औषधी वनस्पती आरोग्य

आंबेहळदचे फायदे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

आंबेहळदचे फायदे काय आहेत?

0
आंबेहळद (Ambahalad) चे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
  • त्वचेसाठी फायदेशीर: आंबेहळद त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. ती त्वचेला चमकदार बनवते आणि डाग कमी करते.
  • जखम आणि सूज कमी करते: आंबेहळदमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म (anti-inflammatory properties) असतात, त्यामुळे ती जखम आणि सूज कमी करण्यास मदत करते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते: आंबेहळदमध्ये एंटीऑक्सीडेंट्स (antioxidants) भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • पचनासाठी उत्तम: आंबेहळद पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते.
  • सांधेदुखीमध्ये आराम: आंबेहळद सांधेदुखी आणि संधिवाताच्या त्रासांना कमी करू शकते.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 4/4/2025
कर्म · 220
0
बहुपयोगी आंबेहळद






————————————————
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
 रोजच्या वापरातल्या हळदीपेक्षाही औषधी हळदीची एक प्रजाती आहे. https://bit.ly/4cBklWx ती म्हणजे आंबेहळद. आयुर्वेदात तसेच अनेक भारतीय औषधांसंबंधीच्या पुस्तकांमध्ये आंबेहळदीचा उल्लेख आहे. अनेकांना हळदीची ही प्रजाती माहितीच नाही. पण घरात आंबेहळद असायलाच हवी. ती फार उपयुक्त असते. दिसायला आल्यासारखी असते. किसून वापरता येते उगाळून वापरता येते. उकळूनही वापरता येते. अनेक कमालीचे फायदे आहेत. 
१. आंबेहळद म्हणजे त्वचेसाठी वरदानच आहे. आपण त्वचेवरचे डाग जावे किंवा पिंपल्स जावे यासाठी अनेक उपाय करत असतो. पण जर आठवड्यातून दोनदा जरी आंबेहळदीचा लेप चेहर्‍याला लावलात तर इतर उपाय करावेच लागणार नाहीत. ऊन्हामुळे चेहर्‍याची पार वाट लागून जाते. चेहरा अगदीच काळवंडतो. त्यावरही आंबेहळद हा मस्त उपाय आहे. चेहऱ्याचा जो खरा रंग आहे तो पुन्हा दिसायला लागतो. 
२. जठराग्नि हा पचनसंस्थेतील एक महत्वाचा भाग आहे. पोटात अन्न गेल्यावर त्याचे रुपांतर ऊर्जेत करण्यासाठी जठराग्नि गरजेचा असतो. ही पचन क्रिया सुरळीत व्हावी यासाठी आंबेहळद फायदेशीर ठरते. 
३. अनेकदा रक्त गोठून एखादा अवयव काळा निळा पडतो. ते रक्त तसेच गोठलेले राहिले तर गाठ तयार होऊ शकते. असे होऊ नये म्हणून गोठलेल्या रक्तावर वेळीच उपाय करायला हवे. आंबेहळदीचा लेप गोठलेल्या अवयवावर लावल्याने रक्त सुटते. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫
४. आहारामध्ये आंबेहळदीचा समावेश करून घ्या. त्याचे लोणचेही तयार केले जाते. ते खाल्ले तरी फायद्याचे ठरेल. इतरी पदार्थांमध्ये वापरा. काढा करून प्या. आंबेहळदीचा वापर केल्याने भूक सुधारते. योग्य तेवढीच भूक लागते.
५. पित्ताचा त्रास असेल तर आंबेहळद घरात असायलाच हवी. आंबेहळद ही उत्तम पित्तशामक आहे. उगाळून पोटाला लावा. काढा करून प्या. पित्ताचा त्रास हळूहळू नाहीसा होईल.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24