शिक्षक

शिक्षक म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

शिक्षक म्हणजे काय?

1
शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे

ज्ञानाची पानं

त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते

अनजानाजान जाउन निपान्या



शिक्षक म्हणजे 

अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या

अस्फुट चित्कारांना

किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी

लटकेली असतात

कित्येक भावनांच्या डोहात भिजून

नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची

निरागस अक्षरे

शिक्षक नसतो कधीच बिचारा तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते

शाळेला

तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या

गोळ्यातून

सूर्याचं तेज बाहेर काढणारा

तो समाज सुधारक क्रांतीकारकही तोच

कित्येक चेतनांना पाठबळ असते

त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे

शिक्षकाला जपावी लागतात
शिक्षक म्हणजे 



कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो

एका मुक्तपणे बागडणाऱ्या

निराकार चैत्यनाला...

कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं

जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत

निर्ममपणे....

कधी अंधार ही प्यावा लागतो बोनबोभाट

पणे

तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर

त्याच्या सोबतील असतेच की खडूची

धारदार तलवार अन्

फळ्याची ढाल असते पाठीशी

विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार

संपून उजेडाचे राज्य येईल.

अन तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
उत्तर लिहिले · 11/1/2023
कर्म · 48555

Related Questions

५सप्टेंबर:शिक्षक दिन विशेष माहिती?
पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष कोण असते?
शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी स्वाध्याय 13?
नवीन शिक्षण पध्दती शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भुमिका स्पष्ट करा?
शिक्षकांच्या क्षमतांचे महत्व विशद करा?
शिक्षक हा व्यवसाय आहे का?
शालेय व्यवस्थापनातील शिक्षकाची भूमिका कोणती आहे?