व्यवसाय मार्गदर्शन
Affiliate Marketing म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
Affiliate Marketing म्हणजे काय?
4
Answer link
एफिलिएट मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती
Affiliate Marketing हा एखाद्या कंपनी च्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईट च्या माध्यमातून प्रमोट करून त्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस च्या विक्री वर कमिशन मिळवण्याचा प्रकार आहे. या मार्केटिंग मध्ये तुम्ही प्रमोट केलेल्या वस्तूं पैकी किती वस्तू विकल्या जातात यावर तुमच्या कमिशन ची रक्कम अवलंबून असते.
जर तुम्ही प्रमोट केलेल्या प्रॉडक्ट पैकी जास्त प्रॉडक्ट्स तुमच्या व्हिसिटर्स ने खरेदी केल्या तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतील. आजकाल मोबाईल वापरणे अगदी सोपे झाले आहे म्हणून मोठ्या प्रमाणात मोबाईल चा वापर होत आहे, आणि या मोबाईल मधून अधिक प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
म्हणून खूप लोक अफिलिएट मार्केटिंग करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. जर तुम्हाला सुद्धा एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवायचे असतील तर अफिलिएट मार्केटिंग काय आहे? आणि अफिलिएट मार्केटिंग कशी केली जाते हे सर्व माहिती मराठी मधून शिकण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
Affiliate Marketing म्हणजे काय? | What is Affiliate Marketing in Marathi
अफिलिएट मार्केटिंग हि एक मार्केटिंग करण्याची अशी पद्धती आहे ज्यामध्ये ब्लॉग किंवा वेबसाईट च्या साहाय्याने एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला प्रमोट केले जाते म्हणजेच ब्लॉग किंवा वेबसाईट वर जाहिरात केली जाते.
आणि या जाहिरात करण्याच्या बदल्यात ज्या कंपनी चे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची जाहिरात केली आहे ती कंपनी वेबसाईट मालकाला काही प्रमाणात कमिशन प्रदान करते. हे कमिशन प्रॉडक्ट नुसार ठरविल्या जाते, अश्या प्रकारे जी मार्केटिंग केली जाते तिला अफिलिएट मार्केटिंग असे म्हटल्या जात.
या मध्ये ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी वेबसाईट जास्तीत जास्त प्रमाणात सूट म्हणजे च डिस्काउंट देतात त्यामुळे लोक ऑनलाईन शॉपिंग वर जास्त भर देत आहेत. त्याप्रमाणेच ऑनलाईन विक्री वाढण्यासाठी मोठं मोठ्या वेबसाईट एफिलिएट प्रोग्राम जॉईन करण्यासाठी विविध प्रकारचे ऑफर देतात.
टॉप अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम ज्या मधून तुम्ही सुद्धा अफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवू शकता.
- Amazon Associates
- CJ Affiliate
- Flipkart Affiliate
- ShareASale
- Clickbank
- Affiliaxe
- eBay Partner Network
- vCommission
- BigRock Affiliate
या सर्व अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम चालवणाऱ्या वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही फ्री मध्ये अफिलिएट प्रोग्राम जॉईन करून मोठ्या प्रमाणात कमिशन मिळवू शकता.
जर अफिलिएट मार्केटिंग बद्दल आणखी माहिती हवी असेल तर वरील प्रमाणे दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अफिलिएट मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती पहा.