चाल आणि डौल पोशाख

मुलीचे विचित्र (भडकाऊ) कपडे घालणे योग्य की अयोग्य?

3 उत्तरे
3 answers

मुलीचे विचित्र (भडकाऊ) कपडे घालणे योग्य की अयोग्य?

4
मुलींनी नेहमी अंगप्रदर्शन करण्या पेक्षा सौन्दर्य प्रदशण करावे म्हणजे की अंग भर कपडे घालून कंपळावर कुंकू किंवा टिकली ( जी सौदर्यात 10% भर घालते )  हातात बांगड्या
काही बाहेरून आलेल्या मुलींमुळे मुलीभ विचार करतात
उत्तर लिहिले · 1/7/2018
कर्म · 4685
4
मुली असे कपडे घालून फिरणे अयोग्य तर नाही पण पूर्णपणे योग्य पण नाही. कोणत्याही व्यक्तीने कोणते कपडे घालावे हा त्याचा विषय आहे आणि आपल्या पद्धतीने जगण्याचा, राहण्याचा, आणि आवडीचे वस्त्र परिधान करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आणि सर्व मुली असे कपड़े  अंगप्रदर्शन करण्याच्या हेतूने घालतात हा विचार चुकीचा आहे. आणि त्यांचा हेतू असाच असेल आसे संगने चुकीचे आहे त्यांना जे आवडते ते कपडे त्या घालतात. त्यांना जे योग्य वाटते ते त्या करतात परंतु स्वातंत्र्याला ही काही मर्यादा आणि अटी असतात आपल्या वागण्याचा किंवा राहण्याच्या पद्धतीचा समाजवर विपरीत परिणाम होता कामा नये किंवा कोणत्याही संस्कृतीला ठेच पोहोचता कामा नये. त्यामुळे मुलींनी आणि महिलांनी आपल्या विचारात थोडासा बदल करणे गरजेचे आहे पुर्ण बदला असे मी म्हणत नाही पण समाजाला साजेसे कपडे घालावेत आणि अतिरेक टाळावा तसेच पुरुषांनी महिलांच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची नजर बदलने आवश्यक आहे. ईतकेच मी विनंती करू शकतो.
                                       धन्यवाद.
उत्तर लिहिले · 21/1/2019
कर्म · 2950
0

स्त्रियांचे तोकडे कपडे घालणे योग्य आहे की अयोग्य, हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. यावर अनेक दृष्टीकोन आहेत आणि कोणताही एकच 'बरोबर' किंवा 'चूक' दृष्टिकोन नाही.

  • व्यक्तिस्वातंत्र्य: काही लोकांचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनुसार कपडे निवडण्याचा अधिकार आहे. स्त्रियांनी काय परिधान करावे यावर निर्बंध घालणे हे व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.
  • लैंगिक वस्तुकरण: काही लोकांचा असा युक्तिवाद आहे की तोकडे कपडे स्त्रियांचे लैंगिक वस्तुकरण करतात आणि त्यांना केवळ 'वस्तू' म्हणून दर्शवतात. यामुळे स्त्रियांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो.
  • सुरक्षितता: तोकडे कपडे घातल्याने स्त्रिया असुरक्षित होऊ शकतात, असा युक्तिवाद काही लोक करतात. खासकरून सार्वजनिक ठिकाणी, यामुळे स्त्रिया harassment (गैरवर्तन) आणि हिंसेला बळी पडू शकतात.
  • सांस्कृतिक आणि धार्मिक मान्यता: कपड्यांबद्दलचे नियम आणि नैतिकता वेगवेगळ्या संस्कृतीत आणि धर्मात बदलतात. काही समुदायांमध्ये, तोकडे कपडे स्वीकार्य मानले जात नाहीत.

या मुद्द्यांचा विचार करून, स्त्रियांचे तोकडे कपडे घालणे योग्य आहे की अयोग्य, यावर कोणताही निश्चित निष्कर्ष काढणे कठीण आहे. हा निर्णय व्यक्ती, परिस्थिती आणि सामाजिक norms (मानदंड) यावर अवलंबून असतो.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 680

Related Questions

वारकरी नेहमी पांढऱ्या रंगाचा पोशाख का घालतात?
मुलगी बघायला जाताना कोणता पोशाख परिधान केला पाहिजे, सोबतच अजून काय काळजी घेतली पाहिजे?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
गावातील घरे, पोशाख, वाहने यांची यादी लिहा?
नवीन चपला किंवा जोडे का चावतात?
एखाद्या जुन्या कापडापासून कोणत्या दोन वस्तू तयार करता येतील?
एकदम स्लीम मुलांसाठी लग्नामध्ये नवरदेवाचा पोशाख म्हणून कशा प्रकारचा ड्रेस घ्यावा?