वास्तुकला इतिहास

मुघल गार्डन कोणी बांधले?

2 उत्तरे
2 answers

मुघल गार्डन कोणी बांधले?

0

मुघल गार्डन (आताचे 'अमृत उद्यान') हे एडविन लुटियन्स यांनी डिझाइन केले. ते भारतातील राष्ट्रपती भवनाच्या आवारात आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 13/4/2025
कर्म · 740
0
*🕌 व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जने बांधलेले मुघल गार्डन*




————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
 दिल्ली येथील मुघल गार्डन म्हटले की हे देखील लाल किल्ला आणि इतर सर्व ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे मुघल शासकाने बांधली असे मनात येते. https://bit.ly/3Y0i5C2 पण तसे नाही. मुघल गार्डन ब्रिटीश राजवटीत ते बांधले गेले.


भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रपती भवन हे नाव व्हाईसरॉयचे घर असे आणि कोलकाता ही राजधानी असायची. इंग्रजांनी १९११ मध्ये कोलकाता ऐवजी दिल्ली आपली राजधानी म्हणून जाहीर केली.त्यानंतर रायसीना टेकडी कापून व्हाइसरॉयचे घर म्हणजेच सध्याचे राष्ट्रपती भवन बांधण्यात आले.
व्हाईसरॉय हाऊसमध्ये खास फुलांची बाग बनवण्यात आली होती पण तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या पत्नी लेडी हार्डिंग यांना ही बाग आवडली नाही. नंतर सर एडविन लुटियन्स यांनी १९१७ च्या सुरुवातीला मुघल गार्डनच्या डिझाइनला अंतिम रूप दिले आणि ते १९२८ मध्ये मुघल गार्डन या नावाने बांधून पूर्ण झाले.लुटियन्सने बागेत भारतीय संस्कृती आणि मुघल शैलीची झलक दाखवली. मुघल गार्डन हे अशा प्रकारचे एकमेव उद्यान आहे, जिथे जगभरातील रंगीबेरंगी फुले पाहता येतात. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले होते.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫15 एकरावररील या उद्यानामागे जम्मू-कश्मीरची मुघल गार्डन, ताजमहलभोवतीचा बगीचा, जुनी पेंटिंग्स यांचा आधार घेण्यात आला. पर्शियन म्हणजे फारशी बगिच्यांच्या शैलीपासून प्रेरणा घेऊन या बागा तयार करण्यात आल्या.
हा काही साधा बगिचा नाही. इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत. ती बहरतात तेव्‌हा निसर्गानं रांगोळी काढल्याचाच भास व्हावा. त्यात नेदरलँड्सची ट्युलीप, ब्राझिलचे ऑर्किड, जपानचं चेरी ब्लॉसम आणि इकेबानासाठी वापरली जाणारी फुलं, चीनमधील कमळं आहेत. या बागेत मुघल शैलीत उभारलेली कारंजी, छोटे पाट आणि फुलझाडांचा युरोपियन फुलं, हिरवळीसोबत संगम झालेला दिसतो. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


Related Questions

चौसोपी जुना वाडा आहे. चार कोपरे, चार मालक आहेत. तसेच आत आंगण आहे का?