वेळ
दही खाण्याची आणि ताक पिण्याची कोणती अचूक वेळ आहे?
1 उत्तर
1
answers
दही खाण्याची आणि ताक पिण्याची कोणती अचूक वेळ आहे?
2
Answer link
ताक हे आपल्याकडे जेवणानंतर आवर्जून प्यायलं जातं. ज्याला हिंदीमध्ये छाछ असंही म्हणतात, हे भारतातील एक लोकप्रिय पेय आहे, असं म्हणायलाही हरकत नाही. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दह्याला पर्याय म्हणून ताक वापरता येते. उन्हाळ्यात हे शरीराची उष्णता कमी करून पचनास मदत करते, चयापचय सुधारते आणि शरीराला थंड ठेवते. ताक प्रत्येक वेळी जेवणानंतर घेणे चांगले मानले जाते आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी त्याचे सेवन केले जाऊ शकते - सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री.
पण काही वेळा असंही म्हटलं जातं की, रात्री उशिरा दही किंवा ताक घेऊ नये कारण ते शरीरात कफ वाढवते, ज्यामुळे विविध आजार होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीला रात्री ताक प्यायचे असेल तर ते साखर किंवा मध घालून ते गोड करावे. ताक पिण्याची उतम वेळ म्हणजे नाश्त्याची वेळ आहे, कारण ते पाचक अग्नीमुळे होणार्या विकारांमध्ये मुख्य पाचक म्हणून मदत करते. पचनाशी संबंधित काही समस्या आल्यास सकाळी सर्वप्रथम ताक प्यावे.