2 उत्तरे
2
answers
जोतीबा यात्रेचे इंग्रजांना कुतूहल होते का?
0
Answer link
होय, इंग्रजांना जोतीबा यात्रेचे कुतूहल होते. याचे कारण ही यात्रा मोठी होती आणि यामध्ये विविध प्रकारच्या परंपरा आणि विधी पाळले जात होते. ब्रिटीश प्रशासकांनी या यात्रेची नोंद घेतली आणि काही अधिकाऱ्यांनी या यात्रेला भेटही दिली.
उदाहरणे:
- १८८० च्या दशकात, बॉम्बे प्रांताच्या प्रशासकांनी जोतीबा डोंगरावर भेट देऊन यात्रेची माहिती घेतली.
- ब्रिटिश प्रशासकांनी यात्रेतील कर आणि इतर आर्थिक बाबींची नोंद ठेवली.
यावरून असे दिसते की इंग्रजांना जोतीबा यात्रेबद्दल कुतूहल होते आणि त्यांनी त्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
अधिक माहितीसाठी, खालील संदर्भ उपयोगी ठरू शकतात:
0
Answer link
*🏪 ब्रिटिशांनाही होते कुतूहल जोतिबाच्या यात्रेचे*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
चैत्र महिन्यात होणाऱ्या जोतिबाच्या यात्रेचे भारतीयांइतकेच ब्रिटिशांनाही कुतूहल होते. https://bit.ly/4lDNfck लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची व्यवस्था नेमकी कशी केली जाते, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. या संबंधीची एक बातमी इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाºया होमवर्ड मेल या वृत्तपत्रात ८ जून १८६८ रोजी छापून आली होती, अशी माहिती यशोधन जोशी यांनी दिली. जोशी हे एल अँड टी कंपनी, पुणे येथे प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत असून, मूळचे कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत येथील रहिवासी आहेत.

╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
इतिहासाचे अभ्यासक असलेले जोशी हे ब्रिटिश अर्काइव्हमध्ये कोल्हापूरसंबंधी माहिती शोधत असताना त्यांना ही बातमी सापडली. या बातमीमध्ये त्या काळात झालेल्या जोतिबाच्या यात्रेची दिलेली माहिती मोठी रंजक आहे. वाहनांची सोय नसल्याने यात्रेकरू तसेच नारळ, गुलाल या मालांची वाहतूक प्रामुख्याने बैलगाडीने व्हायची. यात्रेच्या काळात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीसाठी हत्ती, घोडे, उंट यांचा वापर केला जायचा. तसेच जोतिबा डोंगरावर येणाऱ्या यात्रेकरूंसाठी अन्नछत्रही चालायचे, अशी माहिती या बातमीत देण्यात आली आहे. १८५४ सालच्या मेजर ग्रॅॅहमच्या एका रिपोर्टनुसार जोतिबा संस्थानचे त्यावेळचे वार्षिक उत्पन्न अंदाजे १२ हजार रुपये असल्याचा उल्लेखही या बातमीत आहे. शेकडो बैलगाड्यातून नारळ तसेच गुलाल यात्रेसाठी आणला जात असल्याचा उल्लेखही या बातमीत आढळतो. 📍यात्रा काळात जमादाराचा खून :
यात्रेसाठी बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी त्याकाळी ब्रिटिश सरकारची होती. त्यांचे पोलिस बंदोबस्तासाठी असायचे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना लवकर सोडण्याचे प्रकारही चालायचे. या गोष्टीची तक्रार झाल्याने एक जमादार तपासणीसाठी आला असता त्यांना एक हवालदार लाच घेताना रंगेहात सापडला. त्या हवालदाराचा ब्रिटिश सरकारच्या जमादाराने सर्वासमक्ष चांगलाच पाणउतारा केला; पण हे करीत असताना जमादाराने उच्चारलेले काही शब्द हवालदाराच्या जिव्हारी लागले. त्यामुळे संतापलेल्या हवालदाराने त्या जमादाराचा तंबूत घुसून गोळी झाडून खून केला होता. नंतर त्या हवालदाराला ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्याचाही उल्लेख या बातमीत आहे.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24