गाव
प्रत्येक गावाचे दैवत कोण आहे?
1 उत्तर
1
answers
प्रत्येक गावाचे दैवत कोण आहे?
0
Answer link
प्रत्येक गावाचे दैवत कोण आहे
देवता ही धर्म या विषयातील एक संकल्पना आहे.[१] ईश्वर हा सर्वव्यापी आहे, असे सर्व धर्मांत मानले जाते. असे असले तरी, प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. देवता संकल्पनेत स्थान देवता, ग्राम देवता, लोक देवता, घरोघरी पूजिल्या जाणा-या देवता, मंदिरांमध्ये पूजिल्या जात असलेल्या देवता, पाण्याच्या जागी, डोंगरात, जंगलात पूजनीय देवता असे विविध प्रकार दिसून येतात. महाराष्ट्र राज्यात उपास्य अशा देवता पुढीलप्रमाणे-
देवता
श्री.गांगेश्वर (मु.खडीकोळवण - कोकण)
श्री.देव मार्लैश्वर (मु.मारळ - कोकण) कोकणातील जागरुक देवस्थान,
अंचलेश्वर (चंद्रपूर) - अंचलेश्वर मंदिराची माहिती - [२]
अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)
अरण्येश्वर (पुणे)
उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)
कनकेश्वर (फोफेरी-अलिबाग, कुलाबा जिल्हा)
कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)
कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.)
कल्याणेश्वर (तळेगाव दाभाडे)
काळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.)
काळभैरवनाथ (मावळ तालुक्याचे आराध्यदैवत आणि वडगाव गावाचे ग्रामदैवत). पिंपरी (पुणे) गावातही काळभैरवनाथाचे एक देऊळ आहे.
केदार वाघिवरे, वरळी, मुंबई
कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
कोनबाबा (जांभारी, रत्नागिरी जिल्हा)
खडकेश्वर (तळेगाव दाभाडे)
खंडोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
खेमदेव ( वाघिवरे चिपळूण ;साखरोली गवळीवाडी खेड तालुका. रत्नागिरी जिल्हा
खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे आहे.)
गणपती (हा खास मराठी देव आहे, महाराष्ट्राबाहेर याला गणेश म्हणतात! मधलीवाडी, वाघिवरे तालुका-चिपळूण येथे श्री हितवर्धक गणेश मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेश जयंती तिथीला श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त गावात श्रींच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. वाघिवरे पंचक्रोशीतून भाविक गणपतीचे दर्शन करण्यासाठी येतात )
गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
भगवान जाहरवीर गोगादेव (मेहतर वाल्मीकी समाजाचा देव, सासवड.)
गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)
घृष्णेश्वर - (शिवाचे एक रूप.-औरंगाबादजवळ वेरुळ येथे मुख्य मंदिर आहे.)
घोरवडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)
जिव्हेश्वर (स्वकुल साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.)
जीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.)
ज्योतिबा
चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)
जबडेश्वर (माळेगाव-टाकवे बुद्रुक)
झुलेलाल (सिंधी देव)- या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत. साधारणत: जेथे सिंधी समाजाची वसती आहे तेथे हा देव असतो. हिंदूच्या जलदेवतेशी(वरुण) साधर्म्य साधणारी ही देवता आहे. जेको चवन्दो झुलेलाल, तहिंजा थिंदा बेडा पार.(जो झुलेलाल म्हणतो(चा जप करतो), त्याचा बेडा पार होतो.)[३]
डोळसनाथ (तळेगाव स्टेशन भागात-पुणे जिल्हा)
तेलंगराय बाबा (सारंगपुरी, वर्धा जिल्हा)
त्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
त्र्यंबकेश्वर
दंडनाथ, (सांगली जिल्हा)
दत्त (पूर्ण नाव दत्तात्रेय) आणि त्याचे तथाकथित अवतार. मुख्यत: महाराष्ट्रात आणि त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात पूजले जाणारे देव)
दरीदेव
दैत्यसूदन, लोणार (बुलढाणा जिल्हा)
धनेश्वर (चिंचवडगाव-पुणे)
धूतपापेश्वर (राजापूर, रत्नागिरी जिल्हा)
नागनाथ
नागेश्वर
पंढरीनाथ
पल्लीनाथ
पांडुरंग
पाताळेश्वर-मूलत:पूण्यातले एक शिव मंदिर, येथे पाताळेश्वराची लेणी आहेत. नागपूरच्या महाल भागातही याचे एक मंदिर आहे.[४]
पिंगळभैरव
पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा (चाळीसगाव)
पोटोबा महाराज (वडगाव-मावळ येथील देवस्थान)
बनेश्वर (तळेगाव दाभाडे)
बहिरीदेव उर्फ भैरव देव (सारडे-उरण, रायगड जिल्हा)
बामोशी बाबा दर्गा (चाळीसगाव)
बाळकृष्ण
बिरदेव
बिरोबा (मूळचा वीरभद्र). हा धनगर समाजाचा देव आहे. याची देवळे आरेवाडी (तालुका कवठेमहांकाळ), वडवणी (बीड जिल्हा), मिरी (तालुका पाथर्डी) वगैरे गावांत आहेत.
बोल्हाई (या देवीचे देऊळ पिंपरी सांडस गावाजवळ आहे).
भद्रेश्वर (वाई)
भानोबा (कुसेगाव, तालुका दौंड-पुणे जिल्हा)
भीमाशंकर
भुलेश्वर
भैरवनाथ (आगडगाव-अहमदनगर जिल्हा; आंबेगव्हाण-जुन्नर तालुका; सिन्नर-नाशिक जिल्हा; खडकवासला-पुणे)
भैरीदेव (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
मल्लारीखंडोबा
मल्लारीमार्तंड
मस्तानी अम्मा टेकडी दर्गा (चाळीसगाव)
मारुती : ह्या देवाला महाराष्ट्राबाहेर हनुमान म्हणूनच ओळखले जाते. मारुती हा खास मराठी देव आहे.
मार्तंडभैरव
मुंजाबा (मुंजोबा?) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत.
म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका, पुणे शहर ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत. साधारणतः रस्त्यास असलेल्या घाटात(डोंगर चढाय-उतरायला केलेला वळणावळणाचा रस्ता)याची देवळे असतात. वाहनचालक घाटात त्यांच्या वाहनाला अपघात होऊ नये म्हणून याची घाटात शिरतेवेळी/निघाल्यावर पूजा करतात. म्हसोबाला पत्नी नाही. त्यावरून मराठीत ’म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा!’ अशी म्हण आहे. हा खास मराठी देव आहे.
म्हातोबा (कोथरूडचे ग्रामदैवत असलेल्या या देवाचे स्थान पुण्यातील कोथरूडच्या म्हातोबा गडावर आहे.)
म्हादोबा
म्हाळसाकांत
रवळनाथ : मुख्यत्वे कोकणात - निरुखे गाव-कुडाळ तालुका; पणजी-गोवा; सातार्डे-सावंतवाडी तालुका; एडगाव (वैभववाडी), वगैरे. अधिक माहिती पु.रा. बेहेरे यांच्या ’श्री रवळनाथ आणि कोकणातील देवस्की’ या पुस्तकात.
रायरेश्वर
रूपनारायण
रोकडोबा (शिरगाव-मावळ गावाचे ग्रामदैवत
वटेश्वर (टाकवे बुद्रुक)
वरदायिनी माता (वडगाव मावळ)
वाकेश्वर (वाई)
वाघेश्वर (चऱ्होली-पुणे जिल्हा)
व्याघ्रेश्वर (याचे देऊळ गुहागर येथे आहे).
वाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव (अहमदनगर जिल्हा), दटषिवा (?), मुबई, पातूर (अहमदनगर जिल्हा), बांदा (सिंधुदुर्ग जिल्हा), वगैरे.
विठ्ठल
वीरभद्र
वेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत. हा भुतांचा राजा आहे.
वेताळेश्वर (तळेगाव दाभाडे)
वेतोबा
व्याघ्रेश्वर ( वाघिवरे चिपळूण )
शंकर (याला महाराष्ट्राबाहेर शिव, शिवशंकर,गौरीशंकर, महादेव किंवा भोलेनाथ आदी नावांनी ओळखतात.)
शकुंतेश्वर (वडुथ-सातारा जिल्हा)
शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
(हजरत गारपीर) शहावली बाबा (तळेगाव दाभाडे खिंड)
शिवघाटेश्वर (शिंदेवाडी, टाकवे बुद्रुक)
श्रीमाऊली
साईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित)
सिद्धिविनायक
सिद्धेश्वर (मांडवगण-अहमदनगर जिल्हा; रायवुड(राई) लोणावळा; सोलापूर)
सुवर्णेश्वर
सोमेश्वर ( वाघिवरे , चिपळूण ; सडये पिरंदवणे, रत्नागिरी )
हजरत गफूरशाह हुसैनी कलंदर (पुण्यातील दारूवाला पुलावरचा पीर)
हजरत मोहंमदशाह हुसैनी (पुण्यातील दारूवाला पुलावरचा दुसरा पीर)
हरणेश्वर (हरणेश्वर टेकडी, तळेगाव दाभाडे)
हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)
देवी
अञाल (खडीकोळवण - कोकण)
पांढर - ठोंगल
पद्माक्षी रेणुका कावाडे(अलिबाग)
अन्नपूर्णा
अंबाबाई (आंबाबाई), अंबादेवी (अमरावती)
अंबेजोगाई/(योगेश्वरी) (अंबाजोगाई)
अमरजाई (अमरदेवी), शेलारवाडी (देहूरोड-पुणे)
आंगलाई देवी (सज्जनगडावर)
आसरा (सातीआसरा) (मावलाया)
इंगलाई (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
उदगिरीदेवी (भोवडे वरचीवाडी-संगमेश्वर)
एकवीरा (कार्ल्याचा डोंगर-पुणे जिल्हा). जत तालुक्यातील डफळापूरपासून १ मैलावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत ’एकवीरा देवी मंदिर’ नावाचे गाव आहे.तसेच अमरावती येथेही एकवीरा देवीचे मंदिर आहे.
कडजाईमाता (इंदोरी-मावळ)
कनकंबादेवी, (करकंब)
कळमजाई माता, (जुन्नर तालुक्यातील आळेफाट्याजवळील ’वडगाव आनंद’पाशी असलेला मोरदरा परिसर)
कांगोरी देवी, (मंगळगड-रायगड जिल्हा).
कानूबाई (पुणे). लाडशाखीय वाणी समाजाची देवी
कासारदेवी (पुणे). त्वष्ठा कासार समाजाची देवी
काळकाई (वाघिवरे, चिपळूण ;खेड तालुका भरणे, जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
काळबादेवी (मुंबई)
काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीलाही काळूबाईचे एक देऊळ आहे.)
काळेश्वरी (वाघिवरे,चिपळूण )
कुंभळजाई
कृष्णाई (घडशी समाजाची देवी), शुक्रवार पेठ(पुणे)
केंजळाई, केंजळगड-सातारा जिल्हा
केजू देवी (कोथरूड-पुणे)
करंजेश्वरी (चिपळूण)
कोंडजाई (पोलादपूर, रायगड)
कोमनादेवी (सारडे-उरण, रायगड जिल्हा)
खंबाळकालकाई
खराळआई (खराळवाडी-पिंपरी, पुणे)
खेडजाई (खेड तालुका ,रत्नागिरी)
रेडजाई (खेड , चिपळूण, दापोली)
पाथरजाई (खेड, चिपळूण , दापोली)
वरदायिनी ( खेड, चिपळूण , दापोली , गुहागर, रत्नागिरी)
गजगौरी
गढीआई (मांडवगण, श्रीगोंदे तालुका-अहमदनगर जिल्हा)
गामदेवी (मुंबई, दापवली, शिरवली, वगैरे अनेक गावांत)
गावदेवी (मुंबई)
चतुःशृंगी (पुणे)
चंपावती
चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते)
चैत्रगौरी
चौंडाई
चंडिकादेवी , चंडिकाई (कुरनखेड, अकोला; वाघिवरे, चिपळूण)
श्री चंडिकाई कालकाई काळेश्वरी (वाघिवरे, चिपळूण)
जगदंबा
जननीदेवी (ह्या देवीचे देऊळ मुळशी तालुक्यातल्या मुठा गावी आहे).
जरा जिवंतिका
जरीमरी (वरळी, वांद्रे, कुर्ला-मुंबई)
जाखामाता देवी (तुंगार्ली-लोणावळा); (साखरोली गवळीवाडी खेड तालुका. रत्नागिरी जिल्हा)
जानाई (निवखन पाटण, निमसोड)
जिवंतिका (जिवती)
जोगेश्वरी (पुणे शहरात काळी जोगेश्वरी आणि तांबडी जोगेश्वरी अशी दोन देवळे आहेत; प्रसिद्ध मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात अंबेजोगाई येथे; वाघिवरे - चिपळूण)
ज्येष्ठागौरी
झोलाई
तळजाई (पुणे शहर)
तुकाई
तुकादेवी
तुळजाभवानी (तुळजाई)
त्वरितादेवी (तलवाडा-बीड)
तपोवनदेवी (रोहडा, चिखली तालुका)
धानम्मा (गुड्डापूर, जत)
नवलाई
निनाई (चाफळ)
पद्मावती, (पुणे) आणि अन्यत्र
पाथरजाई
पांडजाईदेवी (वाईच्या पांडवगडावर)
पावणाई (निरुखे गाव-कुडाळ तालुका)
पौडगादेवी
प्रभादेवी
पिंगळादेवी नेरपिंगळाई
फिरंगाई
बनशंकरी (महाराष्ट्र व कर्नाटक)
बहिरीदेवी (गडहिंग्लज-कोल्हापूर जिल्हा)
बाणाई
बृहद्गौरी
बोलाई
भद्रकाली
भवानी (तुळजापूर; निमसोड खटाव)
भावकादेवी
भेकराईमाता : या देवीचे देऊळ पुण्यातील फुरसुंगीजवळच्या भेकराईनगरात आहे.
मंगळग्रह (अंमळनेर)
मंगळागौरी
मंगाई
मंडलाई
मानाई
मनुदेवी
मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे.
मसाई/मेसाई देवी (मसाई पठार, पन्हाळा-पावनखिंड पायवाट)
महालक्ष्मी
महाकाली ( आडिवरे, रत्नागिरी)
मळूदेवी. ही देवी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाळद गावची आणि अंदर मावळातल्या कशाळ गावची ग्रामदेवता आहे.
मांढरदेवी
मांढरादेवी
मावलाया (आसरा) :
मुंबादेवी (मुंबई)
मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील ख्रिश्चन देवी)
मोहटादेवी (थेरगाव-पुणे)
मोहिमाता (मोहिमान, निमसोड)
म्हाळसा
महाकाली देवी (चंद्रपूर)
श्री यमाई देवी [औंध (मुळपीठ)-सातारा]
यल्लमा (महाराष्ट्र, कर्नाटक)
येडाई/ येडेश्वरी (येरमाळा, उस्मानाबाद, महाराष्ट्र)
येलंबा
योगेश्वरी (अनेक देवळे, पैकी प्रसिद्ध देऊळ अंबाजोगाई येथे)
रत्नेश्वरी
रंभाई (हिचे देऊळ जेजुरीला आहे.)
रागाई
राणुभवानी देवी
रासाई देवी (अनेक देवळे - वडगावरासाई गावात आणि भीमा नदीवरील धरणाच्या पाण्यात (पुणे जिल्हा), नानगाव (ता. दौंड), आचिर्णे (वैभववाडी-फोंडा रस्ता, सिंधुदुर्ग जिल्हा), असळज (गगनबावडा तालुका) गावात, शेंडूर (कागल तालुका) गावात, सावर्डी (अमरावती तालुका) येथे, चाफेड (देवगड तालुका) गावात, दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी खंदकात, राधानगरी तालुक्यात केळोशी बुद्रुक परिसरात, लांजा गावात, वगैरे)
रेडजाई
रेणुका (माहुरगड - नांदेडपासून १३० लिमी)
ललिता
वडजाई देवी : गावाची नावे- वडजल-माण (सातारा जिल्हा); पौड (पुणे जिल्हा); आरळे (सातारा); धुळे;
वनदेवी
वाघजाई
वाघांबरी ( वाघिवरे- चिपळूण )
वाळंजाई
विठ्ठलाईदेवी (भोवडे वरचीवाडी-संगमेश्वर)
विंध्यवासिनी (चिपळूण, रत्नागिरी जिल्हा). याशिवाय उत्तर प्रदेशात एक मंदिर आहे.
शाकंभरी
शांतादुर्गा (गोवा)
शांतेश्वरी
शारदमणीदेवी
शिरकाईदेवी (शिरकोली-पुणे जिल्हा; तारदाळ-कोल्हापूर जिल्हा; रायगड किल्ला: घोडशेत)
शिवाई
शीतला
शेवताई (पवना धरणामुळे पुनर्वसन करावे लागलेल्या शेवता गावाचे ग्रामदैवत)
सटवाई
सप्तशृंगी (वणी-नाशिक जिल्हा)
सातीआसरा
सुकाई देवी (चिपळूण,खेड, दापोली)
सूकाई कोटेश्वरी (कशेडी,खेड तालुका ,रत्नागिरी)
सालबाई
सोनादेवी
सोमजाई
हरणाई देवी (भूषणगड)
हरतालिका
हिंगलाची येथील यक्षिणी
हिंगलाई
हिंगुळा (चौल-रायगड जिल्हा); अडूळ (रत्नागिरी जिल्हा)
हिंगुळांबिका (सोलापूर)
१४१. सोळजाई (देवरुख,रत्नागिरी)
१४२.जुगाई, सूखाई (कोसुंब,रत्नागिरी)
१४३.श्री देव रणवीर कालिका वाघजाई चंडकी भराडीन विठलादेवी ग्रामदेवता देवस्थान .(शिळ, तालुका रत्नागिरी)