देव

देव मनुष्य अवतार का घेतात?

1 उत्तर
1 answers

देव मनुष्य अवतार का घेतात?

1

देव मनुष्य अवतार का घेतात


आपण मानव ज्या देवांची पुजा करतो ते माणसारखे दिसतात, वागतात, बोलतात, हसतात. देवांची मुर्तीसुद्धा माणसासारखी घडवलेली असते. आता काही देव याला अपवाद आहेत जसे श्रीदत्त गुरु, महाबली हनुमान, गणपती, भगवान विष्णु, मात्र इतर देवता किंवा देवी या मनुष्याप्रमाणे आहेत. देवांनी जे काही अवतार घेतले आहेत ते मनुष्यरुपात घेतलेले आहेत. आता प्रश्न पडतो, परमेश्वर अवतार का धारण करतात?
परित्राणाय साधूनां । विनाशायच दुष्कृतां ॥
धर्म संस्थापनार्थाय । संभवामि युगे युगे ॥
साधूंच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी व धर्माच्या संस्थापनेसाठी मी युगायुगात अवतार घेतो पण प्रश्न असा आहे की, अवतरणे म्हणजे नेमके काय..? खाली येणे का..? मग देव जर सर्वत्र आहे तर, तो खाली येतो म्हणजे काय..? देव अवतरतो म्हणजे काय..?




पै मूर्तीचेनि मेळे । तो मूर्तिच होऊनि खेळे ॥
परि अमूर्तपण न मेळे । दादुलयाचे ॥
त्याच्या अमूर्तपणाला धक्का न लागता तो मूर्तरूपाला आला. म्हणजे जो परमात्मा प्रत्यक्ष दिसत नव्हता तो इंद्रियांसकट दिसू लागला. अवतार म्हणजे वेगळे काही नाही. अवताराचे प्रयोजन संपले तरी कार्य शिल्लकच राहते. देव विचार करतो की जे साधूही नाहीत आणि जे दुर्जनही नाहीत, असे अज्ञानी लोक तर दु:खातच आहेत अशा लोकांचा उद्धार तर झाला पाहिजे. देवत्व न सुटता जीवाचा उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी मनुष्यरुपाने देवाने अवतार घेतला आणि समाज उध्दाराचे कार्य केले. प्रभुराम किंवा श्रीकृष्ण यांनी रामायण आणि महाभारत काळात घेतलेला अवतार आपल्याला आठवत असेल.
जेव्हा देव मानवाच्या अवतारात पृथ्वीवर येतात तेव्हा त्यांना देखील भावभावना असतात. त्यांना मनुष्याप्रमाणे यातना भोगाव्या लागतात. प्रभुराम यांना चौदा वर्षे वनवास भोगावा लागला होता. श्रीकृष्ण यांचे राधेवर अपार प्रेम होते पण तिला सोडून कंसाचा संहार करण्यासाठी मथुरेत जावे लागले. राधेबरोबर त्यांचा विवाह झालाच नाही. त्यांच्या डोळ्यासमोर राधेने आपल्या प्राणांचा त्याग केला पण प्रभु काही करु शकले नाहीत. खरंतर ते देवाचा अवतार होते ते वनवास टाळू शकले असते. राधेला पुन्हा जिवंत करु शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही. मनुष्य जशा यातना भोगतो अगदी त्याप्रमाणे त्यांनी त्रास भोगला प्रसंगी अपार आनंदाचा देखील अनुभव घेतला. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी युद्ध देखील केले.
मनुष्य आपल्या देवाला आपल्याच बाह्यआकार, रूपात पाहतो. देव पृथ्वीवर अवतार घेतात. ते माणूस म्हणून जन्माला येतात, माणसासारखं वाढतात, वागतात, पृथ्वीवर लीला दाखवतात, कृतीतून देव म्हणून सिद्ध होतात, म्हणूनच माणसाचा देव माणसासारखा दिसतो. देवाची मूर्ती घडवताना दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय, दोन कान, एक नाक, चेहरा सगळे माणसासारखे असते. माणसाला देव आपल्या रूपात भावतो. राम, श्रीकृष्ण यांचा अवतार मनुष्यरूपातच झाला आहे. त्यांनी माणूस म्हणून कर्म केले. शिवशंकर, विष्णू, ब्रह्मा, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती आदी सगळ्यांच देवतांबद्दल माणसाची ही श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे. देवांच्या लीला आपण आपल्या शब्दांत रंगवतो. पोथ्या पुराणांतून देवाच्या माणूसपणाचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात.
तुम्ही देवाचे स्मरण करा त्या अवतारांचा आदर करा पण त्याचबरोबर त्यांनी जे कार्य केलं त्यातून काहीतरी शिका. चांगलं कार्य करण्यासाठी देवांकडे जसे चार हात आहेत त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला बुद्धी दिली आहे त्याचा वापर करा. दोन हात, दोन पाय दिले आहेत त्याद्वारे मेहनत करा. मनाची शक्ती ओळखा तुम्ही मनात आणलं तर काहीच अशक्य नाही पण निराशेने घरात बसलात तर जीवन संपलं म्हणून समजा. तुमच्याकडे जी विचारांची शक्ती आहे त्याचा वापर करा. माणसानेच देवत्वाला जन्म असून त्याला थोरपण दिले आहे.अनेक महात्म्यांना देवपण देत आपण अजरामर करत आहोत. ही देवपण देण्याची दृष्टी मात्र सगुण असावी, निर्गुण असावी. ‘घेता घेता एक दिवस’ देवाचे कर्म घेता आले पाहिजे. त्याप्रमाणे तुमचे आचरण असेल तर सगळं काही शक्य आहे.
उत्तर लिहिले · 16/2/2023
कर्म · 48465

Related Questions

पशुधनाचे रक्षण करणारा. देव होता?
देव नसून घंटी वाजवतो?
महाराष्ट दर्शन मध्ये कोणकोणते देव स्थान पाहण्यासारखे आहेत.?
आपल्या मनात काय सुरु आहे हे कोणत्या देवाला कळू शकते? अशे कोणते देवता आहे ज्यांना आपल्या मनातील गोष्टी कळू शकतात? सर्वच देवाजवळ ही शक्ती असते काय?
देवाच्या काठीला आवाज नसतो असे का म्हणतात?
घरामध्ये देव घर कोठे असावे?
पशुधनाचे रक्षण करणारा देव कोणता आहे?