सहकार

बिना सहकार नहीं उद्धार?

2 उत्तरे
2 answers

बिना सहकार नहीं उद्धार?

0
बिना सहकार नहीं उद्धार
उत्तर लिहिले · 9/5/2023
कर्म · 5
0
सुजाण नागरिक हो .
सहकार ...एकमेकां साह्य करू , अवघाचि धरू सुपंथ ...
आपण अविकसित व मागास होतो , परिवर्तनाची बीजाक्ष रूजत यंत्रयुगाने या माणसाला माणसात आणले , कारण माणसाचे उत्पन्न गरजा भागविण्यासाठी वाढ झाली., पोटाची भूक आहे आपण सर्व संवेदनशील समाजमन बांधिलकी मानतो. आपण विवेकी विचार करून सहजतेने विशालतेकडे झेपावत आहोत . आणि सहकारात हे सत्कृत्य एकत्व सत्य प्रेम वाढेल आणि सुधारणा होतील हे जाणकारांनी हेरले.सहकार उद् यास आला.
आणि म्हणूनच आता जनजागृती होत आहे. मिलवर्तन घडून येत आहे.सहकार वाढत आहे. सहकार्याशिवाय समान्यजीवन सुधारणार नाही ही वस्तुस्थिती तत्कालीन समाजसुधारक जाणून होते तशी दुरदृष्टी राहिली व लोक एकत्र आली पाहिजेत व शेती पाणी व्यवस्थापन झालं पाहिजे यातूनच एक संघटना कार्यरत व्हावी म्हणून प्रयत्न केला गेला व सहकारी संस्था, सोसायटी,बॅंका , पतसंस्था ,दूध सोसायटी,ग्राहक संस्था ,छोटे मोठे योगदान घडून आले. साखर उद्योग सहकारी सुरू झाले .
त्या वेळी शिक्षणसंस्था शिक्षण सुविधा अपुरी , त्यामुळे शिक्षण संस्था स्थापन केल्या गेल्या.. परिवर्तन मिलवर्तन घडून आले आणि समाजहित समाजकल्याण समाजकारण अर्थकारण सुधारले .यातून नेतृत्व करणारे लोक पुढे आले . शिक्षण स्तर हळुहळू सुधारत आहे तोपर्यंत सहकारावरील व्यवस्थापन ठराविक लोक करत होते कालांतराने त्या लोकांचाच परिवार सत्तेत सहभागी व अग्रणी कायमदायम समर्थपणे वाढू लागला . 

आपण विवेकी विचार करून सहजतेने विशालतेकडे झेपावत जातो हे सत्कृत्य आचरण सहकाराने पुढे ठेवले. तरी परंतु माणसं डोळस असतात. आपण म्हणतो की,उघडा डोळे बघा नीट...तसे पाहिले तर या वर्तमानी सर्वोत्तम परिवार या  सहकारात कोणाचे तयार झाले ? प्रश्न आमुचा उत्तर तुमचे . बळकटीकरण कोणाचे झाले , सहकारातील मनुष्यबळ प्रस्थापितांना हात देऊ लागला ,राबू लागला . एवढंच काय त्यांची सगळी कामं हलू लागली. राबराब राबवायचे व पगार सहकारी संस्था देत आहेत हे चित्र वास्तव यथार्थ पुणे आज ही समोर आले आहे.ही गुलामगिरी नव्हे काय ?  आम्हीही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत . त्यावर कोणीच बोलत नाही ,बोलावे तर त्या गरिबांची रोजीरोटी बंद होणार आणि बोलणारे वेठीस धरले जाणार .. कारण अहंकारी वृत्ती ही पैसेवाल्यांची ओळख तशी ती संस्कृती आहे ... विवेकी विचार करून सांगा हे खरं आहे की नाही. ?
 कष्टकरी , शेतकरी, कामगार यांचे शोषण थांबले नाही ही वस्तुस्थिती आहे, हा वर्तमान कुणाचा तर लोक म्हणतात की हे साखर सम्राट, शिक्षणसम्राट,दुध सम्राट ,वाळु सम्राट ,बिल्डर  यांचा आहे.. तर याअश्या सम्राटांचे अनेक गट संघटन होऊन ते भक्कम होत आहे. हे पुढे आहेच . या लोकांनी गोलमाल करीत त्यांनी त्यांचीच अर्थव्यवस्था  बळकट केली ...आणि समाजहित समाजकल्याण समाजकारण राजकारण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि सरकारे सुध्दा यांचेच आली....हे सत्य आहे. ज्यांच्याकडे साखर कारखाना त्यांचाच खासदार आमदार निवडून येतोय , ही लोकशाहीची गळचेपी नव्हे काय ?
  हां बोला , मग हा वर्तमान कोणाचा आहे ? 
हा , सहकारी धंदा कोणाचा आहे ...
बहुजन हिताय बहुजन सुखाय खरंच हे सत्कृत्य आचरण असेल तर कोणी कोणाचा उद्धार  करून  घेतला .. गरीब कष्टकरी कामगार तसेच उदासीन आहेत... दिवसेंदिवस ही सरंजामशाही मूळ धरुन वाढत आहे.. कारखान्यांची नांव चेंज झाली ,खाजगी झाली.. थोडाफारच सहकार उरलाय ही खरी ओळख काहींनी टिकवली असली तरी तिला खाजगीकरणाचा मोह कसा नसेल ? हा विवेकी विचार पडताळून पहावा लागेल...

तर या वर्तमानी या गोष्टी  पहाता आपल्या सर्वसामान्यांचा विश्वास आणि स्थिरमना वर हे नमूद आघात सुरू नाहीत काय ? आपले हे विवेक विचार कोणी दडपले कोणाची दडपशाही आहे ...हे जाणा ..
हा सहकार संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत असतो...जोडत राहतो ... तो समन्वय समन्यायी समतोल ठेवण्यासाठी विवेकी पालकत्व हवे.... तरच विना सहकार नहीं उद्धार म्हणता येईल !!
उत्तर लिहिले · 9/4/2024
कर्म · 455

Related Questions

जिल्हा सहकार मंडळे व्याख्या?
बिना सहकार नहीं उद्धार निबंध?
सहकार संस्थे चे कामकाज कोणत्या पद्ध ति ने चलते?
सहकारी संस्थेचे कामकाज कोणत्या पद्धतीने चालत असते?
ठराव लिहिण्याची पद्धत कोणती आहे?
उपविधी म्हणजे काय?
सहकार म्हणजे काय ?