2 उत्तरे
2
answers
डनहिल सिगरेट कंपनी कशी स्थापन झाली?
0
Answer link
डनहिल सिगरेट कंपनीची स्थापना अल्फ्रेड डनहिल यांनी लंडनमध्ये 1907 मध्ये केली.
सुरुवात:
- अल्फ्रेड डनहिल यांनी वडिलांचा तंबाखूचा व्यवसाय सांभाळला आणि त्यात सिगारेटचा समावेश केला.
- त्यांनी स्वतःच्या नावाने 'अल्फ्रेड डनहिल लिमिटेड' कंपनी सुरू केली.
- सुरुवातीला, त्यांनी वाहनचालकांसाठी कपड्यांचे आणि एक्सेसरीजचे उत्पादन सुरू केले, परंतु लवकरच तंबाखू उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले.
प्रसिद्धी:
- डनहिल सिगारेट उच्च प्रतीची तंबाखू आणि उत्कृष्ट चवीसाठी लवकरच प्रसिद्ध झाली.
- कंपनीने विविध प्रकारच्या सिगारेट बाजारात आणल्या, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली.
विस्तार:
- पहिल्या महायुद्धानंतर, डनहिलने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय वाढवला.
- आज, डनहिल ही जगातील सर्वात प्रसिद्ध सिगारेट कंपन्यांपैकी एक आहे.
संदर्भ:
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
0
Answer link
*🏪 डनहिल सिगारेटची कथा*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
लंडनच्या एका चर्चमधे‘अल्फ्रेड डनहिल’(Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन रोज झाडून काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता.

चर्चमधे काम करणा-या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे, असा या चर्चचा नियम होता. डनहिल तर अशिक्षित होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते. त्या चर्चचा जो मुख्य पाद्री म्हणजेच फादर होता, त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती. म्हणूनच डनहिलसारखा एक अशिक्षित माणूस त्या चर्चमधे काम करू शकत होता. https://bit.ly/4lzYiUf
डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत तेथे काम केले. वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले की डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही, तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले.
डनहिलला जाणवले की त्याच्या या उतारवयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. तुम्ही उतारवयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकवू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच.
एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध बॉन्डस्ट्रीटवर आला. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली म्हणून त्याने सिगारेटचे दुकान शोधायला सुरूवात केली. त्याला आख्ख्या बॉन्डस्ट्रीटवर कूठेही सिगारेटचे एकही दुकान आढळले नाही.
शेवटी बाजूच्या एका छोट्या गल्लीत सिगारेटचे एक छोटेसे दुकान आढळले. 'आपण बॉन्ड स्ट्रीटवर जर सिगारेटचे दुकान टाकले तर ?' डनहिलच्या मनात आले. लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला.
त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व बॉन्ड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगारेटचे दुकान चालू केले. बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू लागला.
त्याने बघितले की त्याच्या दुकानात येणा-या ग्राहकांपैकी बरेच ग्राहक हे बॉन्ड स्ट्रीटच्या पलिकडच्या बाजूने येतात. लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले. बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत, तीन वर्षात सोळा झाली.
अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रॅन्ड झाला.
पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगारेट्स बनवायला सुरूवात केली व ‘डनहिल’ या ब्रॅन्डखाली सिगारेट्स विकायला सुरूवात केली व तो पाच वर्षात लक्षाधीश झाला.
त्याच्या सिगारेटससाठी सतत तंबाखूचा पुरवठा व्हावा, त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणा-या शेतक-यांबरोबर अॅग्रीमेन्ट करायला तो स्वतः अमेरिकेला गेला. या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतक-यांचे नशीब तर फळफळलेच, पण तो करार हा एक महत्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला. कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्थित होते. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या. पण डनहिलने मात्र आपला अंगठा उमटवला, कारण त्याला सही करायला येत नव्हती.
हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावित झाले व डनहिलला म्हणाले,
‘सर. हे खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे काहीही शिक्षण झालेले नसताना देखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत. जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते ?’
डनहिलने त्यांना मिस्किलपणे उत्तर दिले, ‘मला जर लिहीता वाचता आले असते तर अजूनही मी चर्चमधे झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहिलो असतो’
आजसुद्धा ‘डनहिल’ हा जगप्रसिद्ध सिगारेट ब्रॅन्ड आहेआहे अन ही अगदी खरी गोष्ट आहे.