वाणिज्य

ई-कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स चे प्रकार कोणते आहे?

1 उत्तर
1 answers

ई-कॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स चे प्रकार कोणते आहे?

0
ईकॉमर्स म्हणजे काय? ई-कॉमर्स (ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स देखील म्हणतात) 
ई-कॉमर्स (इलेक्ट्रॉनिक कॉमर्स) म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर, प्रामुख्याने इंटरनेटद्वारे निधी किंवा डेटा प्रसारित करणे . हे व्यवसाय व्यवहार एकतर व्यवसाय-ते-व्यवसाय (B2B), व्यवसाय-ते-ग्राहक (B2C), ग्राहक-ते-ग्राहक किंवा ग्राहक-ते-व्यवसाय म्हणून होतात.

 ई-कॉमर्स म्हणजे   काय कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करणे म्हणजे इ कॉमर्स होय. साधारणत: आठ ते दहा वर्षांपूर्वी आपल्याला एखादी वस्तू जसे की मोबाईल, पुस्तक, इत्यादी. घ्यायचे असेल तर बाजारात जाऊन कित्येक दुकानांमध्ये त्या वस्तू विषयी चौकशी करायला लागायची, तरीदेखील आपल्याला पाहिजे तीच वस्तू भेटेल याची खात्री नव्हती आणि काही कारणास्तव जर आपण खरेदी केलेली वस्तू परत करायला गेलो तर दुकानदार ती वस्तू परत घेत नव्हते.


ई-कॉमर्स म्हणजे काय
सध्याच्या या आधुनिक काळात ई-कॉमर्स मुळे आपण घरी बसल्या आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करू शकतो. तसेच काही कारणास्तव जर ती वस्तू परत करायची असेल तर ती परत देखील करू शकतो आणि त्या बदल्यात आपण दिलेले पैसे परत मिळवू शकतो. आणि याशिवाय इ कॉमर्स ecommerce in marathi चा एक खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे यावरून खरेदी केलेल्या वस्तू डायरेक्ट आपल्याला घरपोहोच मिळतात.

इ कॉमर्स चे प्रकार (types of ecommerce information in marathi)
१. Business to consumer (B 2 C) :
ई-कॉमर्स च्या इतर मॉडेलच्या मॉडेल्स पेक्षा B 2 C हे मॉडेल खूप जास्त लोकप्रिय आहे. B 2 C मोडेल म्हणजे एखाद्या व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये होणाऱ्या वस्तूंचा व्यवहार किंवा देवाण-घेवाण होय. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑनलाइन विक्रेत्यांकडून ग्राहकाने खरेदी केलेला मोबाईल.


२. Business to Business (B 2 B) :
b2b प्रकारच्या ई-कॉमर्स म्हणजे दोन व्यवसाय यांमधील होणारी वेगळ्या प्रकारची देवाण-घेवाण. यामध्ये एक व्यवसाय करणारी कंपनी दुसरा कंपनीला काही सेवा देते या सेवांमध्ये मुख्यतः कच्चामाल, काही सॉफ्टवेअर्स किंवा इतर काही प्रकारचा तयार झालेला माल विक्रीसाठी होलसेलरला दिला जातो. b2b प्रकारच्या इ कॉमर्स मध्ये व्यवसाय कंपनीचे ग्राहकाशी थेट संबंध येत नाही. काही वेळेस व्यवसाय कंपनी किरकोळ विक्रेत्यांना देखील थेट माल विकते.

३. Direct to consumer (D 2 C):
ई-कॉमर्सचे D2C मॉडेल हे खूप नवीन मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये एखादी वस्तू डायरेक निर्माता कंपनीकडून ते ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये डिस्ट्रीब्यूटर, होलसेलर किंवा रिटेलर यांचा कुठल्याही प्रकारचा समावेश होत नाही. त्यामुळे ग्राहकाला ही वस्तू स्वस्तात मिळते आणि याच कारणामुळे हे मॉडेल सध्या खूप लोकप्रिय होत चालले आहे. D2C मॉडेल मध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट यांसारख्या समाज माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे.

४. Consumer to Consumer (C2C):
ग्राहक ते ग्राहक या प्रकारच्या एक कॉमर्स मध्ये वस्तूंची देवाणघेवाण ग्राहकांमध्ये होते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसायिकाचा, होलसेलर , रिटेलर्स कोणाचाही संबंध येत नाही. एखादी वस्तू एका ग्राहकाकडून थेट दुसऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते.

५. Consumer to Business (C2B) :
कंजूमर टू बिजनेस ई-कॉमर्स मध्यमान एखादा व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या सेवा किंवा वस्तू थेट एखाद्या व्यवसायिक कंपनीला किंवा संस्थेला विकतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे फोटोग्राफर किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणारे व्यक्ती.


उत्तर लिहिले · 9/3/2023
कर्म · 48555

Related Questions

अर्थशास्त्र आणि वाणिज्य शास्त्र यांच्या विवेचन करा?
वाणिज्य व्यापती थोडक्यात स्पष्ट करा?
अर्थशास्त्र आणि वाणिज्य शास्त्र यांच्या संबंधाचे विवेचन?
11वी वाणिज्य व व्यवसायाची ओळख स्वाध्याय आणि उत्तर कोणते येईल?
भागीदारांचे पाच फायदे कोणते येतील?
चिटणीस म्हणजे काय व चिटणीसांची वैशिष्ट्ये कशी स्पष्ट कराल?
उद्योग व वाणिज्य यातील फरक कोणता येईल?