मराठा साम्राज्य इतिहास

शंभूराजेंच्या बलिदानाबाबत माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

शंभूराजेंच्या बलिदानाबाबत माहिती द्या?

0

शंभूराजेंचे बलिदान:

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांनी अत्यंत कमी वयात अनेक भाषा व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. शंभूराजे पराक्रमी, शूर आणि आपल्या धर्मावर निष्ठा असणारे होते.

१ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे मुघलांनी संभाजी महाराजांना पकडले. औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारण्याची शिक्षा दिली.

११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांच्या बलिदानाने मराठा साम्राज्याला मोठी प्रेरणा मिळाली. त्यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले.

महत्व:

  • धर्मनिष्ठा: संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले प्राण दिले.
  • स्वराज्याचे रक्षण: त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले.
  • प्रेरणा: त्यांचे बलिदान मराठा साम्राज्यासाठी एक प्रेरणा ठरले.
उत्तर लिहिले · 9/4/2025
कर्म · 720
0
*🏪 शंभुराजेंचे बलिदान*








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
मोगल छावणीत शंभूराजांचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. https://bit.ly/42LH3GX देहाची कातडी रोज सोलण्यात येत होती. तरीही शंभूराजे जराही डळमळले नाहीत. किती हा ज्वलंत धर्माभिमान आणि केवढी पृथ्वीमोलाची ही सहनशीलता! या छळछावणीतच संभाजी महाराजांचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्यात आले! इतके होऊनसुद्धा संभाजी महाराजांना नैसर्गिक मृत्यू येत नव्हता! ११ मार्च १६८९ शके १६१०! तो दिवस फाल्गुन वद्य अमावस्येचा होता. दुसर्‍या दिवशी चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा होता. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदूंच्या मनात कायमची दहशत निर्माण करावी या हेतूने धर्मांध औरंगजेबाच्या आदेशानुसार अमावस्येला शंभूराजांचे मस्तक धडावेगळे केले गेले! ज्या मस्तकावर सप्तगंगाच्या पवित्र जलाचा रायगडावर अभिषेक झाला तेच मस्तक छाटण्यात आले! ज्या गुढीपाडव्याला घराघरातून गुढ्या उभारल्या जातात त्याच दिवशी शंभूराजांचे मस्तक भाल्यावर टांगून मोगली छावणीतून आसुरी आनंदात मिरवण्यात आले! संभाजीराजे आणि कवी कलशांच्या निष्प्राण देहांचे तुकडे तुकडे करून वदू या गावाजवळ टाकण्यात आले. क्रौर्याची परिसीमा पार झाली!


३९ दिवस यमयातनांचा सहर्ष स्वीकार करून देव, धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान करून शंभूछत्रपतींनी ज्वलंत आदर्श उभा केला. संभाजीराजे मृत्युंजय धर्मवीर बनले! छत्रपतींच्या या निग्रही बलिदानामुळे सारा महाराष्ट्र पेटून उठला! गावागावातली तरणीबांड मराठी पोरे हाती मिळेल ते शस्त्र घेऊन संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या पराक्रमी सेनापतींच्या नेतृत्वाखाली मोगली मुलखात अक्षरश: तांडव घालू लागली! शंभूराजांच्या पश्‍चात १८ वर्षे स्वातंत्र्याचा वणवा महाराष्ट्रात धगधगत राहिला आणि याच वणव्यात हिंदुस्थानवर हिरवा बावटा फडकवण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसह औरंग्याही जळून खाक झाला.
पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावापिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावाhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24