वाहने

वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी उत्तर?

1 उत्तर
1 answers

वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी उत्तर?

2
घाई- गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी स्वत:हून वाहनांची काळजी आणि रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालविण्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. गाडी चालविताना चालकाने या सूचनांचे पालन केल्यास फायदेशीर ठरतील:
 
- पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा.
- आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा.
- मोठी वाहने जसे ट्रक किंवा बस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका.
आपल्या पुढे चालणार्‍या वाहनाच्या ब्रेक लाइट वर बारकाईने लक्ष असू द्या.
- दिवसा गाडी चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाइट चालू ठेवा.
- वाहनाचा समोरील काच नेहमी स्वच्छ ठेवा.
- रस्त्यावर ऑइल किंवा चिखल असल्यास तेथून जाणे टाळावे. अश्या ठिकाणी वाहन घसरण्याची भिती असते.
- आणि शेवटलं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडीचा वेग हळुवार ठेवा आणि हेल्मेट किंवा सिटबेल्ट नक्की वापरा.

उत्तर लिहिले · 5/12/2021
कर्म · 800

Related Questions

चीन व रशिया यांच्यातील राजकीय सिमरेषेला के म्हणतात?
दोनचाकीचा वाहन परवाना (लायसन्स) आहे, चारचाकीचे (फोरव्हिलर) काढायचे आहे, मला ते कसे मिळेल?
1 जुनी मारुती व्हेन भंगार (स्क्रैप) मध्ये घेतली आहे तर तीला नोटरी करून घेऊ का? काही अडचण येणार नाही ना?
वाहतूक खर्च म्हणजे काय?
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते हे विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रामधील लेखनावरून स्पष्ट करा?
मोटार म्हणजे काय?
माल वाहून नेणारी अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते?