मायक्रोसॉफ्ट ऑफिस
MS Word म्हणजे काय ?
2 उत्तरे
2
answers
MS Word म्हणजे काय ?
4
Answer link
MS Word मायक्रोसॉफ्ट वर्ड
हे एक लेखन-संपादन कामकाजाचे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणक प्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. हे सॉफ्टवेर इ.स. १९८३ साली मल्टी-टूल वर्ड या नावाने झेनिक्स संगणक प्रणाल्यांसाठी बाजारात आणलेल्या लेखन-संपादन सॉफ्टवेरापासून उत्तरोत्तर विकसत गेले आहे.

0
Answer link
Microsoft Word म्हणजे नक्की काय?
मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा एम. एस. वर्ड म्हणून ओळखला जाणारा प्रोग्राम हा वर्ड प्रोसेसिंग एप्लीकेशन चा एक प्रकार आहे जो मायक्रोसॉफ्ट ने डिझाईन केलेला आहे, व तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट चा एक महत्त्वपूर्ण भाग देखील आहे. प्रत्येक जॉब करणारी व्यक्ती ही एम .एस .वर्ड ची वापरकर्ती असतेच.
MS Word या प्रोग्रॅम ची सुरुवात १९८३ मध्ये झाली, काही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स यांनी एकत्र येऊन हा प्रोग्रॅम विकसित केला. तसेच या प्रोग्रॅम ला पूर्वी "मल्टी टूल वर्ड" अश्या नावाने ओळखले जात होते. आणि १९८५ मध्ये या प्रोग्रॅम ला मायक्रोसॉफ्ट कंपनीने "एम एस वर्ड फॉर मॅक" अशी ओळख मिळवून दिली.
आर्टिकल स्त्रोत - https://www.marathispirit.com/microsoft-word-in-marathi/
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 8 टॅब असतात हे सर्व टॅब लाच मायक्रोसॉफ्ट वर्ड चे वैशिष्ट्य म्हणतात. कारण कि या टॅब मध्ये विविध प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आपण वर्ड मधील टेक्स्ट फॉरमॅटिंग, डिझाईन, आणि फॉन्ट तसेच टेक्स्ट कलर अश्या विविध प्रकारचे पर्याय वापरतो आणि आपले दस्तऐवज अधिक आकर्षक बनवतो. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्ड चे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
अश्याच प्रकारच्या मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दलची आणखी माहिती हवी असेल तर आमच्या मराठी स्पिरिट ब्लॉग पोस्ट ला नक्की व्हिझिट करा.