Topic icon

परवाना आणि ओळखपत्रे

0
दोन आठवड्यात तुमचे लायसन्स घरपोच येईल. काळजी करू नये.
उत्तर लिहिले · 16/9/2022
कर्म · 282915
1

माननीय साहेब आपणास हात जोडून विनंती आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी ला जाणारे मार्ग अतिशय खराब परिस्थिती मध्ये आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी अर्पण केले आहे त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी ला जाणारे सर्व मार्ग अतिशय विकृत आणि खराब परिस्थिती आहे पण त्वरित छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी ला जाणारे सर्व मार्ग त्वरित तयार करण्याचे आदेश द्यावी आज महाराष्ट्र मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजमाता जिजाऊ यांच्या समाधी ला जाणारे सर्व मार्ग खूप खरा परिस्थितीमध्ये आहे तरी आपण त्वरित दुरुस्ती करणे व नवीन आदेश काढावा अशी विनंती करत आहे आणि वडु बुद्रुक छत्रपती संभाजी महाराजांची समाधी जवळ इतिहासाची माहिती देणारी भव्य तयार करण्याचे करण्यात यावी सौ शिव शंभू प्रिया पाटील आपणास विनंती करत आहे सर्व शिवभक्त शिवकन्या शिवशंभूप्रेमी दर्शन घेण्यासाठी वडु बुद्रुक गोलात प्रणतू कोणी लक्ष दिल का हो आज काय प्रस्तीती आहे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आपन त्वरित छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला जाणारे सर्व मार्ग त्वरित दुरुस्ती करण्यात आले पाहिजे अत्यंत दुःख होते ज्या राजांनी आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी अर्पण केली त्याच राजेंचा समाधीला जाणारे मार्ग आज खुपचं खराब परिस्थिती आहे निवडणूक आली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आठवता निवडून आले की काहीही देणेघेणे नाही अशा लोकप्रतिनिधींचा #जाहीर_निषेध जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र
सो शिवशंभु प्रिया पाटील राहणार पुणे
उत्तर लिहिले · 22/5/2022
कर्म · 30
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
शस्त्रपरवाना कसा काढावा 

शस्त्र परवाना हा संरक्षण, स्पोर्टस आणि शेती संरक्षण या कारणांसाठी दिला जातो. स्पोर्टससाठी परवाना खातरजमा करुन दिला जातो. ज्या ठिकाणी जंगली जनावरांचा वावर असतो अशा ठिकाणी अर्जदारांची पुर्ण चौकशी आणि कागदपत्रांची खातरजमा करुन शेती संरक्षाणासाठी परवाना दिला जातो. शेतीसंरक्षणासाठी शहर व परिसरातूनही मोठ्या प्रमाणात अर्ज केले जातात.स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणाऱ्यांची पार्श्वभूमी पाहिली जाते. त्यांना कुणाकडून जीविातास धोका आहे याबद्दलची पुर्ण चौकशी पोलिसांकडून केली जाते. यातील बहुतांश अर्ज हे प्रतिष्ठेच्या असल्याने रिजेक्ट केले जातात. अर्जदारांपैकी स्वसंरक्षणासाठीच सर्वात जास्त अर्ज केले जातात.
सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.
असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते.भारतात आर्म्स ऍक्ट १९५९ अन्वये भारतीय नागरिकाला स्वतःच्या संरक्षणासाठी केवळ विनाप्रतीबंधित शस्त्रे (NPB) वापरण्याचेच लायसन मिळू शकते. विनाप्रतिबंधित शस्त्रे (NPB) देण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि गृह विभागाकडे असतात, तर प्रतिबंधित शस्त्रे (PB) देण्याचे अधिकार केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असतात. भारतात आठ इंचापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे, तशी शस्त्रे बेकायदा मानली जातात. तसेच भारतात केवळ देशी बनावटीचीच शस्त्रे वापरता येतात.http://bit.ly/3qrLLFd

शस्त्र परवान्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
शस्त्र परवान्यासाठी आपल्याला आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आपले पासपोर्ट साईज फोटो, आपले मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न याची पूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच आपण कोणती गन घेणार आहोत त्याचीही माहिती द्यावी लागते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,याशिवाय आपल्या भागातील दोन चांगल्या व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छिता त्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पटवून द्यावे लागते.
🔹केवळ ही शस्त्रे वापरण्याची मिळते परवानगी
भारत सरकारच्या नियमांनुसार आपल्या देशात केवळ तीन प्रकारच्या शस्त्रांसाठी आपण अर्ज करु शकता. म्हणजेच भारतात तीन प्रकारची शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना मिळतो. भारतात शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या गन्सला परवाना मिळतो. एक भारतीय व्यक्ती वरीलपैकी कुठल्याही जास्तीत जास्त तिचं गन भारतात वापरु शकतो.
    🔹कसा निघतो शस्त्र परवाना ?
१) फॉर्म A – शस्त्र परवाण्यासाठी फॉर्म A भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परवाना कार्यालयात सादर करावा. २) आवश्यक तपासणी – शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का ते तपासले जाते.
पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अर्जदाराची मुलाखतही घेतली जाते. मुलाखतीत अर्जदाराला बंदूक का ठेवायची आहे असा प्रश्न विचारला जातो. बहुतेक अर्जदार स्वसंरक्षणाचे कारण सांगतात.
३) मुलाखती नंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवला जातो. जर या दोन्ही ठिकाणाहून कोणताही आक्षेप आला नाही आणि पोलिस अधिकारी देखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.
परवाना पाहिजे असलेल्या व्यक्तीच्या चरित्राविषयी आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मधून माहिती मिळविल्या जाते. पोलिसाचा गुप्तचर विभाग हि जवाबदारी पूर्ण करतो. आवेदकास जिल्हा शल्यचिकीसत्काकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. जर आवेदक अपंग अथवा दृष्टीदोष असलेला असेल तर त्याला परवाना मिळत नाही.
आवेदकास आपले ओळखपत्र, फिटनेस प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र हे दाखल करावी लागतात. हा अर्ज तहसीलदार, लेखापाल इत्यादीची रिपोर्ट घेतल्या नंतर संबंधित जिल्ह्याचा एसडीओ, एसपी यांच्या कडून जिल्हाधिकारी यांना पाठवल्या जातो आणि जिल्हाधिकारी आपल्या मर्जी नुसार या अर्जावर निर्णय घेऊन परवाना देतात.
कोरा लिंक http://bit.ly/2Zkr3v6

फेसबुक लिंक http://bit.ly/2ZiSBAZ
3
 अन्न परवाना म्हणजे काय? तो कसा मिऌवावा 🌀

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे अन्न उत्पादन, वितरण आणि विक्री करण्यासाठी अन्न परवाना बंधनकारक केला आहे.ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI लायसन्स बंधनकारक आहे. त्यानुसार फक्त वितरणाच्या संस्थेने अन्न परवाना काढणे पुरेसे नाही; तर वितरण करणाऱ्या प्रत्येकाकडे हा अन्न परवाना असणे आवश्‍यक आहे. याचे शुल्कही कायद्याने निश्‍चित केले आहे.
♨️ FSSAI परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?
http://bit.ly/3cKwyv3
ही नोंदणी राज्य सरकार ने आता घरी तयार होऊन विकल्या जाणाऱ्या केक, चॉकलेट्स या खाद्यपदार्थां साठी एक परवाना घेणं बंधनकारक केलं आहे.तसेच डेअरी युनिट, तेल प्रोसेसिंग युनिट, कत्तलखाणा  मांस प्रक्रिया युनिट, Relabellers  आणि Re-packers, प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट, घाऊक विक्रेता,  किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, क्लब /कॅन्टीन, अन्न केटरिंग, हॉटेल, उपहारगृह, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ दूध वाहतूक, मार्केटर, फेरीवाला, निर्यातकार आणि आयातकार, ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन फूड डिलिव्हरी, फास्ट फूड, चायनीज सेंटर.
ही नोंदणी न केल्यास ५ लाख रुपयांचा दंड आणि ६ महिन्याचा कारावास अशी शिक्षा होऊ शकते.
*FSSAI परवाना प्रकार FSSAI  नोंदणी :*
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे आणि वीस कोटींपर्यंत आहे त्यांना FSSAI State License आवश्यक आहे.
उत्पादन युनिट दररोज दोन टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50 हजार लिटर
3 स्टार तारांकीत हॉटेल आणि वरील Repackers आणि Relebelling युनिट, क्लब उपहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवानासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
*FSSAI सेंट्रल लायसन*
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना FSSAI सेंट्रल लायसन्स आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रे*
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
पत्त्याचा पुरावा( विजेचे बिल किंवा भाड्याचा  करार)
*FSSAI परवान्याची वैधता*
एक ते पाच वर्षासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर नूतनीकरण करणे
  • आपल्या भागातील नगर पालिका, महानगरपालिका सारख्या सरकारी कार्यालयालात लायसन बद्दल चौकशी करावी.माहिती मिऌेल.