बाजारहाट अर्थशास्त्र

भांडवल बाजारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो?

2 उत्तरे
2 answers

भांडवल बाजारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो?

0
भांडवल बाजाराचे घटक
भांडवलाची देवघेव करणाऱ्या ज्या संस्था भांडवल बाजारात असतात, त्यांत प्रामुख्याने बँका, पतपेढया, व्यापारी पेढया, विमा कंपन्या, शेअर बाजार, युनिट ट्रस्ट, गुंतवणूक न्यास इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या जोडीला इतरही अनेक भांडवली देवघेव करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था असतात. भारतात भांडवली देवघेव करण्याचे काम

१) भारतीय उद्योगवित्त निगम,
२) विविध राज्य वित्त निगम,
३) राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम,
४) भारतीय औद्योगिक कर्ज व विनियोग निगम,
५) भारतीय आयुर्विमा निगम,
६) भारतीय औद्योगिक विकास बँक,
७) भारतीय युनिट ट्रस्ट,
८) व्यापारी बँका व पतपेढया,
९) राष्ट्रीय लघुउद्योग निगम,
१०) औद्योगिक पुनर्वित निगम व
११) शेअरबाजार

या वित्तसंस्थांमार्फत पार पाडण्यात येते. देशातील उद्योगधंद्यांना भांडवल पुरविणाऱ्या ह्या संस्थांशिवाय खाजगी रीत्या (कंपन्या आणि सावकार) ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तिगत ठेवी याही भांडवलाची बरीच गरज भागवीत असतात.

देशाच्या आर्थिक विकासचक्रात भांडवली देवघेव करणाऱ्या संस्था महत्वपूर्ण कामे पार पाडीत असतात. त्यांपैकी

१) शिल्लक वाढण्यासाठी उत्तेजन देणे व ह्या शिलकीची योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि

(२) भांडवलाची मागणी करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येणाऱ्या गरजू उद्योजकांमध्ये ह्या भांडवलाचे परिणामकारी वाटप करणे, ही मुख्य कामे मानली जातात.

देशातील शिलकीचा उगम त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नातून होत असला, तरी भांडवल गुंतविण्यासाठी काही प्रलोभने व हमी उपलब्ध असल्यास त्यांचा उपयोग ठराविक राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभागांतील लोकांमध्ये शिल्लक टाकण्याची प्रवृत्ती व प्रमाण वाढविण्यासाठी खात्रीने होत असतो. भांडवल गुंतविण्यासाठी प्रलोभने व हमी देण्याचे काम भांडवल बाजार पार पाडीत असतो. या बाजारात भांडवल गुंतविण्यासाठी निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात. या बाजारामुळे भांडवल खेळते राहून भांडवलास हमखास गिऱ्हाईकही लाभते. जुने व नवे कर्जरोखे, बचतरोखे, अधिकोष देयके, कमी किंवा दीर्घ मुदतीची सरकारी बंधपत्रे यांच्या रूपाने भांडवल गुंतविण्याचे अनेक मार्ग या बाजारात उपलब्ध असतात.

कर्जाची मुदत, रकमेवर सुटणारे व्याज, रक्कम परत मिळण्याची हमी, कर्ज मागण्याची व कर्ज परतीची वेळ आदी अनेक कसोट्या लावून भांडवल गुंतविणारी व्यक्ती अगर संस्था भांडवल गुंतविण्यासंबंधीचा निर्णय घेते. या सर्व कारणांमुळेच भांडवल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे खेळत राहते. बाजारात भांडवल गुंतविण्यासंबंधी वरील प्रकारची जी प्रलोभने असतात, त्यांमुळे व्यक्ती आणि संस्था यांना शिल्लक टाकण्यात प्रोत्साहन मिळते व त्या वाढत्या शिलकीतून उद्योगपती आणि व्यावसायिक यांच्या भांडवलविषयक गरजा भागविल्या जातात.

बाजाराकरवी एकत्र होणाऱ्या धनाचे यशस्वी वाटप करण्याची बाजाराची कार्यक्षमता, हे भांडवल बाजाराचे आणखी एक वैशिष्टय असते. देशाच्या विकासाच्या दृष्टीने या कार्यवैशिष्टयाचे फारच महत्त्व असते. बाजारात एकत्र होणाऱ्या धनाचे सुयोग्य पद्धतीने वाटप करण्याची कसोटी, म्हणजे धनावर मिळणारा फायदा हीच असून या फायद्याचे प्रमाण जसजसे कमीजास्त असेल, त्यानुसार भांडवल गुंतवणुकीचे प्रमाणही कमीजास्त होत राहते. कारण भांडवलापासून मिळणाऱ्या फायद्यानुसारच भांडवल गुंतवणुकीमधील जोखामीचा काटा मागेपुढे सरकत राहतो. कालांतराने फायद्याच्या या प्रमाणामुळेच सामाजातील इकडे न वळलेल्या इतरही धनाचा ओघ उद्योगधंद्यांकडे खेचला जातो.


उत्तर लिहिले · 28/5/2022
कर्म · 51830
0
भांडवल बाजारामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:
  • रोखे बाजार (Stock Market): येथे शेअर्स, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीजची खरेदी-विक्री होते.

    SEBI (Securities and Exchange Board of India) द्वारे हे नियंत्रित केले जाते.

  • कर्जरोखे बाजार (Bond Market): येथे सरकार आणि कंपन्या कर्जरोखे जारी करून भांडवल उभारतात.
  • वित्तीय संस्था (Financial Institutions): बँका, विमा कंपन्या आणि म्युचुअल फंड्स यांसारख्या संस्था भांडवल बाजारात गुंतवणूक करतात.
  • मर्चंट बँकर्स (Merchant Bankers): हे कंपन्यांना शेअर्स जारी करण्यात आणि इतर वित्तीय सेवा पुरवतात.
  • गुंतवणूकदार (Investors): वैयक्तिक गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदार (Institutional Investors) बाजारात सक्रियपणे सहभागी असतात.

हे सर्व घटक एकत्रितपणे भांडवल बाजाराला चालना देतात आणि अर्थव्यवस्थेच्या विकासात मदत करतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 180

Related Questions

मला 2.5 लाख रूपयांची गरज आहे. मला वाटतं भिशी लावावी, पण भिशी विषयी मला काही माहिती नाही.
इंग्लंडचे नवीन कर धोरण काय आहे, वर्ष २०२५-२६ साठी?
अर्थशास्त्र आणि वाणिज्यशास्त्र यांच्या संबंधाचे विवेचन करा?
अर्थशास्त्र आणि वाणिज्य शास्त्रांमधील फरक सांगा?
व्यवस्थापकीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातील निर्णय घेण्याच्या प्रनियेतील विवीध टप्पे सविस्तर स्पष्ट करा?
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा?
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती?