उपयोजन

उपयोजित समीक्षेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?

1 उत्तर
1 answers

उपयोजित समीक्षेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?

1
 उपयोजित समीक्षेचे स्वरूप

विशिष्ट वाङ्मयीन मूल्ये व विशिष्ट जीवनमूल्ये यांच्या कळत-नकळत स्वीकारलेल्या चौकटीतून साहित्यकृतीची तर्कसंगतपणे केलेली आकलने किंवा मूल्यामापन हा उपयोजित समीक्षेचा मुख्य प्रकार आहे. लेखक, त्याची साहित्यकृती आणि वाचक या तीन घटकांचा स्थल-काल-परस्थितीचा जो अवकाश बेहून असतो. त्यातील वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व, वर्गीय जाणिवा याची नोंद घेतली जाते. साहित्यकृतीचा विचार बाह्यतांत्रिक रचना, आशयाचा सामाजिक-नैतिक, तौलनिक व मूल्यमापनात्मक विवेकाचे दर्शन, सांस्कृतिक ध्येये, उद्दिष्टे यांचा संदर्भ येतो. तसेच आस्वादक, वाचक व त्याचा आस्वाद प्रत्यय यांच्या पकडीतून बाहेर पडून समग्र बाबक व त्याचा भावनिक, बौद्धिक प्रक्रियांनी व्यक्त होणारा वाचनप्रत्यय याकडे उपयोजित समीक्षा अधिक कल देते. त्यामुळे वाङ्मयीन, सांस्कृतिक परंपरा व परिस्थिती यासंबंधीचे समीक्षीय भान या उपयोजित समीक्षेतून दिसून येते.

उपयोजित समीक्षेमध्ये संशोधन, आकलन, आस्वाद व मूल्यमापन या गोष्टींना महत्त्व असते. या



व्यापक चौकटीतून विशिष्ट साहित्यिक, त्यांची साहित्यकृती किंवा विशिष्ट साहित्यप्रकारांचा अभ्यास होत असतो किंवा एकाच साहित्यकृतीसंबंधी अनेक समीक्षक आपापल्या परीने आपली मांडणी करत असतात. उदा. अवकाळी पावसाच्या निमित्ताने (संपा. सतीश कामत) या संपादनामध्ये आनंद विंगकर यांनी लिहिलेल्या 'अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट' या कादंबरीची अनेकांगानी समीक्षा करण्यात आलेली दिसते. तसेच एकाच साहित्यकाच्या विविध लेखनाचीदेखील समीक्षा केली जाते. उदा. 'बाहुपेडी विंदा' (संपा. विजया राज्याध्यक्ष) या संपादनातून विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्याचे आणि त्यांनी लिहिलेल्या समीक्षेची समीक्षा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या साहित्यकांच्या साहित्याची तुलनादेखील या समीक्षेत केली जाते. याशिवाय पुस्तकपरीक्षण हा उपयोजित समीक्षेचा एक मोठा भाग आहे. वेगवेगळ्या मासिकातून, नियतकालिकातून विशेषांकातून पुस्तकपरीक्षणे लिहिली जातात. शिवाय काही वर्तमानपत्रातूनदेखील अशी परीक्षणे पहायला मिळतात.
उत्तर लिहिले · 16/4/2022
कर्म · 121725

Related Questions

ycmou अभ्यासक्रमातील आशा मुंडले यांचा निबंधातील/ लेखातील दिसणारी स्त्री याविषयी सविस्तर विवेचन कसे कराल?
जुबेदाने मैडमसाठी काय पटले होते?
आपल्या गावची संस्कृती निबंध कसा लिहावा?
खेडे कुठे विसावते?
Oppo मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग कसे चालू करायचे?
भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेल्या भारतीय जवानांची माहिती मिळवा व त्यावर उपक्रम लिहुन दाखवा?