2 उत्तरे
2
answers
अरबी कल्याणम ही केरळमधील प्रथा काय आहे?
0
Answer link
अरबी कल्याणम ही केरळमधील एक प्रथा आहे. या प्रथेनुसार, आखाती देशांतील (अरब राष्ट्रांतील) पुरुष केरळमध्ये येतात आणि गरीब घरातील तरुण मुलींशी लग्न करतात. बहुतेक वेळा हे विवाह अल्प कालावधीसाठी असतात आणि या विवाहांचा उद्देश केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करणे किंवा काही आर्थिक लाभ मिळवणे असतो.
या प्रथेमुळे अनेक समस्या निर्माण होतात, जसे की:
- मुलींचे शोषण: अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्याशी विवाह केला जातो, ज्यामुळे त्यांचे शोषण होते.
- सामाजिक समस्या: अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांचे भविष्य असुरक्षित असते, कारण त्यांचे वडील बहुतेक वेळा त्यांना सोडून निघून जातात.
- मानবাধিকার उल्लंघन: या प्रथेमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होते, कारण महिलांना वस्तू म्हणून वापरले जाते.
या प्रथेवर अंकुश लावण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था प्रयत्न करत आहेत. तसेच, शासनाने या विरोधात कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
0
Answer link
*💥 अरबी कल्याणम*
————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
कल्याणम हा आमच्या मल्याळम भाषेतील शब्द, आम्हा मलबारी मुस्लिम समुदयात निकाह या अर्थनी वापरला जातो. आत्ता कुठे मी शाळेत रुळायला लागले होते. https://bit.ly/4iS6LQE केरळ मधील मल्लापुरम शहर सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच गावची मी. सहा भावंडांमधील मी एक, माझी अम्मी किरकोळ भाजी विकून आमचे घर चालवते. माझे अब्बा कुठे तरी दूर निघून गेले आहेत आणि लवकरच ते येतील असे ती सांगत असते. पण माझ्या वडिलांनी दूसरा का तिसरा निकाह केला आहे आणि त्यांनी माझ्या आईला कधीच तलाक दिला असे माझे नातवाईक आणि शेजारी सांगतात. एकूणच सगळ्या पररिस्थितीचा माझ्या अशिक्षित आईवर व्हायचा तो परिणाम झाला. माझ्या आईवर अशी वेळ आणणारे माझे अब्बा एक पुरुष असले तरी माणूस नक्कीच नाहीत.
आमची हलाखीची परिस्थिति बघून आम्हा बहिणीना मुस्लिम समाजाने चालवलेल्या एका यंतीम खान्यात (अनाथ आश्रम) ठेवण्यात आले. यंतीम खाना कुठला कोंडवाडाच तो. मला मिळणारे शिक्षण सोडले तर या अश्या गंदया ठिकाणी मला का ठेवले असा प्रश्न मला बऱ्याच वेळा पडायचा ? ते लोचट पुरुष, त्यांचे विखरी स्पर्श नको झाले होते मला जगणे. पुढे आमचे सुपरिटेनडन्ट बदलले आणि वातावरण जरा सुधारले. हे साहेब खूप धार्मिक वृत्तीचे होते. त्यामुळे शाळेच्या अभ्यास सोबत मजहबी तालिम घेणे बंधनकारक होते. एकूणच मला शाळेची, शिक्षणात गोडी वाटू लागली. मी स्टेट बोर्डची परीक्षा खूप चांगल्या मार्क मिळवून पास झाले. माझ्यातील धीटपणा मला जीवनामध्ये काही तरी करून दाखवण्यासाठी प्रेरणा देत होते.

आता माझे वय माझे सौन्दर्य लपवून ठेऊ शकत नव्हते. मला वाटायचे मी सुंदर आहे, हुशार आहे, धीट आहे, चांगली शिकेन , नोकरी करेन आणि आणि .... मला समजून घेणारा, मला सगळी सुखे देणारा, दिसायला सुंदर , श्रीमंत असा शहजादा येईल आणि माझा संसार जन्नत सारखा होईल.
”ए चल तुम्हा सगळ्या मुलींना परेडला बोलवले आहे. बघू आज कोणाची लॉटरी लागते ते.” घाणेरड्या नजरेने बघत शिपाई बोलला.
माझ्या शेजारची मुलगी फार घाबरली. मागच्या एक दोन परेडला मी पण गेले होते. पण माझा नंबर आलाच नव्हता. त्यात काय एवढे घाबरायचे. पण या सगळ्यात माझे स्वप्न मात्र तुटले.
आम्ही सगळ्याजणी बुरखा घालून हॉलच्या रिकाम्या जागेत एका रांगेत उभ्या राहिलो. मी जरा कडेने काय होत आहे ते पहिले तर, एक अरब इसम साधारण 30 चा असावा तो एक एक मुलीसमोर उभा राहायचा आणि पुढे जायचा. असे करत तो माझ्या समोर आला. कोणी तरी माझ्यावर खेकसल, मी बुरखा बाजूला करून माझा चेहरा दाखवला. त्या अरबाच्या चेहऱ्यावर पसंतीचे हासू दिसले, मी झटकन बुरखा खाली घेतला. त्याला माझी माहिती सांगण्यात आली. आम्हा सगळ्यांना जायला सांगण्यात आले. माझ्या मैत्रिणी मला चिडवत होत्या. ज्या थोड्या वयाने मोठ्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मी मात्र पुरती गोंधळीली होते.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫दुसऱ्या दिवशी सकाळीच माझी आई आली. साहेबानी तिला काही तरी सांगितले. ती माझ्या जवळ आली आणि एवढेच म्हणाली “जे होतय त्याला हो म्हण.” थोड्याच वेळात मला नवीन कपडे घालण्यात आले आणि दुसऱ्या एका खोली मध्ये नेण्यात आले. तिथे एक काजी.. मुल्ला असे कोणी तरी आले. मला काही माहिती नसताना माझा निकाह पढण्यात आला. मला धाक दाखवून,
रेहाना बेगम आप को .. इतने मेहर के साथ ,
जनाब जसम मोहम्मद के साथ निकाह ..
कुबुल कुबुल कुबुल असे म्हणवून घेतले.
थोड्याच वेळात माझी रवानगी माझ्या शोहरच्या घरी झाली.
माझा संसार सुरू झाला. माझा शोहर कधीपण यायचा मला खोलीत घेऊन जायचा. दिवस नाही रात्र नाही. त्याच्या मनात येईल तेंव्हा आणि मनाला येईल तसे.
शी ss..
नाही म्हणले तर आहेच मारहाण , सिगरेटचे चटके.
जल्लाद सुद्धा बरा! त्याला थोडी तरी दया येण्याची शक्यता असते.
औरतने शोहरच्या मर्जीत राहिले पाहिजे. औरत हे शोहरचे शेत आहे. त्याच्या मालकीचे असे लिहूनच ठेवले आहे ना? तिला कुठे मन असते? त्याने पैसा फेकला आहे, मग तो वसूल करणारच ना? खरच औरतचा जन्म नको, त्यात मुस्लिम औरतचा तर नकोच नको आणि हे असले अरबी कल्याणम तर दुश्मनच्या वाट्याला पण यायला नको.
माझ्या सासुला पण हयात काही विशेष वाटले ना माझ्या आईला.
माझ्या सासूचा पण असाच अरबी कल्याणम पद्धतीचा निकाह झाला होता. ती तलाकशुदा असून तिने दूसरा निकाह केला होता. पण जसम मोहम्मद त्याचे अब्बा त्यांच्या सोबत अरबस्तानात घेऊन गेले. अधूनमधून त्याला त्याच्या अम्मीला भेटायला मिळायचे.
एक औरत असून त्याच परिस्थितीमधून जाऊन ही तिला माझ्या बद्दल हमदर्दी वाटली नाही.
पुढे जाऊन कळले की आमचा हा असला निकाह घडवून आणण्यात तिचा मोठा वाटा होता.
आमचा निकाह जून महिन्यात झाला. महिना अखेरीस तो मला न सांगता अरबस्तानात निघून गेला. माझ्या सासूने पण मला काही सांगितले नाही.
अचानक १ जुलैला माझ्या शोहरचा जसम मोहम्मद फोन आला. त्याने मला फोन वरुण तीन वेळा तलाक म्हणून आमचा मुताह निकाह खारीज करून टाकला.
मी सासुला सांगायला गेले तर तिने मला घरातून हाकलून दिले.
मी रस्त्यावर आले.
मी स्वत:ला सावरले. एक एक गोष्टीचा छडा लावत असताना लक्षात आले की यंतीम खान्याचे सुपरिटेनडन्ट, काजी, मुल्ला, कोणी तरी दलाल आणि आमच्या येथील राजकीय नेता सगळे यात सामील आहेत. सगळ्यांचे हात या निकाह मध्ये ओले झाले आहेत.
मी इन्साफ मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण पदरी निराशाच पडली.
माझी आणि माझ्या आईची फसवणूक झाली. या काही दिवसात मी काही सुखात असेन या वेड्या कल्पनेत होती माझी अम्मी.
मी हार मानली नाही, जिल्ह्याच्या बाल कल्याण विभागात मी तक्रार केली. कोण जाणे कशी मीडियामध्ये या निकाहची खूप चर्चा झाली. पोलिसांनी माझ्या सासुला अटक केली.
माझ्या सासूने माझ्या चारित्र्यावर संशय घेत माझे कोण्या परपुरुषावर प्रेम असल्याचा कांगावा केला.
ज्या मशिदीमध्ये आमचा निकाह रजिस्टर झाला होता त्यांनी हा निकाह कायद्याला धरून आहे. आणि रेहना म्हणजे मी जिचे लग्न १७ व्या वर्षी झाला हा इस्लामी कायद्यानुसार नाबालिक निकाह नसून बालिक निकाह आहे. असेच वारंवार सांगण्यात आले.
माझ्या सोबत जे काही झाले ते आमच्या मजहबला मान्य आहे, नाही मजहबी कानूनला नुसारच आहे. बघूयात भारत देशाचा कानून मला आणि माझ्या सारख्या असंख्य पीडितांना इन्साफ देईल का ? 'अरबी कल्याणम'च्या व्हीकटीम असणाऱ्या माझ्या एकटीची ही कहाणी नाही तर अश्या अनेक जणी आहेत.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
एका केरळी मुस्लिम स्त्रीची वास्तववादी कैफियत

तिथे गेल्यावर तेथे एक महिला होती, ती माझी सासू बेगम सुलैकाने मी कशी भाग्यवान आहे, किती सोने आणि पैसे अशी मेहर देऊन निकाह झाला इत्यादि मला सांगितले. काही वेळात माझा शोहर आला. हा तोच कालचा अरबी माझ्याकडे बघून हसला होता.खूप पूर्वी अरब व्यापारी मलाबरच्या किनाऱ्यावर मसाल्याचे पदार्थ, कापड, जहाज बांधणी इत्यादि साठी त्यांच्या देशापासून, कुटुंबापासून, कायदेशीर खातून पासून दूर यायचे तेंव्हा त्यांच्या मनोरंजनासाठी जिस्मच्या सोयीसाठी म्हणून अरबी कल्याणम, अर्थात अरबी पुरुष आणि स्थानिक मुस्लिम मुलगी यांचा निकाह केला जायचा. आमच्या मजहब मध्ये जिस्म फरोशी (वेश्या गमन किंवा व्यवसाय ) हराम म्हणजे पाप मानले जाते. म्हणून त्यासाठी असे मुदतीचे मुताह निकाह केले जातात. अरब येतो मेहरच्या नावाखाली रक्कम देतो आणि तात्पुरते लग्न करतो. त्याचे काम झाले की किंवा गरज संपल्यावर न सांगता, परत येतो असे वचन देऊन किंवा तलाक देऊन निघून जातो. याला म्हणतात अरबी कल्याणम. आपल्या पैकी अनेकांना हा शब्द ही संकल्पना माहिती पण नसेल.
त्याक्षणीच काय त्यानंतरही मला काय वाटले, माझी काय स्थिति झाली हे सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण जे काही झाले ते अरबी कल्याणम.