समाजशास्त्र पैसा सरकारी योजना

दारिद्र्य रेषेखाली म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

दारिद्र्य रेषेखाली म्हणजे काय?

4
गरिबीची प्रमाण मोजण्यासाठी दारिद्रय रेषा (Pov-erty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो.

1973-74 पासून नियोजन आयोग दारिद्रय रेषा ठरविण्यासाठी पुढील दोन निकषांचा वापर करीत आहे.

1दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग (Per Capita per day calorie intake) -
या निकषानुसार ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक उपभोग 2400 कॅलरी, तर शहरी भागात तो किमान 2100 कॅलरी एवढा ठरविण्यात आला आहे.

अर्थात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी मूल्याचे रूपांतर पैशात (equivalent मनी value) केले जाते.

दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च (Per Capita Per Month Consumption Expenditure) -
या निकषानुसार दारिद्रय रेषा 2004-2005 मध्ये (आधारभूत वर्ष: 1973-74) ग्रामीण भागात दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च रु. 356.30 तर शहरी भागात तो रु. 538.60 एवढी ठरविण्यात आली आहे.

यावरून जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा कमी खर्च करतात त्यांना 'दारिद्रय रेषेखालील कुटुंबे' (Below Poverty Line: BPL) तर जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा जास्त खर्च करतात त्यांना 'दारिद्रय रेषेवरील कुटुंबे' (Above Poverty Line:APL) असे संबोधले जाते.
उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 13530
1
ज्यांचे उत्पादन ३०,००० पेक्षा कमी आहे ते व्यक्ती गरीब.
उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 0
0

दारिद्र्यरेषेखालील लोक म्हणजे असे लोक ज्यांचे उत्पन्न किंवा उपभोग पातळी विशिष्ट सामाजिक-आर्थिक मानकांनुसार परिभाषित केलेल्या किमान पातळीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.

व्याख्या:

दारिद्र्याची कारणे:

  • बेरोजगारी
  • शिक्षणाचा अभाव
  • आरोग्याच्या सुविधांचा अभाव
  • नैसर्गिक आपत्ती
  • सामाजिक असमानता

दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय:

  • रोजगार निर्मिती
  • शिक्षणाचा प्रसार
  • आरोग्य सेवा सुधारणे
  • सामाजिक सुरक्षा योजना

टीप: दारिद्र्यरेषेची व्याख्या आणि मोजमाप वेगवेगळ्या देशांमध्ये आणि संस्थांमध्ये भिन्न असू शकते.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 860

Related Questions

कामाठी समाजशास्त्राची विभागणी स्पष्ट करा?
कॅम्टची समाजशास्त्राची विभागणी स्पष्ट करा?
कॉम्टची समाजशास्त्राची विभागणी स्पष्ट करा?
जातीची रचना आणि प्रकार लिहा?
पूर्व विदर्भातील वडार समाजाच्या जातीचे समाजशास्त्रीय अध्ययन?
कोणत्या समुदायात लग्नाच्या वेळी मुलाला डुकराचे रक्त प्यावे लागते?
औद्योगिक समाजशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा?