आंबा

आंब्याच्या झाडाच्या खोडावर१ ईंचाचे दोन छिद्र दिसून झाड वाळले आहे त्याचे कारण काय असेल?

1 उत्तर
1 answers

आंब्याच्या झाडाच्या खोडावर१ ईंचाचे दोन छिद्र दिसून झाड वाळले आहे त्याचे कारण काय असेल?

0


 

आंब्यावरील किडी : 

१) तुडतुडे : ही कीड आंब्यावरील सर्वात हानीकारक असून प्रथम आंब्याची कोवळी पालवी, मोहोर आणि लहान फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर आणि लहान फळांची गळ होते. तसेच तुडतुड्यांनी शरीराबाहेर टाकलेल्या चिकट द्रवामुळे मोहोरावर आणि पानांवर काळ्या रंगाची बुरशी वाढते. त्यामुळे आंब्याची पाने काळी पडतात आणि पानांतील कर्बग्रहणाची (प्रकाशसंश्लेषण) क्रिया मंदावते. 

शेंडे पोहरणारी अळी : ही कीड प्रामुख्याने लहान रोपांना आणि नवीन लागवड केलेल्या कलमांना अपाय करणारी आहे. ह्या अळ्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यात नवीन व कोवळी फूट पोखरतात. त्यामुळे शेंडे वाळून जातात. तसेच मोहोर निघाल्यावर मोहोराचा दांडा पोखरतात, त्यामुळे मोहोराची गळ होते. या किडीचे नियंत्रणासाठी कीड ग्रस्त काड्या कापून त्याचा अळीसह नाश करावा. 

३) फळमाशी : आंब्याच्या फळांच्या सालीत ही फळमाशी अंडी घालते. अंड्यातून २ - ३ दिवसांत अळ्या बाहेर येतात आणि त्या फळांचा गर खातात. फळमाशी सालींच्या आतील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे तीचे नियंत्रण करणे अवघड जाते. झाडावरील किडग्रस्त फळे आणि झाडाखाली पडलेली फळे एकत्र गोळा करून अळीसह त्याच नाश करावा. 

४) वाळवी : ही कीड झाडाची मुळे, फांद्या आणि खोडावरील सालीवर आपली उपजीविका करते. मुळावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पुर्ण झाड वाळून जाते झाडाकडे दुर्लक्ष झाल्यास खोडावर मातीचा पापुद्रा तयार. होऊन त्याखाली वाळवी राहून झाडाची साल खाते. कालांतराने वाळवीच्या प्रादुर्भावाने पुर्ण खोड पोखरले जाऊन त्याची ढोली तयार होते. वाळवीचा प्रादुर्भाव लहान रोपांपासून मोठ्या झाडांपर्यंत होतो. 

५) मिजमाशी :काळसर रंगाची लहान माशी मोहोराच्या दांड्यावर तसेच पालवीच्या दांड्यावर अंडी घालते. अंड्यातून १ - २ दिवसांत अळी बाहेर येते. मोहोराच्या आणि पालवीच्या आतील पेशी खाते. त्याठिकाणी गाठी होऊन त्या गाठी नंतर काळ्या पडतात. त्यामुळे मोहोर आणि पालवी वाळते. ६) पिठ्या ढेकूण :या किडीची छोटी पिल्ले तसेच पूर्ण वाढ झालेले ढेकूण मोहोरावर तसेच फळावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पुर्ण फळ कापूस लावल्याप्रमाणे पांढरे दिसते. या किडीचा प्रादुर्भाव एप्रिल - मे महिन्यामध्ये तापमान वाढावयास लागल्यावर मोठ्या प्रमाणात आढळतो. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी किडीची पिल्ले व ढेकूण झाडावर चढू नयेत म्हणून खोडावर जमिनीपासून १ फूट अंतरावर चिखलाने खोडाच्या भेगा बुजवून घ्याव्यात आणि त्यावर ४०० गेजच्या प्लॅस्टिकची १ फूट पट्टी बुंध्याभोवती व्यवस्थित गुंडाळावी. 

७) भिरूड : आंब्यावरील जास्त नुकसानकारी कीड म्हणून ओळखतात. कारण हीची अळी प्रथम झाडाची साल व नंतर खोड पोखरून आत जाते व तेथील गाभा खाते. भिरूड लागलेल्या फांद्या वाळतात. झाड कमजोर बनते. अळीने पडलेल्या छिद्रातून भुसा व विष्टा बाहेर येते. लवकर नियंत्रण केले नाही तर संपूर्ण झाड वाळते. 

उपाय : १) या किडीच्या नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी भुसा बाहेर पडला आहे त्यावरून छिद्र शोधून टोकदार तारेने छिद्रातील जिवंत आळ्या माराव्यात. छिद्रामध्ये नुवा किंवा कार्बन डायसल्फाईडच्या द्रावणात कापसाचा बोळा भिजवून तारेच्या सहाय्याने घालावा आणि बाहेरून छिद्र शेण किंवा चिखलाने लिंपावे. प्रतिबंधक उपाय म्हणून ५०० ग्रॅम गेरू, ५०० ग्रॅम मोरचूद, ५०० ग्रॅम चूना आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंटची १० लि. पाण्यातून खोडावर पेस्ट लावावी. 

रोग: 

१) भुरी : हा बुरशीजन्य रोग असून आंब्यास मोहोर येण्याच्या वेळी ढगाळ आणि दमट हवामान असल्यास या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. हा रोग वाऱ्यामुळे प्रसारित होतो. सुरुवातीला त्याची (बुरशीची) सुक्ष्मजाळी मोहोराचा संपूर्ण देठ, फुले आणि फळे यावर तयार होते. नंतर ती पांढऱ्या बुरशीसारखी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोहोर आणि लहान फालंची गळ होते. 

उपाय : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली आणि हार्मोनी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी करावी. 

२) करपा : या रोगामुळे पानाच्या बाजूच्या कडा करपल्यासारख्या दिसून पानांवर तशाच प्रकारचे डाग पडतात. तसेच फळांवर काळे डाग पडून त्यांची वाढ मंदावते. याचे नियंत्रणासाठी रोगट फांद्या कापून तसेच गळलेली फळे गोळा करून त्यांचा नाश करावा आणि बाग स्वच्छ ठेवावी. 

३) फांद्या वाळणे (पिंक रोग) : सुरुवातीला पांढऱ्या रंगाचे गोलसर ठिपके फांद्यावर दिसतात. त्याची वर्तुळाकार वाढ होऊन एकात एक मिसळून मोठा डाग तयार होतो. ह्या डागांचे प्रमाण वाढल्याने फांदी वाळते. अनेक फांद्या वाळल्याने झाडाची अन्न तयार करणाची क्षमता मंदावते. त्यामुळे फलधारणा कमी होते. याचे नियंत्रणासाठी बुरशीची प्रथम अवस्थेत लागण झालेली दिसताच तो भाग खरडून काढावा. तसेच झाडाच्या व कलमांच्या वाळलेल्या फांद्या कापून काढाव्यात आणि खरवडलेल्या व कापलेल्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी. 

४) बांडगुळ : आंब्याच्या फांदीवर वाढणारी ही परोपजीवी वनस्पती आंब्याच्या फांदीतून रस शोषून घेते. बांडगुळाचे बी पावसाळ्यात झाडाच्या फांदीवर रुजते. त्याची मुळे सालीतून सरळ आत जातात आणि आतील गाभ्यावर वेष्टन तयार करतात. अशा ठिकाणी फांदीवर गाठ दिसते. झाडाने तयार केलेले अन्न बांडगुळे स्वत:साठी वापरतात. त्यामुळे आंब्याच्या फांद्या, झाडे अशक्त होतात आणि फलेही कमी लागतात. बांडगुळ झाडावर दिसताच ती संपूर्ण काढावीत. बांडगुळे मोठी झाली असल्यास पुर्ण फांदी कापून काढावी. कापलेल्या ठिकाणी बोडोपेस्ट किंवा डांबर लावावे. 


उत्तर लिहिले · 21/6/2022
कर्म · 48555

Related Questions

जर 40 आंब्यांची खरेदी किंमत ही 25 आंब्यांच्या विक्री किमती एवढी असेल तर या व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला?
कथापूर्ती कशी कराल? शाळेत जाणार कष्टाळू - प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी - मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्यांची खरेदी - एक दगळलेला - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामध्ये - बाकीचे आंबे खराब. तात्पर्य?
द्राक्षाचा :घड तारकांचा :पुंज आंब्याची : ?
पाडाचा आंबा म्हणजे काय?
एका टोपलीत २५ आंबे होते, ते आंबे २५ मुलांना प्रत्येकी एक याप्रमाणे वाटले, तरी पण एक आंबा त्या टोपलीत राहिला, तो कसा?
1324 आंब्याची झाडे 600 संत्री ची झाडे या माहितीच्या आधारे शाबधिक उदाहरण तयार करून उभी मांडणी करा?
समीर आंबा खातो प्रयोग ओळखा?