उद्योजकता
मला उद्योग करायचा आहे समोसा, कचोरी, पाववडा , सँडविच, पाणीपुरी शिकायची आहे कसे शिकावे?
1 उत्तर
1
answers
मला उद्योग करायचा आहे समोसा, कचोरी, पाववडा , सँडविच, पाणीपुरी शिकायची आहे कसे शिकावे?
2
Answer link
तुम्हाला उद्योग करायचा आहे समोसा, कचोरी ,पाववडा,सॅडविच, पाणीपुरी शिकायची आहे तर तुम्हाला जेवण बनवण्यात रस आवड असेल तर आपल्या कडे असे उद्योग करणारे आहेत त्यांच्या कडे जावून शिकू शकता पाणी पुरी वाल्याकडे जाऊन तो पाणीपुरी साठी पुरीच पाणी कसं तयार करतो ते बघा आंबटगोड पाणी तिखट पाणी भाजी कशा प्रकारे बनवली जाते हे शिकून घ्या वडापाव कसा बनवायचास हे हि समोसा कसा बनवला जातो मेण म्हणजे बटाटे कसे उखडले जातात बेसन कसं भिजवल जात आणि सुखी चटणी ओली चटणी कशी बनवली जाते याचटण्यावर तुमच्या वडापावाची चव कळते. हो शिकण्यासाठी आपल्या ला सर्व युट्यूबवर सर्च करून रेशीपीज शिकता येतील.
किंवा जर तुम्हाला शिकायचेच आहे तर तुम्ही पहिलं घरच्या घरी प्रयत्न करून बघा जे पहिले पदार्थ बनवणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करत आपल्या घरच्यांना खाऊ घाला त्यांच्या कडून शाबासकीची थाप मिळाली कि तुम्ही स्वतः उद्योग करू शकता.
तुम्हाला जर हा उद्योग करायचा असेल तर पहिलं सर्व पदार्थांसाठी लागणाऱ्या चटण्या या व्यवस्थित जमल्या कि बाकिचे पदार्थ बरोबर जमतील हे सर्व करण्यासाठी तुम्हाला शिकावे लागेल तुम्ही स्वतः युट्यूबवर बघून शिकू शकता किंवा एखाद्या शेफ कडून किंवा जे धंदेवाल्यांकडे जाऊन शिकावं लागेल नाही तर कुकिंग क्लास करावा लागेल यापैकी काही करण्या पेक्षा तुम्हाला सांगितल्या प्रमाणे जेवण बनवण्याची आवड असेल येत असेल तर उत्तम तुम्ही स्वतः घरच्या घरी शिकू शकता.