राजकारण राजकीय रणनीती

शरद पवारांची राजकीय मुत्सद्देगिरी दर्शवणारे एक उदाहरण सांगा?

2 उत्तरे
2 answers

शरद पवारांची राजकीय मुत्सद्देगिरी दर्शवणारे एक उदाहरण सांगा?

0

शरद पवारांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे १९७८ साली त्यांनी पुलोद सरकार स्थापन केले.
उदाहरण:

  • पार्श्वभूमी: १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि जनता पार्टीचे सरकार आले. महाराष्ट्रात मात्र काँग्रेसचे सरकार होते, पण अंतर्गत कलहांमुळे ते अस्थिर होते.
  • खेळी: शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमधून बाहेर पडून जनता पार्टी आणि इतर लहान पक्षांना एकत्र आणले. त्यांनी पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) नावाचा एक नवीन गट तयार केला.
  • परिणाम: शरद पवार यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून पुलोद सरकार स्थापन केले आणि ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. यामुळे राज्यातील राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली.

या घटनेमुळे शरद पवार यांची राजकीय क्षमता आणि मुत्सद्देगिरी दिसून येते. त्यांनी अत्यंत चतुराईने राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला आणि आपल्या विरोधकांना हरवून सत्ता मिळवली.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
लोकसत्ता लेख

उत्तर लिहिले · 17/4/2025
कर्म · 840
0
*🎯 पवार साहेंबाचा एक अराजकीय मत्सुदी नमुना*










————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
 दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. https://bit.ly/4jeQR3a ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती.
 त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला. पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले जी दहाफुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे , हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल ,अन्यथा खूप गैरसोय होईल हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला ,पण ते काही ऐकूनच घेईनात. बेकायदेशीर कामाला मी कधीही होकार देणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गी लावले.


 त्या दिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते. जिथे गृहमंत्री काही करू शकत नाही तिथे दुसरं कुणी काही करीन याची काहीच शक्यता नव्हती तरी पदाधिकारी पवार साहेबांकडे गेले, 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫त्यांना त्यांनी सगळे सांगितले. नगरपालिका झाड पाडू देत नाही, त्यांचा तसा नियम आहे हेही त्यांनी पवारसाहेबांना सांगितले. 
हे ऐकून पवारसाहेबही " अरे जर पालिकेचा नियम आहे तर झाड पाडता येणार नाही. आणि मीही यात काही करू शकत नाही. उलट माझा सल्ला आहे की हे झाड पाडू नका, त्याला पार घाला, खतपाणी घालून वाढवा. झाड ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचे जतन करा. मी सगळीकडे हेच सांगत असतो. पण लोक ऐकत नाहीत आमच्या बारामतीत तर काही लोक एकमेकांच्या बांधावरच्या झाडाच्या बुंध्यात मोरचुदाच्या पुड्या गाडतात. महिन्याभरात झाड मरते. मालकाला झाड का मेले, कुणी मारले ते जन्मात कळत नाही. पण त्यामुळे किती नुकसान होते हे लोकांना कळत नाही. तीअडाणी आहेत . आपण शिकलेली माणसं आहात तुम्ही झाड जपलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का ?" असे सुनावून आलेल्यांना सल्ला देवून कटवले ......
पदाधिकार्यांनी पवारसाहेबांचे बोल ध्यान देवून ऐकले होते , त्यांनी त्या झाडाला छानसा पार बांधला , त्याला ते रोज पाणी घालू लागले.अर्थात पुढच्या एक महिन्यात ते झाड आपोआप मेले, पदाधिकार्यांनी पालिकेला कळवले, पालिकेची गाडी आली आणि ते मेलेले झाड त्यांनी काढून टाकले. जागा साफसूफ करून दिली. पदाधिकार्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून कुंपणाची भिंत आणि प्रवेशद्वार बांधून काढले. ...
धन्य ते साहेब, आणि धन्य ते राजकारण♏https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24