डोळे

आपले डोळे हे एक मिनिटामध्ये किती वेळा चालू बंद होतात?

1 उत्तर
1 answers

आपले डोळे हे एक मिनिटामध्ये किती वेळा चालू बंद होतात?

1



डोळे एका मिनिटात 17 वेळा, एका दिवसात 14,280 वेळा आणि एका वर्षात 52 लाख वेळा उघड झाक करतात. डोळे बंद चालू करण्याचा वेग हा १०० ते १५० मिलिसेकंद आहे. डोळे मिचकाण्याचे दोन कारणे आहेतः डोळ्यांत आर्द्रता राखण्यासाठी आणि बाहेरील कणांपासून डोळे सुरक्षित राहण्यासाठी.

निळे डोळे असणारे लोक ज्यास्त सूर्य प्रकाश सहन नाही करू शकत. तुम्हाला हे माहित आहे का, १० हजार वर्षांपूर्वी निळे डोळे असणारा एकही माणूस अस्तित्वात नव्हता. म्हणजे आज ज्या लोकांचे डोळे निळे आहेत त्यांचे पूर्वज हे १० हजार वर्षांपूर्वी चे आहेत. ज्यावेळेस आपण रडतो तेव्हा आपल्या नाकातून पाणी येते कारण आपले अश्रू हे नाकावाटे निघत असतात.

आपण एखाद्याशी बोलतो तेव्हा, पापण्या अधिक उघडझाप करतात, परंतु जेव्हा आपण एखाद्या संगणकाच्या पडद्यावर किंवा कागदावर काही वाचत असतो, तेव्हा पापण्या कमी उघडझाप करतात, म्हणून आपल्याला अधिक थकल्यासारखे वाटते. अंधारात आणि प्रकाशाच्यानुसार आपले डोळे स्वतःला जुळवून घेतात ते पाहण्यासाठी एक प्रयोग करा: बल्ब बंद करा आणि आपल्या स्नानगृहकडे जा आणि काही आरश्या समोर उभे रहा आणि बल्ब चालू करा. आपल्या डोळ्यांचे बुबळे कसे काम करतात ते बघू शकता.

तुम्हाला हे माहित आहे का, जन्मलेलं बाळ हे ४ ते १३ आठवड्या पर्यंत रडण्याचा आवाज येतो पण त्यांच्या डोळ्या मधून अश्रू येत नाहीत. ५ महिन्यानंतर आपल्या पापण्या नवीन येतात पण आपल्या डोक्याचे केस येण्यासाठी २ ते ३ वर्ष लागतात. करेलिया नावाचा सरडा हा एकाच वेळी वेग वेगळ्या दिशेने पाहू शकतो. कुत्र्यांना लाल आणि हिरव्या रंगाचा फरक काळात नाही. जेव्हा आपण आश्चर्याने काहीतरी पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बुबळांचा आकार मोटा होतो.

बहुतेक वेळा फोटोमध्ये आपले डोळे लाल असतात कारण फ्लॅश केल्यावर रेटिना नावाच्या रक्त वाहिन्या त्याला रिफ्लेक्ट करतात. कुत्री आणि इतर प्राण्याचे डोळे फोटो मध्ये हिरवे दिसतात कारण रेटिना पेशी वर ज्यास्त आवरण असते. फोटो मध्ये डोळे लाल होऊ नये म्हणून कॅमेरा समोर लाईट समोर लावू नका.

डोळ्यावरच्या भुवयांचा उपयोग काय आहे? त्यांचं काम असं आहे कि, डोळ्यामध्ये घाम येऊ नये म्हणून मदत करतात. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी.

मानवी डोळे किती अंतरा पर्यंत बघू शकतात? जर सपाट मैदाना वर पूर्णपणे अंधार असेल तर मेणबत्ती ज्योत 48 कि.मी. अंतरा पासून बघू शकतो. डोळ्यांची दृष्टी अंतरावर अवलंबून नाही, ती तर एखाद्या वस्तूवर किती प्रकाश आणि फोटॉन चे कण निर्माण होतात त्यावर अवलंबून आहे. तेव्हा आपला मेंदू ला समजते कि आपण काहीतरी बघत आहोत.

प्रार्थना दरम्यान डोळे बंद करणे गरजेचे आहे? नाही, प्रत्येकासाठी हे आवश्यक नाही. डोळे बंद केल्यामुले आपल्याला देवावर लक्ष केंद्रित करण्यास उपयोग होतो.


उत्तर लिहिले · 9/1/2022
कर्म · 121725

Related Questions

माणसाचे डोळे किती megapixel असतात?
डोळे येणे म्हणजे काय?
हसण्यासारखे डोळे असणारी म्हणजे काय?
हरणासारखे डोळे असलेली म्हणजे कोण?
हरणासारखे डोळे असलेल्याला काय म्हणतात?
दिवसभर laptop किंवा computer वर काम करुन संध्याकाळी घरी गेल्यावर डोळे दुखायला लागतात डोळ्यातून पाणी येते, काय करावे?
मला काल रात्री स्वप्न पडले की मी शेतातुन जात आहे आणि शेतात एक अजगर एवढा साप आहे त्याच्या बाजुने मी जाण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या पुढे एक काळा बैल येतो मोठे शिंग वाला आणि तो माझ्यावर शिंगाने अटॅक करत आहे पण त्याने मला काहीही ईजा होत नाही मी फक्त खाली बसुन आहे आणि इतक्यात माझे डोळे उघडतात?