संविधान
संविधानक म्हणेज काय?
3 उत्तरे
3
answers
संविधानक म्हणेज काय?
2
Answer link
संविधानक म्हणेज काय
संविधानक म्हणजे एकामागोमाग एक येणाऱ्या कार्यकारण-भावयुक्त अशा घटनांची शृंखला वा मालिका.ही मालिका चतुराईने व सफाईने गुंफिली पाहिजे. साम्यविरोध धर्मानुसार घटनांची निवड केली अथवा सुखात्मिका, शोकात्मिका, प्रहसन इ. प्रकारांच्या प्रकृतींनुसार घटनांची निवड केली, तरी त्यांतून नाट्यानुभव आविष्कृत झाला पहिजे. नाटकाच्या कथानकात गुंतागुंत, निरगाठ व उकल अशा कथानकाच्या तीन अवस्था प्रत्ययास याव्यात,असेही म्हणता येईल किंवा प्रेक्षकांना सतत उत्कंठा वाटेल अशी ही कथारचना करता येईल. जिज्ञासा, उत्कंठा आणि विस्मययांवर कथानक आकारलेले असते. संविधानक बांधेसूद असले पाहिजे. ते नाटकांच्या अंकांतून विकसित होते आणि उत्कर्षबिंदूला पाहोचते. संविधानका वाचूनही नाटक सिद्ध होऊ शकेल किंवा विशिष्ट क्रमाने-उदा.,आदी, मध्य व अंत-कथानक विकसित न करताही नाटककार नाटक लिहू शकेल.कथानकापेक्षा व्यक्तिरेखा महत्त्वाच्या असतात. घटना काही स्वयंभू नसतात.परस्परविरोधी प्रवृतींच्या व्यक्तींच्या क्रियाप्रतिक्रियांतून प्रसंग निर्माण होतात. एखाद्या वेळी एकाच व्यक्तीच्या मनातील परस्परविरोधी प्रवृत्तींतूनही घटना निर्माण होतात. व्यक्ती याच प्रसंगाच्या कारक शक्ती होत. नाटककार कृति-उक्तींच्या द्वारा व्यक्ती उभ्या करतो. कधी तो एकच व्यक्ती केंद्रस्थानी मानून त्या व्यक्तीच्या इतर व्यक्तींशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांतून नाट्य आविष्कृत करील, तर कधी व्यक्तिसमूहाच्या व्यवहारातील नाट्याचा वेध घेईल,कधी व्यक्तीच्या बाह्यविश्वाचे त्याच्या अंतर्विश्वाशी असलेले अर्थपूर्ण नाते विशद करील.सरळरेषेत जाणाऱ्या ठसठशीत व्यक्तिरेखांपेक्षा कित्येकदा गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तिरेखा प्रभावी ठरतात. नाटकातील व्यक्तिरेखा प्रतीकात्म असू शकेल किंवा विशिष्ट प्रवृत्तीचा निदर्शक असा व्यक्तिनमुना असू शकेल, किंवा प्रातिनिधिक असू शकेल. याशिवाय नाटकातील व्यक्तिरेखा सपाट किंवा गोलाई असलेल्या असू शकतात. अभिप्रेत नाट्यानुभ व आविष्कृत व्हावा, म्हणून वेगवेगळ्या आविष्कारशैलींचा उपयोग केला जातो
0
Answer link
संविधान म्हणजे एखाद्या देशाच्या शासनाचे मूलभूत स्वरूप निश्चित करणारे नियम आणि कायद्यांचे एकत्रीकरण होय.
संविधानामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो:
- सरकारची रचना: सरकार कशा प्रकारे काम करेल, अधिकार कोणाकडे असतील हे स्पष्ट केले जाते.
- नागरिकांचे अधिकार: नागरिकांना कोणते अधिकार मिळतील, त्यांचे संरक्षण कसे केले जाईल हे सांगितले जाते.
- कायदे: देशात कोणते कायदे असतील आणि ते कसे बनवले जातील हे नमूद केले जाते.
थोडक्यात, संविधान हे देशाचा पाया असतो ज्यावर देशाचे कायदे आणि नियम आधारित असतात.