टपाल

होळीवर टपाल तिकीट आहे काय?

1 उत्तर
1 answers

होळीवर टपाल तिकीट आहे काय?

0
होळीवर तिकीट काढणारा एकमेव देश गुआना 
भारतात रंगांचा उत्सव होळीची धूम सुरु आहे. भारतात हा मोठा सण मानला जातो. या सणाचा इतिहास प्राचीन आहे म्हणजे राधा कृष्ण होळी खेळत याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र भारताच्या टपाल विभागाने यावर आजपर्यंत एकही तिकीट जारी केलेले नाही. विशेष म्हणजे द. अमेरिकेतील गुआना या देशाने होळीवर तिकीट जारी केले आहे आणि असे तिकीट जारी करणारा तो एकमेव देश आहे.
*_
मिळालेल्या माहितीनुसार गुआना सरकारने २६ फेब्रुवारी १९६९ रोजी भारतीय होळी वर चार तिकिटांचा सेट जारी केला असून त्यावर राधाकृष्ण होळी खेळत असलेले अतिशय सुंदर चित्र आहे. हि तिकिटे उदयपुरच्या मेवाड फीलॅटली सोसायटीचे संस्थापक विनय भानावत याच्या संग्रही आहेत. ते म्हणाले होळी हा आमचा उत्सव पण आमच्या टपाल विभागाचे त्यावर तिकीट नाही. दिवाळीवर तिकीट प्रकाशित करण्यासाठी असाच १० वर्षे प्रयत्न केला गेला तेव्हा २००८ साली प्रथम ३ तिकिटांचा सेट जारी केला गेला. त्यानंतर ५/११/२०१२ व गतवर्षी आणखी २-२ तिकिटे जारी केली गेली. गुआना सरकारने १९७६ मध्येच दिवाळीवर चार तिकिटांचा सेट जारी केला होता.
सौ. माझा पेपर


Related Questions

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जनतेचे प्रयत्न करते?
सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे?
Tapal tikit abhasak kon hoteटपाल तिकीट अभ्यासक कोण होते?
टपाल तिकिटां च़या माध्यमातुनभारतियसंस़कृतिचिवारसाव?
टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते कारणे लिहा?
महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचे8री कोठे आहे ?
पोस्टात रजिस्टर एडीचा Regd Ad अर्थ काय ?