निसर्ग
अश्विन महिन्यातील निसर्ग कसा असतो?
1 उत्तर
1
answers
अश्विन महिन्यातील निसर्ग कसा असतो?
1
Answer link
'आश्विन महिन्यातील निसर्गाचे
आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पावसाचे महिने संपतात अन् आश्विन महिना उजाडतो. जीवजंतूंचे वारेमाप पिकलेले पीक नष्ट करण्याचं आगळंवेगळं सामर्थ्यं आश्विनातील उन्हात असतं. या उन्हात सूर्याच्या
• जंतुनाशक अल्ट्राव्हायोलेट किरणांचं प्रमाण . जरा जास्तच असतं. याचकरिता अंथरूणे पांघरूणे धुऊन या महिन्याच्या उन्हात वाळू घालायची पद्धत असावी.
नित्यनवीन ऊर्जा देणारा हा आश्विन सरता सरता निरोप घेतानाही आपल्या जीवनात दिवेलागण करून जातो.
पुढील वर्षी येण्याचे वचन देऊन काळाच्या प्रवाहात गुप्त होताना अमावास्येलाही प्रकाशाच्या साठवणीची आठवण देतो.
तेजस्वी उन्हाने वसुंधरेच्या हिरव्या वस्त्रांना वेगळी आगळी झळाळी देणारा, समृद्धीच्या - वाटेवर जगन्मातेची उपासना करायला सांगणारा, अंधार दूर करून तेजाची आरती शिकवणारा, प्रकाशाचे वेड घेऊन जगणाऱ्यांच्या जीवनात आपोआप समृद्धी येते, असा संदेश देणारा आश्विन बारा महिन्यात वेगळा उठून दिसतो.
सम्राट आश्विन होऊन मनात रेंगाळत राहातो.