बुद्धिमत्ता

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

0
भावनिक बुद्धिमता म्हणजे काय

स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.  हा शब्द  या मूळ लॅटीन शब्दापासून व्युत्पन्न झाला असून  म्हणजे किंवा म्हणजे ‘ढवळणे’ किंवा ‘हलविणे’ असा होय. मनामध्ये कालवाकालव होणे, मन अस्थिर राहणे या बाबी भावनेमध्ये येतात. मानवी मेंदू व भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो आणि भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो.

सर्वप्रथम चार्ल्स रॉबर्ट डार्विन या विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेबाबत आपले विचार मांडले आहेत. भावनिक रित्या व्यक्त होणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणतात. भावनिक बुद्धिमत्ता हा संशोधनात्मक व अभ्यासात्मक दृष्टीने नवीन विषय असून त्याचे मूळ डार्विन यांच्या सिद्धांतांमध्ये दिसून येते. त्यांच्या नंतर अनेक विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आपले विचार मांडले आहेत. त्यामध्ये पीटर सॅलोव्हे आणि जॅक मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा वापर केला. त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, असे आपले मत व्यक्त केले. डॅनिअल गोलमन यांच्या मते, ‘स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात‘. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. एकूणच कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध घेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय

उत्तर लिहिले · 8/9/2023
कर्म · 52060
0
मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे देतो:

भावनात्मक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence): भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची, वापरण्याची, आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता.

भावनात्मक बुद्धिमत्तेचे घटक:

  • आत्म-जागरूकता (Self-awareness): स्वतःच्या भावनांची जाणीव असणे.
  • आत्म-व्यवस्थापन (Self-management): आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता.
  • सामाजिक जागरूकता (Social awareness): इतरांच्या भावना समजून घेणे.
  • संबंध व्यवस्थापन (Relationship management): चांगले संबंध स्थापित करण्याची आणि टिकवण्याची क्षमता.

भावनात्मक बुद्धिमत्तेचे फायदे:

  • उत्तम संवाद कौशल्ये
  • ताण कमी होतो
  • चांगले नातेसंबंध
  • नेतृत्व क्षमता वाढते

भावनात्मक बुद्धिमत्ता आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात खूप महत्त्वाची आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 740

Related Questions

काही मुले वाघ आहेत, काही वाघ हत्ती आहेत, म्हणून काही हत्ती मुले आहेत. काही हत्ती वाघ आहेत. यापैकी कोणते अनुमान अचूक आहे?
समजा, अशी सर्वत्र बातमी आली की दिनांक १ मार्चपासून कायमस्वरूपी तुमच्याकडील असणारे मोबाईल फोन बंद पडणार असून त्यात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली वापरली तरच तो सुरू होईल, अशा वेळी मोबाईल बंद होण्यापूर्वी तुम्ही पहिला फोन किंवा मेसेज कोणाला कराल? एक मानसशास्त्रीय संवाद
इंडियन गोलमाल यांनी सामाजिक बुद्धिमत्ता खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशात आणली?
सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता या दोन्हींशी संबंध असणारा घटक कोणता?
प्रत्येकाला मिळालेल्या बुद्धिमत्तेचे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताच्या आधारे कसे स्पष्टीकरण कराल?
प्रत्येकाला मिळालेल्या बुद्धिमत्ता यांच्या मिश्रणाबद्दल सांगा.
भाषिक बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काय?