2 उत्तरे
2
answers
शस्त्रपरवाना कसा काढावा?
1
Answer link
शस्त्रपरवाना कसा काढावा
शस्त्र परवाना हा संरक्षण, स्पोर्टस आणि शेती संरक्षण या कारणांसाठी दिला जातो. स्पोर्टससाठी परवाना खातरजमा करुन दिला जातो. ज्या ठिकाणी जंगली जनावरांचा वावर असतो अशा ठिकाणी अर्जदारांची पुर्ण चौकशी आणि कागदपत्रांची खातरजमा करुन शेती संरक्षाणासाठी परवाना दिला जातो. शेतीसंरक्षणासाठी शहर व परिसरातूनही मोठ्या प्रमाणात अर्ज केले जातात.स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागणाऱ्यांची पार्श्वभूमी पाहिली जाते. त्यांना कुणाकडून जीविातास धोका आहे याबद्दलची पुर्ण चौकशी पोलिसांकडून केली जाते. यातील बहुतांश अर्ज हे प्रतिष्ठेच्या असल्याने रिजेक्ट केले जातात. अर्जदारांपैकी स्वसंरक्षणासाठीच सर्वात जास्त अर्ज केले जातात.
सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.
असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते.भारतात आर्म्स ऍक्ट १९५९ अन्वये भारतीय नागरिकाला स्वतःच्या संरक्षणासाठी केवळ विनाप्रतीबंधित शस्त्रे (NPB) वापरण्याचेच लायसन मिळू शकते. विनाप्रतिबंधित शस्त्रे (NPB) देण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि गृह विभागाकडे असतात, तर प्रतिबंधित शस्त्रे (PB) देण्याचे अधिकार केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असतात. भारतात आठ इंचापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे, तशी शस्त्रे बेकायदा मानली जातात. तसेच भारतात केवळ देशी बनावटीचीच शस्त्रे वापरता येतात.http://bit.ly/3qrLLFd
शस्त्र परवान्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
शस्त्र परवान्यासाठी आपल्याला आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आपले पासपोर्ट साईज फोटो, आपले मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न याची पूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच आपण कोणती गन घेणार आहोत त्याचीही माहिती द्यावी लागते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,याशिवाय आपल्या भागातील दोन चांगल्या व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छिता त्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पटवून द्यावे लागते.
🔹केवळ ही शस्त्रे वापरण्याची मिळते परवानगी
भारत सरकारच्या नियमांनुसार आपल्या देशात केवळ तीन प्रकारच्या शस्त्रांसाठी आपण अर्ज करु शकता. म्हणजेच भारतात तीन प्रकारची शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना मिळतो. भारतात शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या गन्सला परवाना मिळतो. एक भारतीय व्यक्ती वरीलपैकी कुठल्याही जास्तीत जास्त तिचं गन भारतात वापरु शकतो.
🔹कसा निघतो शस्त्र परवाना ?
१) फॉर्म A – शस्त्र परवाण्यासाठी फॉर्म A भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परवाना कार्यालयात सादर करावा. २) आवश्यक तपासणी – शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का ते तपासले जाते.
पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अर्जदाराची मुलाखतही घेतली जाते. मुलाखतीत अर्जदाराला बंदूक का ठेवायची आहे असा प्रश्न विचारला जातो. बहुतेक अर्जदार स्वसंरक्षणाचे कारण सांगतात.
३) मुलाखती नंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवला जातो. जर या दोन्ही ठिकाणाहून कोणताही आक्षेप आला नाही आणि पोलिस अधिकारी देखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.
परवाना पाहिजे असलेल्या व्यक्तीच्या चरित्राविषयी आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मधून माहिती मिळविल्या जाते. पोलिसाचा गुप्तचर विभाग हि जवाबदारी पूर्ण करतो. आवेदकास जिल्हा शल्यचिकीसत्काकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. जर आवेदक अपंग अथवा दृष्टीदोष असलेला असेल तर त्याला परवाना मिळत नाही.
आवेदकास आपले ओळखपत्र, फिटनेस प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र हे दाखल करावी लागतात. हा अर्ज तहसीलदार, लेखापाल इत्यादीची रिपोर्ट घेतल्या नंतर संबंधित जिल्ह्याचा एसडीओ, एसपी यांच्या कडून जिल्हाधिकारी यांना पाठवल्या जातो आणि जिल्हाधिकारी आपल्या मर्जी नुसार या अर्जावर निर्णय घेऊन परवाना देतात.
कोरा लिंक http://bit.ly/2Zkr3v6
फेसबुक लिंक http://bit.ly/2ZiSBAZ
1
Answer link
शस्त्र परवाना कसा काढला जातो
भारतात आर्म्स ऍक्ट १९५९ अन्वये भारतीय नागरिकाला स्वतःच्या संरक्षणासाठी केवळ विनाप्रतीबंधित शस्त्रे (NPB) वापरण्याचेच लायसन मिळू शकते. विनाप्रतिबंधित शस्त्रे (NPB) देण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि गृह विभागाकडे असतात, तर प्रतिबंधित शस्त्रे (PB) देण्याचे अधिकार केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असतात. भारतात आठ इंचापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे, तशी शस्त्रे बेकायदा मानली जातात. तसेच भारतात केवळ देशी बनावटीचीच शस्त्रे वापरता येतात.
शस्त्र परवान्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात
शस्त्र परवान्यासाठी आपल्याला आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आपले पासपोर्ट साईज फोटो, आपले मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न याची पूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच आपण कोणती गन घेणार आहोत त्याचीही माहिती द्यावी लागते.
याशिवाय आपल्या भागातील दोन चांगल्या व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छिता त्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पटवून द्यावे लागते.
केवळ ही शस्त्रे वापरण्याची मिळते परवानगी
भारत सरकारच्या नियमांनुसार आपल्या देशात केवळ तीन प्रकारच्या शस्त्रांसाठी आपण अर्ज करु शकता. म्हणजेच भारतात तीन प्रकारची शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना मिळतो. भारतात शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या गन्सला परवाना मिळतो. एक भारतीय व्यक्ती वरीलपैकी कुठल्याही जास्तीत जास्त तिचं गन भारतात वापरु शकतो.
कसा निघतो शस्त्र परवाना
१) फॉर्म A – शस्त्र परवाण्यासाठी फॉर्म A भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परवाना कार्यालयात सादर करावा. २) आवश्यक तपासणी – शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का ते तपासले जाते.
पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अर्जदाराची मुलाखतही घेतली जाते. मुलाखतीत अर्जदाराला बंदूक का ठेवायची आहे असा प्रश्न विचारला जातो. बहुतेक अर्जदार स्वसंरक्षणाचे कारण सांगतात.
३) मुलाखती नंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवला जातो. जर या दोन्ही ठिकाणाहून कोणताही आक्षेप आला नाही आणि पोलिस अधिकारी देखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.
४) फी – पिस्तुल, रिव्हॉल्व्हर्स आणि रिपीट रायफल्सचे परवाना शुल्क १०० रुपये असून त्यांचे नूतनीकरण शुल्क ५० रुपये आहे. २२ बोअर रायफल परवान्यासाठी फी ४० रुपये आणि नूतनीकरण फी २० रुपये आहे. एमएल गन, एअर गनचे शुल्क १० रुपये आणि नूतनीकरण शुल्क ५ रुपये आहे.
Khaasre.com