तारे

तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह लुकलुकताना का दिसत नाहीत?

1 उत्तर
1 answers

तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह लुकलुकताना का दिसत नाहीत?

0
i) तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाशम्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल, तसेच घनता व तापमान यांमधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपणास तारे लुकलुकताना दिसतात.



ii) ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात व ते एक बिंदूस्रोत नसून बिंदूस्रोतांचा समूह असतो. परिणामी, वातावरण स्थिर नसले तरी, ग्रहांची सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते. म्हणून आपणास ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत


रात्रीच्या वेळी आकाशात जे लुकलुकणारे हजारो पृथक प्रकाश बिंदू दिसतात, त्यांना आपण चांदण्या किंवा तारे म्हणतो. तारे लुकलुकतात, तर ग्रह लुकलुकत नाहीत आणि त्यामुळे ग्रह व तारे हे निरनिराळे ओळखता येतात. ग्रह परप्रकाशित असतात, तर तारे स्वयंप्रकाशी असतात.

चांदण्या पाहता पाहता मधेच एखादी चांदणी लुकलुकून नाहीशी झाल्याचा भास होतो, तर काही चांदण्या नव्याने दिसावयास लागतात. काही तारे तांबडे मंदप्रकाशी दिसतात, तर काही तारे अत्यंत तेजस्वी पांढरे स्वच्छ दिसतात. पृथ्वीच्या दैनंदिन वलन गतीचा विचार सोडून देता, आपल्या पूर्वजांनी असे पाहिले की, या चांदण्या आपल्या परस्परसापेक्ष जागा बदलत नाहीत म्हणून काही ताऱ्यांच्या संचांमधून त्यांनी काल्पनिक आकृत्या काढल्या. या आकृत्यांनाच मृग, सिंह, सप्तर्षी वगैरे नावांनी ओळखतो.
उत्तर लिहिले · 6/2/2023
कर्म · 48555

Related Questions

आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो काय असल्यास कसा नसल्यास कसा?
सूर्य चंद्र तारे आणि निसर्ग चक्र यांचा पशुपक्षी ,मानवी जीवनाशी काय संबंध आहे आणि माणसाला या चक्रातून नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान यांची अनुभूती येते , त्यामुळे मानवी जीवन परिवर्तनशील झाले आहे याबाबत आपली प्रतिक्रिया प्रकट करावी ?
आकाशात किती तारे आहे?
मी कोण ते ओळखा, माझ्यामुळे परिपथामधील विद्युतवाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात?
माझ्यामुळे परिपथामधील विद्युतवाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात.?
विशाल ना 136 लांब तारेपासून मला तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
भाषातरांचे स्वरूप कोणते आहे?