड असलेले प्रिंटर तुमच्या जी-मेल अकाउंटला रजिस्टर होतात आणि यू आर रेडी टू स्टार्ट असा मेसेज येतो.त्यानंतर मॅनेज युवर प्रिंटरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल असलेल्या प्रिंटरची यादीच तुमच्यासमोर येते.त्यानंतर तुम्हाला हव्या प्रिंटरवर डबल क्लिक करा कि झाला तो प्रिंटर तुमच्या जी-मेल अकाउंटला इन्स्टॉल.

स्मार्टफोन वर काय सेटिंग कराल ?

सध्या बाजारात अनेक वाय-फाय प्रिंटर उपलब्ध आहेत तो जर तुमच्या कडे असेल तर त्याचे प्लग ईन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टॉल करावे लागेल उदा.एच पी प्रिंट सर्वीस प्लग इन किंवा इप्सन प्रिंट इनबलर आदी.हे प्लग इन गुगल प्ले वर उपलब्ध असतात.तुमच्या कडे ज्या कंपनीचा प्रिंटर असेल तो प्लग इन आॅन केला कि स्मार्टफोन तो प्रिंटर सर्च करेल. एकदा का प्रिंटर सर्च झाला कि तुम्ही त्यावर प्रिंट पाठऊ शकता.
स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सिस्टम या भागात प्रिंंटीग असे आॅप्शन आहे.यावर क्लिक केल्यावर क्लाऊड प्रिंट असे आॅप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या वाय-फाय नेटवर्क मध्ये असलेल्या प्रिंटरची लिस्ट तुम्हाला दाखवेल त्यापैकी ज्या प्रिंटर ला प्रिंट पाठवायची आहे तो सिलेक्ट करावा किंवा तुमच्या वर सांगितल्या प्रमाणे तुमच्या जी-मेल च्या अकांऊंट ला जो क्लाऊड प्रिंटर जोडला असेल त्यावर प्रिंट पाठवावी.
यामध्येच तुम्हाला आणखी एक आॅप्शन दिसेल ते म्हणजे सेव टु गुगल ड्राईव .या आॅप्शन चा वापर करुन तुमच्या स्मार्टफोन वरील फोटो,डाक्युमेंट किंवा इतर फाईल तुम्ही गुगल ड्राईव वर सेव करु शकता.



उत्तर लिहिले · 1/5/2019
कर्म · 0

Related Questions

8623020773 हा नंबर कोणाचा आहे माहिती मिळेल का?
फोन पे द्वारे केलेले पेमेंट मघारी घेता येतं का ते दुसऱ्याला गेलं आहे?
फोन पे पैसे परत माझं पैसे परत मिळणार का माझ्या कडून चुकून गेले तर परत मिळणार का?
फोन मेमरी मधील गाणी, व्हिडिओ मेमरी कार्ड मध्ये कसे सेव्ह करावे?
One Plus Buds आणि One Plus Buds z मध्ये कोणता इयर फोन बेस्ट असेल ? दोन्ही वापरून बघितलेले कोण आहेत का ?
माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पांढरेशुभ्र स्क्रीन का दिसत नाही?
मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे काय ?