सामान्य ज्ञान फरक

वजन व वस्तुमान यातील फरक काय?

2 उत्तरे
2 answers

वजन व वस्तुमान यातील फरक काय?

4
भरपूर मोठा फरक आहे. खरंतर आपण दैनंदिन जीवन जगण्यात "weight" किंवा "वजन" असा शब्द वापरतो. परंतु तो वैज्ञानिकदृष्ठ्या चुकीचा आहे.

वजन (Weight) म्हणजे एकूण किती बल पृथ्वीला पाहिजे ती वस्तू जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठी. कोणत्याही वस्तूचे वजन किंवा weight हे एकुण बलात मोजतात अर्थात Newton एकक मध्ये.
हयाउलट,
वस्तुमान (Mass) म्हणजे एकुण किती पदार्थाने (matter) ती वस्तू बनली आहे. आपण दैनंदिन जीवनात जे वजन म्हणतो ते खरंतर वजन नसून वस्तूचे वस्तुमान असते. ह्याचं वस्तुमानाला किलो मध्ये मोजतात.

समजा तुम्ही पृथ्वीवर आहात आणि तुमचे वस्तुमान 50 किलो आहे. तर तुमचे वजन (weight) 50 x 9.80 = 490N (490 न्यूटन) होईल. इथे 9.80 हा पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बल आहे. म्हणजेच तुम्हाला जमीनवर स्थिर ठेवण्यासाठी पृथ्वी 490न एवढे बल लावतेय. पण तुम्ही जर चंद्रावर आहात तर 50 x 1.62 = 81N एवढे बल चंद्र लावेल. अर्थात तुम्ही पृथ्वीवर जेवढे वजनाचे आहात त्यापेक्षा अत्यंत कमी वजन तुमचे चंद्रावर असेल. आणि समजा तुम्ही पूर्ण स्पेसमध्ये आहात जिथे पूर्णपणे गुरुत्वाकर्षण नाहीये तर तुमचे वजन 50 x 0 = 0N असेल आणि तुम्ही तरंगत असाल.

म्हणून फरक लक्षात घ्या.
1. वस्तुमान (mass) कधीही बदलत नाही. तुमचं खरखूर वजन तुमचं body mass असतं. त्याला किलोमध्ये मोजतात.
2. तुमचं वजन (weight) जागेनुसार बदलत. अगदी उंचावर किंवा खाली गेले असतात गुरुत्वाकर्षण कमी जास्त होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर पडणारे बलसुद्धा बदलते. तुमचं weight एक फोर्स आहे ज्याला न्यूटन(N) मध्ये मोजतात.

समजलं? 🥰🥰

उत्तर लिहिले · 23/9/2022
कर्म · 75305
0
उत्तर लिहिले · 30/7/2023
कर्म · 0

Related Questions

एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
जीवांना खाण्याची आवश्यकता का आहे?
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे?
एका तासात साठच सेकंद का असतात?
मानवाच्या शरिरामध्ये किती टक्के पाणी असते?
भारताचे प्रधान मंत्री कोण आहेत?
जागतिक नारळ दिवस कधी साजरा केला जातो?