भारत लोकसंख्या

भारतातील लोकसंख्या वाढीचे कारणे स्पष्ट करा?

1 उत्तर
1 answers

भारतातील लोकसंख्या वाढीचे कारणे स्पष्ट करा?

0
लोकसंख्या वाढीचे कारणे 
१) जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.

२) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.

३) जन्म ही ईश्वरी देणगी आहे :- काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते.

४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :- वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते.

५) बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण :- ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते.

६) मुलीच्या लग्नाचे वय :- ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत ती गर्भधारणा करू शकते. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालणारे घटक आहेत.

७) निरक्षरता :- आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्री पुरुषामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्या संबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायला हवी.
उत्तर लिहिले · 2/2/2023
कर्म · 48555

Related Questions

भारतातील धातु उद्योगाची सविस्तर माहिती .?
भारताचे राष्ट्रपिता कोण?
ऑलम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसाळाने पदक जिंकून भारताचा मान उंचावला यातील सर्वनामे?
हाडाचे प्रमुख सांगा हाडाचे प्रमुख कोणते ते सांगा भारताचे सामाजिक व प्रमुख फळे कोणती आहेत?
भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये कोणत्या देशामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे?
भारत देशात किती राज्य आहे?
प्राचीन भारताच्या इतिहासची अपुरातत्विय साधने?