पाऊस आवाज

पावसाळ्यात छतावरील पत्र्यांचा खूप आवाज येतो. जसा पाऊस वाढेल तसा आवाज वाढतो. यावर काही पर्याय करू शकतो का?

1 उत्तर
1 answers

पावसाळ्यात छतावरील पत्र्यांचा खूप आवाज येतो. जसा पाऊस वाढेल तसा आवाज वाढतो. यावर काही पर्याय करू शकतो का?

2
आवाज कां येतो हे सांगतो, त्यावरुन पर्याय काय हे कळेल.

आघात (Impulse):- पाण्याचा थेंब पत्र्यावर ज्या क्षणी पडतो त्याचक्षणी त्याची गती बदलते आणि दिशाबदल होतो, ज्याकारणांने पत्र्यावर आघात होतो. सहाजिकच पत्रा थोडासा वाकतो आणि थरथरतो. हे थरथरणे म्हणजे "आवाजाची" उत्पत्ती.

आघात कमी कसा करता येईल?

पत्रा पुर्ण 'आडवा' असेल तर जास्तीतजास्त आघात होतो. पत्र्याचा 'उतार' (slope) वाढविला की आघाताची तिव्रता कमी, आवाज कमी. पत्रा जितका जाड तितके त्याचे थरथरणे कमी. अँकरींग स्क्रू/बोल्टचे (j bolt) पिच (pitch) कमी ठेवण्यानेही फायदा होईल.


चित्रसंदर्भ: आंतरजाल

थोडक्यात सांंगायचे तर हे थोडं खर्चिक प्रकरण आहे.

अलिकडे temporary शेडकरता वगैरे किंमत कमी ठेवण्यासाठी पत्र्याचा corrugated पॅटर्न च्या ऐवजी 'semi corrugated' पॅटर्न वापरण्याकडे आणि कमी उतार ठेवण्याकडे कल संभवतो.



ता.क.: वार्‍यातही ह्या पत्र्यांचा फडफडाट होतो तो वेगळाच.😊😅. पत्रे घालुन झाले असतील तर एक जुगाड 😅 सुचवितो: प्रत्येक पत्र्यावर जड वस्तू जसे की विट, फरशी ठेवून आवाज suppress करता येईल पण इतर समस्याही उदभवण्याची शक्यता आहे.
उत्तर लिहिले · 25/12/2021
कर्म · 121725

Related Questions

आकाशात वीज चमकते तेव्हा अगोदर प्रकाश दिसतो का आवाज येतो?
व्यायाम करतना हाडांचा कटकट असा आवाज येतो तर ते कशाचे लक्षण असू शकते? त्यासाठी उपाय काय?
पाऊस आल्यावर ढगातून आवाज येतो, तो काशाचा आणि का येतो?
आपल्याला कुजबुज कधी ऐकू येते?