पुस्तके

पुस्तकांचे विविध रूपे कोणती आहे?

1 उत्तर
1 answers

पुस्तकांचे विविध रूपे कोणती आहे?

0

 
पुस्तकाची विविध रुपे
पुस्तक हे लिखित, छापलेल्या व कोऱ्या कागदापासून व चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्रित संकलन असते. त्याच्या एका बाजूस बिजायगत सांधा असतो. पुस्तकाच्या एका तावास वा कागदास पान म्हणतात. तर त्या पानाच्या पुढच्या बाजूस मुखपृष्ठ असे म्हणतात. इलेक्टॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात. EGYPT मध्ये ALEXANDRIA येथे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे.

साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांपासून वेगळे करण्यासाठी 'मोनोग्राफ' म्हणण्यात येते.पुस्तकांसह सर्व लिखित स्वरूपात असलेल्या कामांना साहित्य म्हणतात. मोठ्या कादंबऱ्यांमध्ये पुस्तकाचे अनेक भाग पाडण्यात येतात. (त्यांना प्रकरण - १, प्रकरण - २, प्रकरण-३ अशी, भाग-१, भाग-२, भाग-३ अशी किंवा खंड १, २, ३ अशी नावे देण्यात येतात.) पुस्तकांवर अतिप्रेम करणाऱ्यास पुस्तकी किडा असे म्हणतात.

जेथे पुस्तके विकत मिळतात त्या जागेला पुस्तकाचे दुकान म्हणतात. पुस्तके ग्रंथालयातूनही तात्पुरती मिळविता येतात, आणि वाचता येतात. पुस्तक वाचल्याने ज्ञान प्राप्त होते व माणसांचे राहणीमान सुधारते.

पुस्तक हा मानवाला शिकावान्रा गुरु आहे. याला कशाचीही मर्यादा नाही. आपण कोणत्याही ठिकाणी बस्डून ज्ञान शकतो.
उत्तर लिहिले · 18/5/2022
कर्म · 48555

Related Questions

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम पुस्तके?
गरोदर स्त्रीने कोणते पुस्तके वाचावे?
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे अभ्यासक्रम व पुस्तके सारखेच असतात का?
पाठ्यपुस्तकाच्या वापराबाबतची तुमचे विचार कसे स्पष्ट कराल? माहितीच्या विविध स्रोतांची गरज विशद करून आपल्या विषयाला अनुसरून विस्तृत यांची माहिती कशी संकलित कराल?
पाठ्यपुस्तकाच्या वापराबाबतची तुमचे विचार स्वानुभवातून कसे स्पष्ट कराल?
पुस्तके कागदपत्रांमधून टिपणे लिहण्याचे तंत्र विशद करा.?
मुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी?