कायदा न्यायालयीन प्रक्रिया

न्यायालयाचे समन्स म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

न्यायालयाचे समन्स म्हणजे काय?

0

न्यायालयाचे समन्स म्हणजे न्यायालयाकडून पाठवलेले एक औपचारिक नोटीस असते. हे एक महत्त्वाचे कायदेशीर कागदपत्र आहे.

समन्सचा अर्थ:

समन्स म्हणजे कोर्टाचे बोलावणे. जेव्हा तुमच्याविरुद्ध न्यायालयात कोणताही खटला दाखल होतो, तेव्हा न्यायालय तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठवते.

समन्समध्ये काय असते?
  • न्यायालयाचे नाव आणि पत्ता
  • खटल्याचा प्रकार आणि क्रमांक
  • तुमचे नाव आणि ज्याने खटला दाखल केला आहे त्याचे नाव
  • तुम्हाला कोणत्या तारखेला आणि वेळेला न्यायालयात हजर राहायचे आहे त्याची माहिती
  • तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी न्यायालयात हजर राहायचे आहे (उदाहरणार्थ, साक्षी देण्यासाठी, कागदपत्रे सादर करण्यासाठी)
  • न्यायालयाच्या अधिकाऱ्याची सही आणि शिक्का
समन्स मिळाल्यावर काय करावे?
  • समन्स गांभीर्याने घ्या.
  • ठरलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहा.
  • जर तुम्ही हजर राहू शकत नसाल, तर न्यायालयाला योग्य कारण सांगा आणि तारीख पुढे ढकलण्याची विनंती करा.
  • तुम्ही वकिलाची मदत घेऊ शकता.
जर तुम्ही समन्सला उत्तर दिले नाही तर काय होईल?

जर तुम्ही समन्सला उत्तर दिले नाही किंवा न्यायालयात हजर राहिला नाहीत, तर न्यायालय तुमच्याविरुद्ध एकतर्फी निर्णय देऊ शकते किंवा वॉरंट जारी करू शकते.

अधिक माहितीसाठी:
उत्तर लिहिले · 2/4/2025
कर्म · 220
0
*✨ न्यायालयाचे समन्स म्हणजे काय असते



————————————————


————————————————
*🛟समन्स म्हणजे काय?*
एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकरणात चौकशीला हजर राहण्यासाठी देण्यात आलेली कायदेशीर सूचना अथवा आदेश म्हणजे समन्स! यावर कायद्याची कलमे, हजर राहण्याची कारणे, संबंधित सरकारी कार्यालयाचा शिक्का व समन्स बजावण्याचा अधिकार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची सही असते. समन्सद्वारे व्यक्तीला न्यायालयात, पोलिसांसमोर किंवा संबंधित तपास यंत्रणेसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले जातात.
*🛟समन्सचे किती प्रकार असतात?*
समन्सचे न्यायालयीन व पोलीस समन्स असे दोन प्रकार असतात. नावाप्रमाणे न्यायालयीन समन्स न्यायमूर्ती जारी करतात, तर पोलीस समन्स हे वरिष्ठ पोलीस अधिकारी जारी करतात.
*🛟१. न्यायालयीन समन्स*
एखाद्या खटल्यात साक्षीदार, आरोपी किंवा संबंधित पक्षाला हजर राहण्याचे आदेश दिले जातात.
*🛟२. पोलीस समन्स*
पोलीस समन्स हे पोलीस खात्याकडून जारी केलं जातं. तपासादरम्या माहिती मिळवण्यासाठी किंवा चौकशीला हजर राहण्यासाठी पोलीस समन्स बजावून संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावतात.
*🛟समन्सची प्रक्रिया*
भारतीय दंड संहितेतील १९७३ च्या कलम ६१ व ६९ अंतर्गत समन्सशी संबंधित तरतुदी करण्यात आल्या आहेत. साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी बोलावणे, आरोपीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देणे, जामीन मिळू शकेल अशा खटल्यात व अजामीनपात्र गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात समन्स बजावलं जातं. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫समन्स हे सामान्यतः पोस्टाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिलं जाऊ शकतं. संबंधित व्यक्ती समन्स स्वीकारण्यास तयार नसेल, नकार देत असेल किंवा टाळाटाळ करत असेल तर अशा प्रकरणात न्यायालय वॉरंट जारी करू शकतं.
*🛟समन्स कोण बजावू शकतं?*
न्यायालय व पोलीस यंत्रणेला समन्स बजावण्याचा अधिकार आहे. यासह इतर काही शासकीय प्राधिकरणांना जसे की ट्रिब्युनल, आयकर विभाग, सीमा शुल्क विभाग, ईडी, सीबीआयला देखील समन्स बजावण्याचा अधिकार आहे.