आंबा
पाडाचा आंबा म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
पाडाचा आंबा म्हणजे काय?
1
Answer link
पाडाचा आंबा म्हणजे पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.
: या वर्षी पाड लवकर लागला
आंबा पिकतो;पण...
सध्या दिवस आंब्याचे आहेत, असं म्हणण्याची आता गरज नाही; कारण आता आंबा अगदी जानेवारी महिन्यामध्येसुद्धा मिळतो. पण असा ठरलेल्या वेळेपेक्षाही कितीतरी अगोदरच बाजारात आलेला आंबा विकत घेणं ही आता काहीशी प्रतिष्ठेचीही गोष्ट बनली आहे.
सध्या दिवस आंब्याचे आहेत, असं म्हणण्याची आता गरज नाही; कारण आता आंबा अगदी जानेवारी महिन्यामध्येसुद्धा मिळतो. पण असा ठरलेल्या वेळेपेक्षाही कितीतरी अगोदरच बाजारात आलेला आंबा विकत घेणं ही आता काहीशी प्रतिष्ठेचीही गोष्ट बनली आहे. आणि एकदा का एखाद्या गोष्टीला प्रतिष्ठा प्राप्त झाली की तिच्याबाबत सारासार विचार करण्याची आवश्यकताच सामान्य माणसाला वाटेनाशी होते. आंब्याच्या बाबतीतही तसंच झालं आहे का, असा प्रश्न पडतो.
खरंतर महाशिवरात्रीच्या वेळेस आंब्याच्या झाडांना मोहोर येतो. तो काळ साधारणपणे फेब्रुवारी महिन्याचा अखरेचा आठवडा ते मार्च महिन्याचा पहिला आठवडा असा आहे. मोहोर आल्यानंतर कैरी धरते. त्यानंतर साधारणपणे तीन महिन्यांनी खाण्यालायक आंबा तयार होतो, असं अनुभवसिद्ध गणित आहे. आंबे असे तयार होत असल्याची खूण म्हणजे झाडावरच्या काही आंब्यांचा रंग बदलू लागतो. याचा अर्थ आंब्याला पाड लागला आहे. असे पाडाला लागलेले आंबे उतरवायचे. पेंढ्याच्या आढीत घालायचे. आढीत घातल्यानंतर चारआठ दिवसांनी आंबे खायला तयार होत. पण हा लांबलचक काळ बाजारपेठेसाठी 'त्रासदायक' ठरू लागला. मग आंबा झटपट पिकवण्यासाठी रसायनांचा म्हणजे मुख्यत: कॅल्शियम कार्बाइडचा वापर होऊ लागला. काही आठवड्यांपूवीर् हेच रसायन वापरून पिकविण्यात आलेले ४७८ डझन आंबे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ताब्यात घेतले. कॅल्श्यिम कार्बाईड हे रसायन घातक असल्यानं त्याचा वापर करून पिकविण्यात आलेली फळंही घातक ठरू शकतात, असं सांगण्यात आलं. २००५ सालामध्ये तिरूनेल्वेलीमध्ये साडेआठ टन फळं स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नष्ट केले होती. कॅल्शियम कारबाईडच्या खड्यांचा वापर करून ही फळं पिकविण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
'