पर्यटन
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो का?
2 उत्तरे
2
answers
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो का?
2
Answer link
पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतुक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस हातभार लागतो. पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती असणारी व्यक्ती पर्यटकांना तेथील सविस्तर माहिती सांगतात. त्या मोबदल्यात ते तेथील लोकांना पैसे देतात. हा एक प्रकारचा त्यांचा रोजगार आहे. तसेच स्थानिक लोक आपल्या घरी पर्यटकांना पेइंगेस्ट म्हणून काही दिवसांसाठी ठेवतात आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय करतात. त्याचा मोबदला त्यांना पैश्याच्या स्वरूपात मिळतो. म्हणून पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.