समाज यात्रा

जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून लोक पायी व बैलगाडी करून येतात का?

2 उत्तरे
2 answers

जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून लोक पायी व बैलगाडी करून येतात का?

0

होय, जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून (Belgaum) लोक पायी आणि बैलगाडी करून येतात.

  • पायी: अनेक भाविक बेळगावहून जोतीबा डोंगरला पायी चालत येतात.
  • बैलगाडी: काही लोक पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून प्रवास करतात.

हे मुख्यतः श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग आहे.

उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 720
0
*🏪 जोतीबा यात्रेसाठी पायी , बैलगाडीसह येणारे बेळगावकर* 








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
जोतिबा डोंगर - 
झूल्यांसह सजलेले सर्जा -राजा, राम - लक्ष्मण , श्याम - सुंदर या बैलांच्या जोड्या . .. त्यांच्या गळ्यातील घुंगराच्या तालावर झपाझप चालणाऱ्या बैलगाड्या .. . दोन भाविकांच्या खांद्यावर डोलणारी सासनकाठी. .. https://bit.ly/4lyhPUS एका भाविकाच्या डोक्यावर जोतिबाची मूर्ती, " जोतिबाच्या नावानं चांगभलं 'चा जयघोष करीत बेळगाव , कर्नाटक भागातील भाविकांचा ताफा जोतिबा चैत्र यात्रेसाठी दरवर्षी येतो. तीनशे वर्षांची परंपरा असलेली ही सासनकाठी व बैलगाड्यांचा ताफा 128 किलोमीटर पायी प्रवास करत कामदा एकादशीस डोंगरावर सवाद्य मिरवणुकीने दाखल होतो. 


बेळगावकरांची ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे . पिढ्या बदलल्या , विचार बदलले , तरीही पंधरा दिवस आपापल्या कामांवर रजा काढून ही मंडळी उत्साहाने या पायी सासनकाठी सोहळ्यात सहभागी होतात. यामध्ये लहान मुलं , वयोवृद्ध महिला , पुरुष यांचा समावेश असतो. रोजच्या जेवणसाठी आवश्यक वस्तू, जनावरांच्या चाऱ्यासह त्यांचा प्रवास सुरू होतो .𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫उन्हाळ्याचे दिवस असल्याने पहाटे पाच ते अकरा आणि दुपारी चार ते सायंकाळी सात असा त्यांचा चालण्याचा दिनक्रम. रात्री ठरलेल्या ठिकाणी मुक्कामी जेवण करून विश्रांती घ्यायची आणि पुढचा प्रवास सुरू , असे परंपरेनेच चालत आलेले त्यांचे नियोजन आहे .जोतिबाचे परमभक्त बेळगाव गिराप्पा धुराजी यांच्यापासून सुरू झालेली सासनकाठीची ही परंपरा पुढे सार्वजनिक स्वरूपात साजरी होऊ लागली. बेळगावचे हे जोतिबा भक्त हा पायी प्रवास करून जोतिबाच्या चैत्री यात्रेत सहभागी होतात.Ⓜ
गुढी पाडव्यास सर्व बेळगावकर एकत्र येऊन यात्रेसाठी जाण्याचे नियोजन करतात. बेळगावहून येणार्‍या बैलगाड्या पहिला मुक्काम संकेश्वर, दुसरा सौंदलगा, तिसरा गोकुळ शिरगाव, तर चौथा वडणगे असा चार दिवसांचा मुक्काम करतात. तिथून बेळगावकर भाविक दक्षिण दरवाजातून मुख्य मंदिरात जातात. मानाचा विडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात येते . 
Ⓜपाचवी पिढीही सहभागी :
चव्हाटा गल्लीतील सासनकाठी ही ईरापदादा यांची म्हणून ओळखली जाते. या गल्लीतील पाचव्या पिढीने ही परंपरा सुरू ठेवली आहे . प्रत्येक वर्षी हे भाविक न चुकता डोंगरास पायी येतात . त्यांच्या काठीचा व नंदीचा मान आहे . 
बेळगावहून येणार्‍या सासनकाठीची नोंद संस्थानकालीन, बि—टिश दफ्तरीही आहे. याबाबतची कागदपत्रे, ताम्रपटही बेळगावकरांकडे आहे. 
कर्नाटकातून येणार्‍या भाविकांसाठी या भाविकांच्या वतीने अन्नछत्र चालवले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी बक्षीसपत्र म्हणून या बेळगावच्या भाविकांना जागा दिल्याचे प्रा. आपटेकर यांनी सांगितले. या जागेला बेळगावकरी तळे अशी ओळख आहे.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24