मराठा
मराठा बद्दल माहिती?
1 उत्तर
1
answers
मराठा बद्दल माहिती?
1
Answer link
🚩 मराठा 🚩
पंजाब,सिंध,गुजरात ,मराठा, द्राविड,उत्कल, बंग,
विंध्य ,हिमाचल, यमुना-गंगा उच्छल जलधी तरंग
वरील ओळी भारताच्या म्हणजे आपल्या राष्ट्रगीतातील आहेत,हे राष्ट्रगीत सर्वानुमते मान्य आहे .
वरील ओळींमध्ये राष्ट्रगीत रचयिता आपणास संपूर्ण भारत भूमीची ओळख करून देतो
पंजाब -भारत आणि पाकिस्तान मधील पाच नद्यांचा प्रदेश जे लोक पंजाबी बोलतात
सिंध-भारत पाकिस्तान मधील सिंधू नदीचा प्रदेश जे लोक सिंधी भाषा बोलतात
गुजरात- गुजरात आणि राजस्थान चा प्रदेश जे लोक गुजराती मारवाडी भाषा बोलतात
मराठा- महाराष्ट्र प्रदेश आणि जे लोक मराठी भाषा बोलतात
द्रविड-दक्षिण भारत जे लोक द्रविडियन भाषा बोलतात
उत्कल- उडीसा परदेशात रहाणारे लोक आणि जे उडिया भाषा बोलतात
बंग- बंगाल आणि पूर्व भारतात रहाणारे आणि जे पूर्व भारतीय भाषा जसे बंगाली ,आसामी अश्या भाषांचा वापर करतात ते
विंद्य-भारताचा मद्य भाग जो विंध्य पर्वताच्या आजूबाजूला आहे
हिमाचल-हिमालय क्षेत्रातील भाग
यमुना-गंगा- यमुना आणि गंगा नदीचा प्रदेश
अश्याप्रकारे राष्ट्रगीतात संपूर्ण भारत समावण्याचं काम लेखकाने केलं आहे
आपणाला या राष्ट्रगीतातील 'मराठा' या शब्दाबद्दल आज विस्तृत चर्चा करायची आहे.
राष्ट्रगीतातील मराठा हा शब्द कोण्या एका जातीच्या लोकांचं प्रतिनिधित्व करत नसून महाराष्ट्र प्रदेशात रहाणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वच लोकांचं प्रतिनिधित्व मराठा हा शब्द करतो आहे
मग प्रश्न येतो तो म्हणजे मराठा ही एक जात आहे का?
तर या प्रश्नाचं उत्तर येईल जर देशाचा विचार केला तर जर बंगाली,गुजराती,मारवाडी,तामिळी,तेलगू,कन्नड हे शब्द जातीवाचक असतील तर मग मराठा हा शब्द पण जातीवाचक आहे आणि जर हे शब्द भाषेचे प्रतिनिधित्व करत असतील तर मराठा हा शब्द जात म्हणून उरतच नाही.
मग या ठिकाणी मराठा या शब्दाचा अर्थ ठरवणं खूप महत्वाचे आहे
तर मराठा या शब्दाचा मी असा अर्थ काढेन की,जे लोक महाराष्ट्र परदेशात रहातात आणि ज्यांची बोलीभाषा मराठी आहे ते सर्व लोक मग त्यामध्ये अठरा पगड जाती,बारा बलुतेदार ,भटके,विमुक्त आणि आदिवासी म्हणजेच 'मराठा'
वरील मराठा या शब्दाच विश्लेषण करण्याची मला गरज वाटली कारण सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा खूप तापलेला आहे आणि त्यासाठी सर्वांच्या लक्षात यायला हवं की ही वास्तविकता नेमकी आहे तरी काय?
आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे आहोत तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड आणि बाराबलुतेदार याना घेऊनच स्वराज्य निर्माण केलं होतं आणि या सर्वानाच मराठा अस संबोधलं जात होतं अर्थात मराठा ही एक जात नसून महाराष्ट्र परदेशात रहाणाऱ्या लोकांचा समूह आहे.
सध्या महाराष्ट्रात जो आरक्षणाचा तिढा निर्माण झालाय तो तिढा नेमका याच शब्दांमुळे निर्माण झालाय म्हणजे काही अमुक लोकांच्या जातप्रमानपत्रावरील जातीच्या उल्लेखापुढे 'मराठा' हा शब्द जात म्हणून लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्व गोंधळ झालेला आहे तर ही चूक त्याकाळी ज्यांनी जातीचा उल्लेख मराठा म्हणून नोंद केली त्यांची आहे.
मराठा ही या प्रदेशाची ओळख आहे आणि या शब्दामध्ये रहाणारे लोक अठरापगड जातीचे आहेत
या अठरापगड जाती व्यवसायावरून निर्माण झालेल्या आहेत अर्थात हे सर्वजण एकच आहेत पण व्यवसाय वेगवेगळे असल्याने आणि ते व्यवसाय काही शेकडो वर्षे एकाच कुळाकडे राहिल्याने लोक त्यांना त्याच व्यवसायाच्या नावाने ओळखू लागले आणि पुढे तो समूह त्या व्यवसायाच्या नावाच्या जातीने ओळखू लागले
जस की कोणी शेती करत होते ते कुणबी
लोखंडी हत्यारे तयार करणारे लोहार
केस कापणारे न्हावी
कपडे धुणारे धोबी
फुल -बाग करणारे माळी
कपडे शिवणारे शिंपी
दागिने बनवणारे सोनार
मडकी बनवणारे कुंभार
अश्याप्रकारे व्यवसायावरून जाती निर्माण झाल्या आणि हे सर्वजण एकमेकांवर अवलंबून असते जसे की कुणबी लोक शेतात राबत आणि धान्य बनवत असत हेच धान्य लोहाराला देऊन त्याच्याकडून शेतीची अवजारे बनवून घेत अश्याप्रकारे संपूर्ण समाजव्यवस्था आणि अर्थात अर्थव्यवस्था त्या काळी चालत असे
म्हणजेच मराठा या शब्दात येणारे सर्वजण भाऊच होते पण खूप वर्षांच्या व्यवसायाने यांना वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले
आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी समाजातील सेवादार लोकांचा समूह खूप मागे राहिला होता आणि या समूहाकडे खूप वाईट नजरेने पाहिले जात होते
या समूहातील लोक शोषित ,वंचित अश्याप्रकारचे जीवन जगत होते आणि या अन्यायातून या समूहाला बाहेर काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षण व्यवस्था निर्माण केली आणि या आरक्षणामार्फत जो समूह शोषित ,वंचित आहे त्यांना बरोबरीत आणण्याचा मार्ग मोकळा केला आणि हे लोकशाहीत गरजेचं होत
पण पुढे काही वर्षात काही राजकीय पक्षांनी या आरक्षणाला आपल्या मतांचा मार्ग बनवला आणि obc हा प्रकार चालू केला यामध्ये काही मागास जातींचा समावेश केला आणि या जाती मागे आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असा आभास निर्माण केला
पुढे काही वर्षानंतर या obc प्रकारात पुन्हा काही जातींचा समावेश करून काही राजकीय पक्षांनी हे लोक आपले पक्के मतदार कसे बनतील याचा प्रयत्न केला आणि यावेळी मात्र या आरक्षणात कुणबी म्हणजे शेती करणारा वर्ग पण सामील करण्यात आला
सध्या जो तिढा निर्माण झालाय त्या मध्ये कुणबी असा जातीचा उल्लेख असणाऱ्या महाराष्ट्रातील समूहाला आरक्षण आहे पण ज्या कुणबी लोकांची सोयरीक मराठा असा उल्लेख असणाऱ्या लोकांशी आहे त्या मराठा उल्लेख असणाऱ्या समूहाला मात्र आरक्षण नाही
अर्थात हे मराठा असा उल्लेख असणारा आणि कुणबी असा उल्लेख असणारा समूह वेगळा नसून तो एकच समूह आहे पण कुणबी ला आरक्षण आहे आणि मराठा या शब्दाला आरक्षण नाही ही न पटणारी गोष्ट पाठीमागील काळात सरकारांनी निर्माण केलीय आणि त्यामुळॆ आज समाजातील समूहा समूहा मध्ये भांडणे लागण्याची वेळ आली आहे
मी पण एक कुणबी कुटुंबातील आहे आणि माझ्या जन्माच्या दाखल्यावर्ती मराठा असा जातीचा उल्लेख आहे आणि हा सर्व गोंधळ सरकारी दप्तरातून निर्माण झालेला आहे म्हणून सरकारने कुणबी अथवा मराठा या समूहात भांडणे लावण्यापेक्षा सर्वांना सरसकट कुणबी ठरवून सर्वांना आरक्षणात सामील करून घेणे काळाची गरज आहे अन्यथा या देशात यादवी सारखी परिस्थिती निर्माण होऊन देशाचं प्रचंड नुकसान होऊ शकत ....धन्यवाद