तुलना

झाड आणि माणूस यांची तुलना कशी कराल?

1 उत्तर
1 answers

झाड आणि माणूस यांची तुलना कशी कराल?

0
झाड 🌲 आणि माणूस 🧔

अनेक जणांना घरांच्या बाल्कनीत किंवा मोकळी जागा असेल तर बाग करून रोप लावायला आवडतात. त्यात अनेक शोभेची, नाहीतर घरगुती उपयोगाची झाडं लावलेली असतात, कढीपत्ता तर हमखास दिसतो. कधी कधी धने पण टाकलेले असतात. कोरफड, तुळशी तर असतेच असते. कितीतरी सुंदर आणि ओळखू न येणारी झाडं त्या घरात नांदत असतात. घराची शोभा वाढवतमाणूस आणि झाड दोन्हीही जिवंत. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या क्षमतेनं जगायचं असतं. फक्त माणसाला त्याची एक पद्धत अवगत झाली आहे, त्याला स्वतःची बोलीभाषा आहे. झाडांना बोलीभाषा नसली तरी जगण्याची पद्धत आहेच. फरक फक्त एवढाच, की (झाडांना मेंदू नाही. बाकी तगून राहण्याचा संघर्ष झाडाला आणि माणसाला करायचा असतोच.
rझाडं त्या घरात नांदत असतात. घराची शोभा वाढवत असतात. असंच एकदा एका ओळखीच्यांच्या घरी मी गेले होते, तेव्हा त्यांच्या बागेत एक मोठं कढीपत्त्याचं झाड होतं, चांगलं टुमदार होतं ते. त्याला खूप फुलंही आली होती आणि त्याच्याच सावलीखाली आजूबाजूला असंख्य कढीपत्त्याची छोटी छोटी रोपं आली होती. जवळजवळ त्या झाडाच्या आजूबाजूला पन्नास एक रोपांनी त्यांचा पसारा वाढवला होता. मला तर ती रोपं पाहून वाटलं, की ते झाड म्हणजे त्या रोपांची आईच! त्या झाडानं तिच्या आजूबाजूला आपल्या पिल्लांचा गुंतवळा निर्माण केला होता. तुळशीचं पण तसंच. तिच्या आजूबाजूलासुद्धा असंख्य तुळशी डोलत होत्या.

ते पाहून माझ्या मनात विचार आला, आपणपण त्या झाडांसारखेच असतो ना, आपल्यालासुद्धा आपल्या माणसांचा पसारा वाढवायचा असतो. आपल्याभोवती मायेच्या माणसांचा गुंतवळा तयार करायचा असतो.

मला नेहमी प्रश्न पडतो, की आपण असा हा नात्यांचा गुंता तयार का करतो? जन्मतःच माणूस ज्यांच्या पोटी जन्माला येतो तिथून त्याच्या नात्यांचा प्रवास सुरू होतो. मग असंख्य माणसं त्याच्या आयुष्यात येतात आणि एक एक माणूस जोडत जाऊन मरेपर्यंत माणूस कुठल्या तरी गोतावळ्यात राहतो. तो असं का राहतो? त्याला असं राहायला का आवडतं? नेमकं कशासाठी त्याला एवढ्या ओळखी, बंध वाढवायचे किंवा घडवायचे असतात? अर्थात या प्रवासात तो जगण्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी सतत जोडला जातोच किंवा संपर्कात राहतोच असं नाही.


उत्तर लिहिले · 2/1/2023
कर्म · 48555

Related Questions

स्त्री पुरुष तुलना ताराबाई?
पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा?
भारतीय अर्थव्यवस्थेवर व जगातीक अर्थव्यवस्था बरोबर तुलना करा?
ताराबाई शिंदे लिखित पुरुष तुलना?