शिक्षक
५सप्टेंबर:शिक्षक दिन विशेष माहिती?
2 उत्तरे
2
answers
५सप्टेंबर:शिक्षक दिन विशेष माहिती?
0
Answer link
📖📚⚜
*GK जनरल नॉलेज ग्रुप*
⚜📚📖
_*9168390345*_
★_*रसुल खडकाळे*_★
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*JOIN GROUPS*
*1)🌹THE GREAT ISLAM🌹*
*2)📖GK जनरल नॉलेज📚*
*3)📰NEWS&UPDATES*
📚📖📚📖📚📖📚
■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆
📚📖 *शिक्षक दिवस के प्रेरणा स्त्रोत के कुछ शब्द जो आपके बहुत काम आयेंगे*📖📚
➖➖➖➖➖➖➖➖
5 सितम्बर को पूरे देश में डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिवस पर शिक्षक दिवस मनाया जाता है. माता-पिता के बाद एक शिक्षक ही होता है जो किसी के चरित्र निर्माण में सबसे बड़ा योगदान निभाते हैं.
डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन देश के दूसरे राष्ट्रपति और एक बहुत ही महान स्कॉलर थे. उनका जन्म 5 सितंबर साल 1888 में हुआ था. साल 1962 से राधा कृष्णनन को श्रद्धांजलि देने के लिए उनके जन्म दिवस पर शिक्षक दिवस मनाया जाता है.
राधाकृष्णनन को देश का प्रतिष्ठित पुरस्कार भारत रत्न से भी नवाजा जा चुका है. आज हम आपके लिए लेकर आए हैं
🌹_*डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन द्वारा कहे गए कुछ अनमोल कोट्स-*_
🔸1. किताब पढ़ना हमें एकांत में विचार करने की और सच्ची खुशी देता है.
🔹2. पुस्तकें वो साधन हैं जिनके माध्यम से हम विभिन्न संस्कृतियों के बीच पुल का निर्माण कर सकते हैं.
🔸3. केवल निर्मल मन वाला व्यक्ति ही जीवन के आध्यात्मिक अर्थ को समझ सकता है. स्वयं के साथ ईमानदारी आध्यात्मिक अखंडता की अनिवार्यता है.
🔹4. धर्म भय पर विजय है; असफलता और मौत का मारक है.
🔸5. भगवान की पूजा नहीं होती बल्कि उन लोगों की पूजा होती है जो उनके के नाम पर बोलने का दावा करते हैं. पाप पवित्रता का उल्लंघन नहीं ऐसे लोगों की आज्ञा का उल्लंघन बन जाता है.
🔹6. धन, शक्ति और दक्षता केवल जीवन के साधन हैं, खुद जीवन नहीं.
🔸7. ज्ञान हमें शक्ति देता है, प्रेम हमें परिपूर्णता देता है.
🔹8. शिक्षा का परिणाम एक मुक्त रचनात्मक व्यक्ति होना चाहिए जो ऐतिहासिक परिस्थितियों और प्राकृतिक आपदाओं के विरुद्ध लड़ सके.
🔸9. कहते हैं कि धर्म के बिना इंसान लगाम के बिना घोड़े की तरह है.
◆◆◆◆◆●●●●◆◆◆◆◆◆
👉📚📖 _*शिक्षक दिन; सन्मान आणि खंत*_ 📖📚
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ’शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहिल. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.
’शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र आज शिक्षकांना पूर्वीसारखा सन्मान मिळत नाही, अनेक गोष्टींची खदखद त्यांच्या मनात कायमच सलत असते, अशाच काही बाबींवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न…
👉★ _*शिक्षकांना वाटणारी खंत…*_
1) _*पूर्वीसारखा आज गुरूंना सन्मान नाही*_ : शाळेसाठी विद्यार्थ्यांनी आटापिटा करायचे दिवस गेले. आता मुलांसाठी कष्ट घेण्याचे दिवस शिक्षकांवर आले आहेत. पूर्वीच्या काळी गुरुगृही राहून शिक्षण घेतले जात होते. आताही गुरुकुल योजनेखाली चालणार्या अनेक संस्था आहेतच. पण खंत एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे पूर्वी इतका सन्मान गुरूंना मिळत नाही.
★2) _*इतर कामांचा बोजा*_ : अध्यापनाचं काम हे प्रथम कर्तव्य असताना शिक्षकांना अनेकवेळा वर्ग रिकामे सोडून निवडणुका, जनगणना, शालाबाह्य विद्यार्थी शोध, दर्जाहीन प्रशिक्षणं आणि सरल ऑनलाईन नोंदणीसारखी अध्यापनबाह्य कामं करावी लागतात. अशावेळी शिक्षकामधला ‘गुरू’ संपून उरतो तो केवळ एक मजूर.
★3) _*शिक्षकांच्या गुणांकडे होणारी डोळेझाक*_ : बर्याच वेळा असं होतं, शिक्षकांमध्ये हजारातील एकाकडून एखादी चूक घडली की, सार्याच शिक्षकांकडे त्याच नजरेने पाहणे चुकीचे आहे. अनेक आदर्श शिक्षक म्हणणपेक्षा सारेच आदर्श शिक्षक असतात. त्यांच्यातील गुणांकडे डोळेझाक करून चालणार नाही.
★4) _*शिक्षकांना म्हणावे असे प्रोत्साहन नाही*_ : शिक्षक म्हणजेच शि-शीलवान, क्ष-क्षमाशील, क-कर्तृत्ववान. ज्यामध्ये हे सर्व गुण असतात तो खरा आदर्श शिक्षक. अगदीच शोधलं तर कुठेतरी एखादा गुण कमी जास्त असतो, म्हणून सर्वच शिक्षकांना एका मापात तोलणे चुकीचे आहे. शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद वेळोवेळी झाली पाहिजे. शिक्षकांमधील आदर्श गुणांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
★5) _*शिस्त अडसर वाटते*_ : शिक्षकांची शिस्त ही गोष्ट विद्यार्थ्यांना अडसर वाटते. शिस्त ही तंबोऱ्याच्या तारांसारखी असते. तारा सैल ठेवल्या तर त्यातून बेसूर निघतात अन् जास्त आवळल्या तर तुटतात. हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यायला हवे.
👉⚜🙏🏻👏🏻 _*शिक्षकांना हवाय सन्मान, तो कसा मिळेल? यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या…*_ ⚜🙏🏻👏🏻
❇1) _*शिक्षकांची भूमिका लक्षात घ्या*_ : ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.
🌹2) _*बदल होतोय, थोडा वेळ द्या*_ : तंत्रज्ञान झपाटयाने बदलत आहे. आधीचे साधे वर्ग आज ई-लर्निग रूम झालेले आहेत. काळ्या फळ्यावर पांढर्या खडूने लिहिलेल्या शिक्षकांच्या वळणदार अक्षरांऐवजी टेबलावरील संगणकावर किंवा भिंतीवरील स्क्रीनवर वेगवेगळ्या फाँटमधील वेगवेगळ्या स्टाईलची रंगीत डिजिटल अक्षरे चमकताना दिसतात. हा काळ संक्रमणाचा आहे. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीत झालेले बदल, वाढणारा कामाचा व्याप शिक्षकांना त्रासदायक वाटत असला तरी हा बदल ते स्वीकारत आहेत फक्त गरज आहे त्यांना थोडा वेळ देण्याची!
🔰3) _*प्रोत्साहनासाठी हवा पुरस्कार*_ : ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळेल. आज ही कोणत्याही पुरस्काराची किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने काम करणारेही अगणित शिक्षक आहेत. तरीही प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने जास्त प्रेरित होऊन कृती करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही हे प्रोत्साहन ठरेल. आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो, आपल्या कार्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे ही भावनाही सुखावून जात असते. पुरस्कार मिळणे हेच काही सर्वस्व नसते.
🙏🏻👏🏻4) _*शिक्षकांच्या जिद्दीला हवा सलाम*_ : विद्यार्थी जेव्हा मोठे होतात, ते एखाद्या मोठ्या पदावर आसनस्थ होतात, चांगले पद भूषवतात त्यापेक्षाही महत्त्वाचे ते ‘आदर्श नागरिक’ बनतात. तीच खरी शिक्षकांसाठी पावती असते. शिक्षकाच्या कार्यासाठी हाच खरा पुरस्कार असतो. मोठ्यामोठ्या संस्थांमधील जागृत पालकांकडून विद्यार्थी निम्मा घरीच घडविला जातो. पुढील काम शिक्षक करतात. शिक्षक ‘माणूस’ घडवितात, एक आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न करतात. खरंच त्यांच्या या जिद्दीला, चिकाटीला मानलेच पाहिजे.
🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻
शिक्षणाचा वसा घेणाऱ्या सार्या शिक्षकांना आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
🌹🙏🏻👏🏻🌹🙏🏻👏🏻🌹🙏🏻👏🏻
*_रसुल खडकाळे_*
♀♂♀♂♀♂♀♂♀♂♀♂♀♂
_*इस पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेअर करें ताकी ज्यादा से ज्यादा लोग इसका फायदा उठा सकें*_
⚜🔰⚜🔰⚜🔰⚜🔰⚜
_*GK जनरल नॉलेज ग्रुप*_
📚📖📚📖📚📖📚📖
♂ _रसुल खडकाळे_ ♂ *★+91916839035★*
🎊🎊🎊🎊🎊🎊
ग्रुप में शामिल होने के लिये अपना नाम और पत्ता ★+919168390345★
इस नंबर पर भेजें।जो अपने बारे में पुरी जानकारी भेजेगा सिर्फ उसी को ग्रुप में ऍड किया जायेगा
★★★★★★★★
सब लोग hiii, या ज्यादा चॅट करने में time जाया कर रहे हैं।एक मेसेज में आपकी पुरी detail भेजो
🔹🔹⭐🔹🔹⭐🔹🔹
🔹🔹⭐🔹🔹⭐🔹🔹
0
Answer link
५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. राधाकृष्णन हे एक महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि शिक्षक होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक दिन हा दिवस विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षकांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी शिक्षकांना भेट देतात आणि त्यांचे आभार मानतात.
शिक्षक दिन हा दिवस शिक्षकांसाठीही एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आणि समाजाकडून कृतज्ञता मिळते. हा दिवस त्यांना त्यांच्या कष्टाचे आणि त्यागाचे फळ मिळण्याचा एक दिवस आहे.
या वर्षी, ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिन साजरा केला जात आहे. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेट देऊया आणि त्यांना त्यांचे आभार मानूया.
शिक्षक दिनाच्या काही विशेष माहिती खालीलप्रमाणे आहेत:
भारतात शिक्षक दिन १९६२ पासून साजरा केला जात आहे.
शिक्षक दिन हा दिवस भारताबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.
शिक्षक दिन हा दिवस शिक्षकांच्या योगदानाचा आणि महत्त्वाचा एक दिवस आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांना कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांना सांगूया की आपण त्यांच्यामुळेच आपण आज आहोत.