सामान्य ज्ञान चालू घडामोडी

देशातील पहिली तृतीयपंथी महिला पोलीस अधिकारी कोण?

2 उत्तरे
2 answers

देशातील पहिली तृतीयपंथी महिला पोलीस अधिकारी कोण?

0

देशातील पहिली तृतीयपंथी महिला पोलीस अधिकारी के. पृथ्वीका यामिनी (K. Prithika Yashini) आहेत. त्यांनी 2017 मध्ये तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector) पदावर रुजू होऊन इतिहास रचला.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 1/4/2025
कर्म · 220
0
*🏪 देशातली पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची प्रेरणादायी कहाणी*







कायदेशीर लढाई देत मिळवला आपला हक्क




————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
तृतीयपंथियांना कमी लेखावं, त्यांचा तिरस्कार करावा असं कुठेही लिहिलेलं नाही. पण तरीही आपल्या समाजात आणि आणि परदेशांमध्येही तृतीयपंथीयांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. https://bit.ly/41TSo8A त्यांना नोकरीवर घ्यायला टाळाटाळकेली जाते. सगळीकडे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. त्यांना समाजामध्ये चांगल्या राहणीमानाची नोकरी किंवा व्यवसायकरता येत नाही.पण आता या प्रश्नावरच्या जागृतीमुळे परिस्थिती बदलते आहे. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो आहे त्याचमध्ये आपणही चांगंल आयुष्य जगू शकतो असा आत्मविश्वास या समाजामध्ये निर्माण होतो आहे.
या लेखाच्या सुरूवातीला दिलेला फोटो आहे के. प्रीतिका यशिनीचा प्रीतिका तृतीयपंथी आहेत. आणि त्यांनी जिद्दीने स्वत:च्या कष्टांच्या बळावर पोलीस सबइन्स्पेक्टरची नोकरी मिळवली आहे. प्रीतिका देशातल्या पहिल्या तृतीयपंथी सब-इन्स्पेक्टर ठरल्या आहेत. त्यांनी तामिळनाडूच्या पोलीस अकादमीमध्ये या पदासाठी एक वर्षाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫या अभ्यासक्रमाच्या परिक्षेला बसण्यासाठीही प्रीतिकांना प्रचंड झगडा करावा लागला. तृतीयपंथी व्यक्तींना या परीक्षेला बसण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. हे सगळे अडथळे प्रीतिकाने कायदेशीर लढाई लढत तसंच बऱ्याच जणांशी पाठपुरावा करत दूर केले आणि आपली ओळख न लपवता या परिक्षेमध्ये प्रीतिकांनी यश मिळवलं.तामिळनाडू पोलीस अॅकॅडमीमध्ये त्यांना सहकार्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तामिळनाडूच्यापोलीस दलामध्ये नव्याने सामील होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची पासिंग आऊट परेड नुकतीच पार पडली. यावेळी या परेडमध्ये प्रीतिकाही सहभागी झाल्या होत्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी हे या परेडच्या वेळी उपस्थित होते पोलिस हे जनतेचे मित्र आणि संरक्षक असतात. त्यामुळे पोलिसांनी कशाचीही भीतीन बाळगता आपलं कर्तव्य पार पाडावंअसा संदेश त्यांनी पोलिसांना दिला.

https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24