वाढदिवस

वाढदिवस कसा साजरा करावा?

1 उत्तर
1 answers

वाढदिवस कसा साजरा करावा?

7
वाढदिवस कसा साजरा करावा
आपल्याकडे वाढदिवस म्हणजे अभीष्टचिंतन करण्याचा म्हणजेच शुभचिंतन करण्याचा दिवस असतो त्यामुळे अर्थातच मेणबत्तीच्या ज्योती विझवून नव्हे तर निरांजनाच्या ज्योती उजळवून आणि औक्षण करून साजरा करण्यात यावा. ज्याचा वाढदिवस आहे त्याला आणि घरातील सर्व सभासदांना कोणते मिष्टान्न आवडते ते करावे आणि सर्वांनी एकत्र बसून आनंद घ्यावा.

वाढदिवस कसा साजरा करावा

वाढदिवस कसा करावा
थोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा. तरी शाकंभरी देवी नवरात्राच्या काळात सर्व सेवेकर्यानी जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करून आपले जीवन सुखकर व शांतिमय करावे.

हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा. (इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात, म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा.वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्यांचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे (हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे). त्या व्यक्तीला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.
अभ्यंग: सुवासिक तेल लावून.
सचैल: ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान ावी. (स्वतः वापरू नये.), त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. औक्षण करून ओवाळावे नंतरदोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.) म्हणून त्या-त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवे दाखवावा आणि विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर.ङ्घ उपस्थितांना गोडधोड खायला ावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.

टीप:

आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे.केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.
उत्तर लिहिले · 29/7/2022
कर्म · 48425

Related Questions

सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
भिमराव आंबेडकरांचा जन्मदिवस केव्हा असतो ?
मला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत, ते कसे करावे?
वाढदिवसाचे बॅनर बनवण्यासाठी कोणती ॲप चांगली आहे?
वाढदिवस कसा करावा ?? सामाजिक कार्यातून ??
वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्ती वर फुंकर का मारू नये?
आज माझा वाढदिवस?मला काल मी स्वप्नात मेलो होतो असे दिसले?माझे कौटुंबिक मित्र-परिवार माझ्या अंतयात्रेला आले होते?मी जाणू शकतो का?या मला पडलेल्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल?