शब्दाचा अर्थ

'कृष्णावळ' म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

'कृष्णावळ' म्हणजे काय?

1


कृष्णावळ म्हणजे काय


‘कृष्णावळ’ किती छान शब्द आहे ना… ऐकल्यावर किती भारी वाटतं. हा शब्द आपल्या बोली भाषेत फार वापरला जात नाही पण पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेत या शब्दाचा वापर काही ठिकाणी केला जातो. तुम्हाला माहित आहे का ‘कृष्णावळ’ म्हणजे काय? ‘कृष्णावळ’ कोणाला म्हणतात?.... कृष्णावळचा अर्थ आहे कांदा!!! काहीजणांना हे वाचून नक्की हसू आलं असेल, पण हे खरं आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना याची माहिती नक्की असेल. भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना रडविणारा, भाव गगनाला गेले की आम्हा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा असा हा ‘कांदा’. या ‘कांद्या’ला ‘कृष्णावळ’ म्हणतात याचे कारण पण गंमतशीर आहे. कांदा उभा चिरला तर तो शंखाकृती आणि आडवा चिरला तर चक्राकृती दिसतो. आता शंख आणि चक्र ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ असे म्हणतात. पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.
कृष्णावळ म्हणण्यामागे केवळ हेच एक कारण नव्हे तर जर आपण कांदा त्याच्या पानांसह उलटा धरला तर तो गदा रुपात दिसेल. कांद्यावरील पातीशिवाय तो पद्म अर्थात कमळाचा आकार घेतो. गदा, पद्म ही आयुधे भगवान विष्णू शंख आणि चक्रासह धारण करतात.कृष्ण आणि वलय असे दोन्ही शब्द एकत्र करुन हा कृष्णावळ शब्द तयार झालाय.
कर्नाटक आणि तामिळनाडू भागात आजही कांद्याला कृष्णावळ असे म्हणतात. आपल्या किचनचा राजा म्हणजे कांदा… दिवसातून एकदा तरी कांदा चिरावाच लागतो. भाजी कोरडी करा किंवा रसभाजी, कांदा हवाच. जेवणावर कच्चा खाण्यासाठी कांदा हवा आणि चाट पदार्थ केले तर मग काय कांद्याशिवाय आपलं पाऊल पुढेच जात नाही. कांदा चिरताना तो जरी खूप रडवत असला तरी कांदा खाणं आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं ठरतं. कांदा आरोग्याप्रमाणे केस, त्वचेसाठीही औषधी आहे. सध्या कांद्याचे तेल केसांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे. भारतात लाल आणि पांढरा कांदा असे दोन प्रकार आहेत. कांदा वापरुन अनेक रुचकर पदार्थ केले जातात मात्र मला कांदा म्हटलं की गरमागरम कांदा भजी आठवतात. सध्या थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे जो काही हिवसाळा आपण अनुभवतो आहोत त्यात कांदा भजी म्हणजे लाजवाब!!
कांद्याबद्दल व्हॉट्सअपवर एक मेसजपण फिरतो तो तुम्ही तो नक्की वाचला असेल. मैत्री ही एक कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील पण जर तुम्ही त्याना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील… वा! ज्यांनी कोणी लिहलंय त्यांना सलाम फारच अफलातून लिहिलेलं आहे. कांद्यातून मैत्रीचे मर्म समर्पकपणे समजावलं आहे.
चातुर्मासात कांदा खात नाहीत, असे आपल्या पुराणात सांगितले आहे. पावसाळ्याच्या काळात चार्तुमास येतो, अशा वेळी वातुड स्वभावाचा कांदा पचनशक्तीवर परीणाम करु शकतो म्हणून त्या काळात कांदा खावू नये असे म्हणतात. चातुर्मास सुरू होण्यापूर्वी कांदेनवमी साजरी करतात. यावर काही मतमतांतरे आहेत पण त्यात न पडता आपण कांदे पुराणाचा आनंद घेवूया.
कांद्यावरुन आपल्याकडे म्हणीसुद्धा आहेत. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात, नाकाने कांदे सोलणे. कोणी रागवलं तर म्हणतात, नाकाचा शेंडा बघ कसा लाल झालाय…. अनेकदा आपण म्हणतो अकलेचा कांदा आहेस किंवा डोक्यात कांदे बटाटे भरलेत का??? असे विचारतात. आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात करणारी पहिली पायरी म्हणजे ‘कांदा’...आर्श्चय वाटलं… अहो कांदे पोहे!! आठवले ना… तो बघण्याचा कार्यक्रम…. तर असे हे कांदेपुराण तेव्हा आता जर तुमच्या सासूबाई म्हणाल्या, कृष्णावळ दे तर अजिबात गडबडून जायचे नाही त्यांना कांदा चिरू द्या आणि हो कृष्णावळ का म्हणतात ते सुद्धा सांगा.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 48555

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?
समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?
वाचन म्हणजे काय व त्याची वैशिष्टे कोणती येतील?