निबंध इतिहास

मराठ वाडा मुक्तीसंग्राम लढाचा धकधकनारा इतिहास निबंध?

1 उत्तर
1 answers

मराठ वाडा मुक्तीसंग्राम लढाचा धकधकनारा इतिहास निबंध?

0
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिदिन’ म्हणून साजरा केला.


१९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा प्रमुख कालखंड म्हणुन ओळखला जातो.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैदराबाद, जुनागड, आणि काश्मीर या संस्थांनी स्वतःला वेगळे घोषित केले.

हैदराबाद स्वतःला स्वतंत्र्य घोषित केल्यावर सहाजिकच, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच, आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानांच्या अधिपत्याखाली येत होता, त्यातच हैदराबाद संस्थान हे एक होते. भारताच्या पोलिस कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाचे विलनीकरण भारतात करण्यात आले.

यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्यात 15 ऑगस्ट ऐवजी 17 सप्टेंबर रोजी 1 स्वातंत्र्य मिळाले. या मराठवाडा मुक्ती संग्रामाला आज 72 वर्षे झाली त्याचा आज 7 रखा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.


मराठवाडा हे भाषासूचक नाव असून त्याचा अर्थ मराठी भाषा बोलण्याचा भूप्रदेश असा होतो. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होता. त्या भूभागांना त्यांच्या बोलीभाषेवर ओळखण्याची पद्धत निर्माण झाली.

त्यातूनच मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न भाषिक प्रदेश आकारास आले. मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद इ. स. १५७० ते १६१४ च्या कालखंडात तारीखे – फरिश्तामध्ये महटवाडी अशी झाल्याची दिसून येते. निजामाचे पंतप्रधान सालारजंग पहिले यांनी १८७० मध्ये राज्याची नव्याने जिल्हाबंदी करून मराठी भाषिकांचा औरंगाबाद सुभा निर्माण केला व त्यास मराठवाडा असे नाव दिले.

आज मराठवाडा महाराष्ट्राचा एक प्रादेशिक विभाग आहे. मराठवाड्याची भूमी संतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीतच आद्यकवी श्री मुकुंदराज, श्री चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, गोरोबाकाकानामदेव, एकनाथ, जनाबाई, यांसारखे विश्ववंद्य संत निर्माण झाले.
या पावनभूमीतच संतांनी मानवी धर्माचा खरा अर्थ सांगितला छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे वेरूळचे होय. बारा ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर (वेरूळ), वैजनाथ (परळी), नागनाथ (औंढा) ही तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्याच्या भूमीत विराजमान आहेत. महाराष्ट्राच्या कुलदैवतापैकी तुळजापूरची भवानी मराठवाड्यात आहे.ऐतिहासिक काळापासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मराठवाडा अग्रभागी होता. विविध कालखंडातील राजवटीमध्ये मराठवाड्याने स्वतःचे वेगळे असे व्यक्तिमत्व जपले आहे. सम्राट अशोकानंतर काही दशकात मराठवाड्यात वेगवेगळ्या घराणेशाहीने राज्य केले.

त्यामध्ये सर्वप्रथम सातवाहनांचा उदय झाला. त्याला सातवाहन कालखंड म्हणतात. पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. यांनी सुमारे 450वर्षे राज्य केले त्यांनंतर वाकाटक कालखंड यादव काळ शुद्धा 200 वर्षाचा होता.राष्ट्रकुट कालखंड 250 वर्षाचा होता.सातवाहणानंतर हा परिसर आपल्या प्रभुत्वाखाली ठेवणारे यादव हे अखेरचे हिंदू राजघराणे होय. देवगिरी ही यादवांची राजधानी होती. यादवकाळात धार्मिक क्षेत्रात क्रांतिकारक झाले.

महानुभाव, नाथपंथ, वारकरी, लिंगायत, सुफी यांसारखे नवे धर्मपंथ उदयास आले होते भक्ती हा सर्वांचा पाया होता. तरी प्रत्येकाच्या भक्ती उपासनेत काही अंशी तफावत होती. समाजाची कर्मकांडातून सुटका करण्यासाठी स्वामी चक्रधर, संत ज्ञानेश्वर, महात्मा बसवेश्वर यांनी पराकाष्ठा केली. यादव काळात हेमाडपंथी मंदिरांचा प्रकार लोकप्रिय झाला होता. अंभई, अन्वा, धर्मापुरी, निलंगा, औसा, चंपावती, औंढा, देवगिरी, पैठण, परळी, अंबाजोगाई आदी ठिकाणी अतिशय भव्य मंदिरे उभारली. आजही ती मंदिर उत्तम स्थितीत असून यादवकालीन वैभवाची साक्ष देतात.
यादवांनी बांधलेल्या देवगिरी दुर्गाचे शिल्प अद्वितीय असेच आहे. अशा स्वरूपाचा अभेद्य दुर्ग जगात कुठेच सापडत नाही, मराठी भाषेचा उदय व विकास हे यादवकाळाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. मराठवाड्यातील संतांनी मराठीचा पुरस्कार करून जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

स्वामी चक्रघर आणि संत ज्ञानेश्वर ही मराठवाड्याने जगाला दिलेली अपूर्व अशी देणगी होय. निझाम काळ औरंगजेब बादशहाचा मृत्यू २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे झाला. त्याच्या मृत्यूनंतर इ.स. १६८२ ते १७०७ पर्यंत चालू असलेला मोगल मराठा संघर्षाचा शेवट घडून आला.

प्रदीर्घकाळ चालू असलेल्या संघर्षामुळे मोगलांचे साम्राज्य दुबळे बनले. मोगलांचे शत्रू असलेल्या मराठे, जाट, राजपूत, शीख यांनी आपापल्या प्रदेशावर अधिकार प्रस्थापित केले. यासोबत मोगलांच्या महत्त्वाकांक्षी व स्वार्थी सरदारांनी अवध, रोहिलखंड व हैदराबाद अशी स्वतंत्र राज्ये निर्माण केली.हैदराबादच्या स्वतंत्र राज्याचा संस्थापक मीर कमरुद्दीन निजाम-उल-मुल्क होय. तो अत्यंत धूर्त, महत्त्वाकांक्षी, चाणाक्ष व मुत्सद्दी नेता होता. मीर उस्मान अलिखान याची कारकीर्द इ.स. 1911 ते 1948 तो 29 ऑगस्ट 1911 रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना पैसा, सैन्य, वस्तु याची भरपूर मदत केली.
युद्धातील मदतीचे बक्षीस म्हणून ब्रिटिश सम्राट पाचवा जॉर्ज ह्याने निजामाला “हिज हायनेस” असा किताब दिला, निजाम मीर उस्मान अली खूप महत्त्वाकांक्षी होता. स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न होते. हैदराबाद राज्याची राजभाषा फारशी होती. सन 1946च्या अखेरीस रझाकारांचा वापर करून.

संस्थानात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. ‘संस्थानातील प्रजा व रझाकाराचे संघर्ष सातत्याने घडत होते. त्यातून अर्धापूर जि. नांदेड गावाजवळ गोविंदराव पानसरे यांचा २१ आक्टोबर १९४६ रोजी रझाकाराने खून केला.पानसरे एक निष्ठावान गांधीवादी होते.नादेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ते संघटितपणे कार्य करत असत. पानसरे हे संस्थानातील स्टेट काँग्रेसचे ‘पहिले ‘हतात्मा’ ठरले. अर्धापूर गोळीबारात पानसरे सोबतच अन्य चारजण प्राणाला मुकले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणे ही तारेवरची कसरत होती.
सातवे निजाम मीर उस्मान अली हे पुराणमतवादी व राजेशाहीचें पुरस्कर्ते. होते. त्यांनी हैदराबाद संस्थानात आपलेराज्यटिकवण्यासाठी अनियंत्रित व अन्यायी मार्गाचा सर्रास वापर केला. रझाकारासारखीजातीयवादी संघटना जोपासली. अशा राजवटीशी, धर्मनिरपेक्षवृत्तीने, मानवतावादी मूल्ये उराशी बाळगून प्रखरपणे. संघर्ष करणे अत्यंत अवघड होते.

स्वामी रामानंद तीर्थ यांची गांधीप्रणीत मार्गांवर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे हा लढा धर्मनिरपेक्ष राहील आणि अहिंसक मार्गानेच चालेल असा त्यांनी. निश्चय केला होता. स्वामीजी २६ जानेवारी ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत जेलमध्ये होते.
१ डिसेंबर १९४७ ते सप्टेंबर १९४८ पर्यंत लढ्याचे रूपांतर तीव्र आंदोलनात झाले. जागोजागी होणारे सशस्त्र लडे आणि लांदेड जिल्ह्यातील उमरी बँकप्रकरण यात स्वामीजींना खूप मनस्ताप झाला. परंतु स्वामी सतत कृती समितीच्या पाठीशी राहिले.

कार्यकर्त्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. म्हणून या उग्र आंदोलनातील कार्यकर्ते या अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली संस्थानातील सर्व जिल्ह्यांत व्यापक स्वरूपाचा लढा दिला गेला, म्हणून निजामी सत्तेची पाळेमुळे पोखरली गेली व पोलिस ऑक्शनच्या वेळी निजामी सिवेला प्राच दिवसात शरणागती पत्करावी लागली. 
7 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने सैन्यदलाला हैदराबादवर लढाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजले संस्थानाविरुद्ध पोलीस ऍक्शन करवार्ड भारतीय फौजा हैदराबादसंस्थान मध्ये पाचं वेगवेगळ्या ठीकाणांहून घुसल्या. हैदराबाद. संस्थानावरील लढाईची ही योजना “ऑपरेशन पोलो “ या सांकेतिक नावाने ओळखली जाते.
भारतीय सेनेच्या सदर्न कमांडचे प्रमुख जनरल गोडार्ड यांनी ही योजना तयार केली होती. १३ सप्टेंबरच्या पहाटेपासून भारतीय फौजांनी आत्मविश्वासाने कारवाई सुरू केली. पोलिस अॅक्शनमुळे जनरल अल इद्रिस यांच्या नेतृत्वाखाली निज़ामी सैन्याची वाताहत झाली. पोलिस अॅक्शनची कार्यवाही १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत चालू राहिली.

शेवटी १७ सप्टेंबर हा मंगलदिन उगवला. हैदराबादभोवती असलेल्या निजामी फौजांनी लिंगमपल्लीपर्यंत माघार घेतली होती. भारतीय सेनाधिकाऱ्यांनी निजांमी फौजांचे प्रमुख जनरल अलइद्रिस यांना त्यांनी शरणागती पत्करावी असा संदेश पाठवला. त्याप्रमाणे १७ सप्टेंबर १९४८ रोजी सायंकाळी निजामाने आपलीशरणागती घोषितकेली आणि आपल्या फौजांना युद्ध थांबवण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या दिवशी १८ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्याने निजामाची राजधानी हैदराबाद शहरात प्रवेश केला. तेथे मेजर जनरल चौधरींनी अधिकृतपणेनिजामाचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस यांच्याकडून शरणागती पत्करल्यानंतर मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी सैनिकी कार्यवाही पूर्ण झाली. पोलिस अॅक्शननंतर हैदराबाद मक्तिसंग्रामाची सांगता झाली. हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा जनतेच्या विराट सामर्थ्याचा आणि ध्येयधुंदवृत्तीचा अभूतपूर्व आणि असामान्य विजय समजला जातो. म्हणून १७ सप्टेंबर १९४८ हाच खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा मुक्ती दिन आणि भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

१९९८ मध्ये हैदराबादच्या मुक्तिसंग्रामास ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे जुन्या हैदराबाद राज्यात सगळीकडे हे वर्ष मुक्तिसंग्रामाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे झाले. मराठवाड्यात महाराष्ट्र शासनाने मुक्तिसंग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन’ म्हणून साजरा केला यादिवशी संपूर्ण मराठवाड्यात ध्वजारोहण करण्यात येते.

सार्वजनिक सुट्टी जाहीर करून विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र शासनाने व मराठवाडा साहित्य परिषदेने मुक्तिसंग्रामाचा सुमारे ३०० पानांचा ग्रंथ प्रकाशित केला. जसा क्रांती मैदानात शहीद स्तंभ आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती दिनाचा इतिहास चिरंतन राहावा या उद्देशाने मुक्ती स्तंभ उभा केला आहे.
त्या उक्तीस्तंभावर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉ. राजेंद्र काबरा आदींच्या प्रतिमा चिरंतन स्वरूपान इतिहासाच्या साक्षी आहे. आजच्या दिवशी सरकारी कार्यक्रम तेथे होतो. त्याचबरोबर, राज्याचे मुख्यमंत्री तेथे पुष्पचक्र अर्पण करायला जातात आणि शासकीय पद्धतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा केला जातो.

ज्या पद्धतीने आपल्यासाठी स्वतंत्रता दिवस महत्वाचा असतो. तेवढाच मराठवड्या तील लोकांसाठी “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन महत्वाचा आहे. या दिवसाला एक प्रकारे मराठवाड्यात अनन्यसाधारण महत्व आहे.
उत्तर लिहिले · 10/9/2023
कर्म · 9415

Related Questions

माझ आई निबंध?
मोबाईल बंद झाले तर निबंध?
झाडे लावा झाडे जगवा निबंध?
जल ही जीवन आहे माहितीपर निबंध?
मोबाईलचे मोनोगत मराठी निबंध?
इंटरनेट चे मनोगत निबंध?
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतिगृह चळवळ निबंध 500 शब्द?