2 उत्तरे
2
answers
भारताच्या गवताळ प्रदेशात कोणता पक्षी आढळतो?
1
Answer link
भारताच्या गवताळ प्रदेशात माळढोक पक्षी आढळतो
माळढोक पक्षी हे भारत आणि पाकिस्तानातील काही गवताळ प्रदेशात आढळतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील गवताळ प्रदेशात ते मोठ्या संख्येने सापडत
. परंतु गवताळ परिसंस्थांवरील अतिक्रमणे, 'पडीक जमिनी' असे सरकार दरबारी झालेले गवताळ प्रदेशांचे चुकीचे वर्गीकरण, कोळसा खाणींचा फैलाव आणि गवताळ अधिवासातही 'हिरवळ' तयार करण्याच्या काही अजब सरकारी योजना माळढोकांच्या अस्तित्वावर आघात करत आले आहेत. गेल्या काही वर्षांत, अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा सुळसुळाट भारतात सर्वत्र दिसून येत आहे. 'पर्यावरणस्नेही' अशी या प्रकल्पांची ख्याती असली, तरी या प्रकल्पांमुळे दुर्मिळ माळढोक पक्ष्यांवर नामशेष होण्याची पाळी आली आहे