Topic icon

मराठा

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
🚩 मराठा  🚩

पंजाब,सिंध,गुजरात ,मराठा, द्राविड,उत्कल, बंग,
विंध्य ,हिमाचल, यमुना-गंगा उच्छल जलधी तरंग

वरील ओळी भारताच्या म्हणजे आपल्या राष्ट्रगीतातील आहेत,हे राष्ट्रगीत सर्वानुमते मान्य आहे .

वरील ओळींमध्ये राष्ट्रगीत रचयिता आपणास संपूर्ण भारत भूमीची ओळख करून देतो 

पंजाब -भारत आणि पाकिस्तान मधील पाच नद्यांचा प्रदेश जे लोक पंजाबी बोलतात

सिंध-भारत पाकिस्तान मधील सिंधू नदीचा प्रदेश जे लोक सिंधी भाषा बोलतात

गुजरात- गुजरात आणि राजस्थान चा प्रदेश जे लोक गुजराती मारवाडी भाषा बोलतात

मराठा- महाराष्ट्र प्रदेश आणि जे लोक मराठी भाषा बोलतात

द्रविड-दक्षिण भारत जे लोक द्रविडियन भाषा बोलतात 

उत्कल- उडीसा परदेशात रहाणारे लोक आणि जे उडिया भाषा बोलतात 

बंग- बंगाल आणि पूर्व भारतात रहाणारे आणि जे पूर्व भारतीय भाषा जसे बंगाली ,आसामी अश्या भाषांचा वापर करतात ते

विंद्य-भारताचा मद्य भाग जो विंध्य पर्वताच्या आजूबाजूला आहे

हिमाचल-हिमालय क्षेत्रातील भाग

यमुना-गंगा- यमुना आणि गंगा नदीचा प्रदेश

अश्याप्रकारे राष्ट्रगीतात संपूर्ण भारत समावण्याचं काम लेखकाने केलं आहे

आपणाला या राष्ट्रगीतातील 'मराठा' या शब्दाबद्दल आज विस्तृत चर्चा करायची आहे.

राष्ट्रगीतातील मराठा हा शब्द कोण्या एका जातीच्या लोकांचं प्रतिनिधित्व करत नसून महाराष्ट्र प्रदेशात रहाणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वच लोकांचं प्रतिनिधित्व मराठा हा शब्द करतो आहे

मग प्रश्न येतो तो म्हणजे मराठा ही एक जात आहे का?

तर या प्रश्नाचं उत्तर येईल जर देशाचा विचार केला तर जर बंगाली,गुजराती,मारवाडी,तामिळी,तेलगू,कन्नड हे शब्द जातीवाचक असतील तर मग मराठा हा शब्द पण जातीवाचक आहे आणि जर हे शब्द भाषेचे प्रतिनिधित्व करत असतील तर मराठा हा शब्द जात म्हणून उरतच नाही.

मग या ठिकाणी मराठा या शब्दाचा अर्थ ठरवणं खूप महत्वाचे आहे

तर मराठा या शब्दाचा मी असा अर्थ काढेन की,जे लोक महाराष्ट्र परदेशात रहातात आणि ज्यांची बोलीभाषा मराठी आहे ते सर्व लोक मग त्यामध्ये अठरा पगड जाती,बारा बलुतेदार ,भटके,विमुक्त आणि आदिवासी म्हणजेच 'मराठा'

वरील मराठा या शब्दाच विश्लेषण करण्याची मला गरज वाटली कारण सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा खूप तापलेला आहे आणि त्यासाठी सर्वांच्या लक्षात यायला हवं की ही वास्तविकता नेमकी आहे तरी काय?

आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे आहोत तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड आणि बाराबलुतेदार याना घेऊनच स्वराज्य निर्माण केलं होतं आणि या सर्वानाच मराठा अस संबोधलं जात होतं अर्थात मराठा ही एक जात नसून महाराष्ट्र परदेशात रहाणाऱ्या लोकांचा समूह आहे.

सध्या महाराष्ट्रात जो आरक्षणाचा तिढा निर्माण झालाय तो तिढा नेमका याच शब्दांमुळे निर्माण झालाय म्हणजे काही अमुक लोकांच्या जातप्रमानपत्रावरील जातीच्या उल्लेखापुढे 'मराठा' हा शब्द जात म्हणून लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्व गोंधळ झालेला आहे तर ही चूक त्याकाळी ज्यांनी जातीचा उल्लेख मराठा म्हणून नोंद केली त्यांची आहे.

मराठा ही या प्रदेशाची ओळख आहे आणि या शब्दामध्ये रहाणारे लोक अठरापगड जातीचे आहेत 

या अठरापगड जाती व्यवसायावरून निर्माण झालेल्या आहेत अर्थात हे सर्वजण एकच आहेत पण व्यवसाय वेगवेगळे असल्याने आणि ते व्यवसाय काही शेकडो वर्षे एकाच कुळाकडे राहिल्याने लोक त्यांना त्याच व्यवसायाच्या नावाने ओळखू लागले आणि पुढे तो समूह त्या व्यवसायाच्या नावाच्या जातीने ओळखू लागले

जस की कोणी शेती करत होते ते कुणबी
लोखंडी हत्यारे तयार करणारे लोहार
केस कापणारे न्हावी
कपडे धुणारे धोबी
फुल -बाग करणारे माळी

कपडे शिवणारे शिंपी
दागिने बनवणारे सोनार
मडकी बनवणारे कुंभार

अश्याप्रकारे व्यवसायावरून जाती निर्माण झाल्या आणि हे सर्वजण एकमेकांवर अवलंबून असते जसे की कुणबी लोक शेतात राबत आणि धान्य बनवत असत हेच धान्य लोहाराला देऊन त्याच्याकडून शेतीची अवजारे बनवून घेत अश्याप्रकारे संपूर्ण समाजव्यवस्था आणि अर्थात अर्थव्यवस्था त्या काळी चालत असे

म्हणजेच मराठा या शब्दात येणारे सर्वजण भाऊच होते पण खूप वर्षांच्या व्यवसायाने यांना वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले

आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी समाजातील सेवादार लोकांचा समूह खूप मागे राहिला होता आणि या समूहाकडे खूप वाईट नजरेने पाहिले जात होते 

या समूहातील लोक शोषित ,वंचित अश्याप्रकारचे जीवन जगत होते आणि या अन्यायातून या समूहाला बाहेर काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षण व्यवस्था निर्माण केली आणि या आरक्षणामार्फत जो समूह शोषित ,वंचित आहे त्यांना बरोबरीत आणण्याचा मार्ग मोकळा केला आणि हे लोकशाहीत गरजेचं होत

पण पुढे काही वर्षात काही राजकीय पक्षांनी या आरक्षणाला आपल्या मतांचा मार्ग बनवला आणि obc हा प्रकार चालू केला यामध्ये काही मागास जातींचा समावेश केला आणि या जाती मागे आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असा आभास निर्माण केला

पुढे काही वर्षानंतर या obc प्रकारात पुन्हा काही जातींचा समावेश करून काही राजकीय पक्षांनी हे लोक आपले पक्के मतदार कसे बनतील याचा प्रयत्न केला आणि यावेळी मात्र या आरक्षणात कुणबी म्हणजे शेती करणारा वर्ग पण सामील करण्यात आला

सध्या जो तिढा निर्माण झालाय त्या मध्ये कुणबी असा जातीचा उल्लेख असणाऱ्या महाराष्ट्रातील समूहाला आरक्षण आहे पण ज्या कुणबी लोकांची सोयरीक मराठा असा उल्लेख असणाऱ्या लोकांशी आहे त्या मराठा उल्लेख असणाऱ्या समूहाला मात्र आरक्षण नाही

अर्थात हे मराठा असा उल्लेख असणारा आणि कुणबी असा उल्लेख असणारा समूह वेगळा नसून तो एकच समूह आहे पण कुणबी ला आरक्षण आहे आणि मराठा या शब्दाला आरक्षण नाही ही न पटणारी गोष्ट पाठीमागील काळात सरकारांनी निर्माण केलीय आणि त्यामुळॆ आज समाजातील समूहा समूहा मध्ये भांडणे लागण्याची वेळ आली आहे

मी पण एक कुणबी कुटुंबातील आहे आणि माझ्या जन्माच्या दाखल्यावर्ती मराठा असा जातीचा उल्लेख आहे आणि हा सर्व गोंधळ सरकारी दप्तरातून निर्माण झालेला आहे म्हणून सरकारने कुणबी अथवा मराठा या समूहात भांडणे लावण्यापेक्षा सर्वांना सरसकट कुणबी ठरवून सर्वांना आरक्षणात सामील करून घेणे काळाची गरज आहे अन्यथा या देशात यादवी सारखी परिस्थिती निर्माण होऊन देशाचं प्रचंड नुकसान होऊ शकत ....धन्यवाद


उत्तर लिहिले · 18/10/2023
कर्म · 810
0
कट्यार

कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला 'एच' या रोमन अक्षराच्या (रोमन: 'H') आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा वापर करता येतो. हे एक छोटे दुधारी शस्त्र आहे.


राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथील कलाकुसर केलेल्या मुठीची कट्यार

संस्कृती

समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे. वर कट्यार धारण करतो आणि विवाह सोहळ्यात मानाने ती मिरवतो. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यात हिचा वापर केला जातो.उत्तर भारतात जसे मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात वधुचे भाऊ कट्यार पळवतात आणि त्या बदल्यात वराकडून पैसे वसूल करतात. लग्न जमतांना वधुपिता वराला कट्यार भेट देण्याची परंपरा आहे.

विवाहप्रसंगी नवरदेवाने कट्यार बाळगायची असते. प्रत्येक लढाऊ वीराचे लग्न कट्यारीशी लागलेले असते असा हा संदेश आहे. तसेच शत्र वापरून तू माझ्या मुलीचे रक्षण कर असा संदेश यातून दिला जातो. तसेच पुर्वीच्या काळी मुलगी आपले कट्यार हे आत्मसंरक्षणाचे शस्त्र माहेरातून घेऊन सासरी येत असे. म्हणज सारे हिंदु कुटुंब हे शस्त्र सज्ज असत असे.

तंत्र

लहान पाते आणि मजबूत पकड यामुळे एखादी ढाल फोडणे या शस्त्राने शक्य होत असे. कट्यार वापरून निर्णायक वार केले जाऊन शत्रूला ठार मारले जात असे. हातात असलेली कट्यार ठोसा मारावा तशी मारली जात असे. यामुळे शरीराची सर्व उर्जा कट्यारीमध्ये सामावली जाऊन प्रचंड ताकदीने ढाल ही फुटत असे. शक्य असल्यास वार करून जखमी करणे हे कार्य पण कट्यार करत असे. अर्थात हे शस्त्र हातघाईच्या लढाईच्या वेळी अत्यंत महत्त्वाचे होते. थंड डोक्याने नेमका वार करून मोक्याच्या क्षणी लढाई जिंकणे हे या शस्त्राने शक्य होत असे.

चित्रण

ऐतिहासिक चित्रांमध्ये राजकुमार आणि सरदारांना कट्यार धारण केलेले चित्रित केले जात असे. कट्यार दाखवणे केवळ आत्म-बचावासाठी ही खबरदारी नव्हती तर समाजात उंचावलेले स्थान, आणि संपत्ती दाखवण्यासाठी कट्यार दाखवली जात असे. होते. कट्यार वापरून रजपूत राजे अगदी वाघाची ही शिकार करीत. एखाद्या शिकारीसाठी अशा प्रकारच्या छोट्या-अंतराच्या शस्त्राने वाघाला ठार मारणे हे शौर्य आणि युद्ध कौशल्य यांचे निश्चित चिन्ह मानले जाते. नस्तनपूर यथील श्री शनीमहाराज मंदिरातील मूर्ती चतुर्भुज असून हातात कट्यार धारण केलेली आहे.

महत्त्व

कट्यार ही तूलनेने लहान असलयाने वागवणे सोपे होते. कायम सोबत ठेवता येते. मुठीच्या रचनेमुळे हातातून सुटणे अशक्य असते. त्यामुळे हे फार महत्त्वाचे शस्त्र होते. या खुबींमुळे या शस्त्राचा प्रसार व्हिएतनाम ते अफगाणिस्तान पर्यंत झालेला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र कट्यार होते असे म्हणतात.

त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार असायची. मराठा साम्राज्यातही सरदार आणि दरबारच्या मानी सरदारांनाच कट्यारीचा मान होता.

कट्यार बाळगण्याचा मान असलेल्यांना कट्यारे असे ही म्हंटले जात असे.


उत्तर लिहिले · 26/5/2022
कर्म · 48555
1
मराठ्यांमध्ये चार मुख्य वर्ग आहेत.


मराठा हा एक सामूहिक शब्द आहे, ज्यामध्ये हिंदु-मराठी भाषेतील क्षत्रिय, योद्धा, सामान्य आणि शेतकरी या जातींच्या भारतीय-आर्य गटाचा उल्लेख आहे. त्यांनी मराठा साम्राज्य तयार केले ज्याने १७ व्या आणि १८ व्या शतकात भारताचा एक मोठा भाग व्यापला.

दख्खनमध्ये ९६ कुळांमध्ये पसरलेली आणि भारतातील मुघल राजवट संपुष्टात आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठा क्षत्रिय जातीचा जन्म हा दख्खनच्या क्षत्रिय कुळ आणि काही क्षत्रिय / राजपूत कुळांच्या संघटनेतून झाला. उत्तर परमार, सोलंकी, चौहान, यादव, सिसोदिया, गौर, जादोन-भट्टी किंवा यादव आणि मौर्य अशा राजपूत वंशातील लोक मुस्लिम आक्रमणानंतर उत्तर भारत सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाले. या संघटनेत जन्मलेली जात मराठा क्षत्रिय किंवा मराठा राजपूत म्हणून ओळखली जाऊ लागली.

तथापि, दक्षिण भारतातील चालुक्यांपासून उत्पन्न झालेली बरीच सोलंकी कुटुंबे मुस्लिम आक्रमण करण्यापूर्वीच महाराष्ट्रात होती. उत्तरेकडील जाधव किंवा जाधवराव हे जादोन-भट्टी म्हणून ओळखले जाणारे होते.

कुळी म्हणजे कुळ. मुख्य कुळ व त्यांचे उप-कूळे ही वेगवेगळी असतात. काही कुळांनी त्यांचे वैभव आणि राज्य गमावले तर इतरांना महत्त्व प्राप्त झाले. आदर्श ९६ कुळांच्या यादीमध्ये २४ सूर्यवंशी कुळे, २४ चंद्रवंशी कुळे, २४ ब्रम्हवंशी कुळे आणि २४ नागवंशी कुळे यांचा समावेश आहे.

मराठा क्षत्रियांमध्ये राजपूत कुळांचा समावेश कसा झाला ?


यापैकी उत्तर भारतीय कुळांमध्ये स्थान आणि इतर घटकांच्या आधारे महाराष्ट्रात स्थलांतरानंतर नवीन आडनाव घेण्यात आले. तर, महाराष्ट्रातील निंबाळकर आणि पवार हे परमार आहेत. छत्रपती शिवाजींचे आडनाव, जे मूळचे सिसोदिया होते, ते बदलून भोसले केले गेले. घोरपडे देखील सिसोदिया आहेत. मौर्य नंतर मोरे बनले आणि मराठा आडनाव भोईटे हेही भाटीचे वंशज आहेत असे मानले जाते. चौहान हे महाराष्ट्रातील चव्हाण म्हणून ओळखले जातात जे महाराष्ट्रातील चव्हाणांचे राजपूत मूळ दर्शवितात, तर फाळके हे मूळचे तंवर आणि माने गौर आहेत.

राठोर १६ व्या शतकापर्यंत गुजरातच्या सीमेवरील महाराष्ट्रातील बागलाण भागावर राज्य करीत होते आणि त्यांचे आडनाव हे बागुल किंवा बागल हे नाव पडले. हे एक अतिशय सन्मानीय कुळ होते पण त्यांची संख्या खूप विरळ होते.

पाटणकर, माहुरकर आणि काठीकर देशमुख हे सोलंकी आहेत परंतु त्यांचे आडनाव साळुंके होते असे म्हणतात. शिंदे किंवा सिंधिया कुळ, ज्यापैकी ग्वाल्हेर राजघराणे हे सर्वात प्रमुख घर आहे.

विशेष म्हणजे, इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्रिलोचंदी बैस कुळ १० व्या शतकात महाराष्ट्रातील मुंगीपैठण येथून उत्तरेकडे गेले. शिंदे आणि त्रिलोकचंदी बैस यांच्यातील सर्वात महत्त्वाचा संबंध म्हणजे नागदेवतेची उपासना (सर्प) - दोन्ही कुळांमध्ये नागदेवतेच्या उपासनेला सर्वात जास्त महत्त्व आहे.

मजबूत ऐतिहासिक पुरावा:

ग्वाल्हेरचे सुप्रसिद्ध इतिहासकार सरदार आनंदराव भाऊसाहेब फाळके यांनी त्रिलोकचंदी बैस आणि शिंदे हेच कुळ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भक्कम ऐतिहासिक पुराव्यांची स्थापना केली आहे. यूपीमधील अवध परिसरातील खजुरगावचा राणा, मुरन्माऊचा राजा आणि कुसमंदाचा राजा या त्रैलोकचंदी बैसांपैकी सर्वांत प्रमुख आहेत.

गंगा-जमुना प्रदेशात १३ व्या शतकात दिल्ली सुल्तानांनी केलेल्या छळाविरूद्ध बंडखोरी करणारे बैसवाड्याचे राजा त्रिलोकचंद पहिले होते. परंतु त्याच्यामुळे त्यांना ऐतिहासिक ओळख त्याला कधीच मिळाली नाही. खरं तर, राजावर पुरेशी संशोधन सामग्रीची कमतरता आहे.


महत्त्वाचे म्हणजे काही असे मानतात की त्रिलोकचंदी बैस ७ व्या शतकातील महान सम्राट, राजा हर्षवर्धन हा त्यांचा पूर्वज होता.

१७७० ते १७९४ दरम्यान उत्तर भारतातील मराठा साम्राज्यासाठी अनेक लढाया जिंकलेल्या शिंदे घराण्याचे प्रमुख सेनापती महाडजी शिंदे होते. त्यांनी इंग्रजांना भारतावर पूर्ण ताबा मिळवण्यापासून रोखले होते अशीही ख्याती आहे.


आडनावांद्वारे कुळात गोंधळ करू नये. ९६ कुळी मराठा या (ज्यामध्ये जवळजवळ ५००० आडनाव आहेत) कुळाने महान मराठा साम्राज्य निर्माण केले.

९२ कुळी मराठाही हेच आहेत.


उत्तर लिहिले · 26/5/2022
कर्म · 48555