पेशवाई

पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' असे का म्हणतात?

1 उत्तर
1 answers

पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' असे का म्हणतात?

4
खूप वर्षांपूर्वी असे वाचले होते की, पेशवे जेवणाच्या बाबतीत अतिशय काटेकोर असत. जसे की प्रत्येक पदार्थांची ताटातील जागा ही ठरलेली असायची. दिवस, वार, सण, उत्सव, जन्म मरण व इतर ठराविक दिवसांसाठी विशिष्ट पदार्थच असायला पाहिजे असा आग्रह होता. पदार्थांची ताटातील जागा चुकल्यास वाढपीला तडकाफडकी जबर शिक्षा होत असे. वर्षभर चंदन किंवा वाळायुक्त पाणी त्यांना पिण्यास लागे.व अजून जेवणाच्या बाबतीत भलत्याच व अनाकलनीय सवयी ह्या पेशव्यांच्या होत्या.

बहुदा इथे ह्याच गोष्टी अपेक्षित असाव्यात.
पेशवाई हि खाण्यामुळे बुडाली' हि म्हण जी रूढ झाली त्याला अशी काही कारणे आहे. याचं अतिरेक झाला उत्तर पेशवाई मध्ये.

पंक्तीत वाढलेल्या ताटांभोवती अत्तर शिंपडले जायचे. उंची वस्त्रे, दागदागिने, महागड्या भेटवस्तू यातच तिजोरी रिकामी होत गेली. काटकसर नावाची गोष्ट औषधालाही उरली नव्हती. वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला होता. उधळपट्टीने तर इतकी परिसीमा गाठली की शेवटी शेवटी पेशवाईतील कारभारी दाण्यापाण्याला महाग झाले. मुळात पेशवाई मध्ये जेवणावळ हा सांकेतिक शब्द आहे जो उत्तर पेशवाई मधील विशेषतः दुसरा बाजीराव काळातील भ्रष्ट कामकाज दर्शवतो.पण यात बहुतेक खरे असले तरी ब्राम्हणांना पैश्यांच्या रूपात दान दक्षिणाही मोठ्या प्रमाणात वाटली जात असे.
रावबाजीच्या शेवटच्या कारकीर्दीत दक्षिणेची रक्कम ८ ते १० लाखांपर्यंत गेली होती.(काही इतिहासकार म्हणतात की इंग्रजांविरुद्ध त्र्यंबक डेंगळे यांनी पेंढाऱ्याची जे बंड केले त्यासाठी हा पैसा जायचा)

जशी नंतर सुबत्ता आली आणि मराठ्यांचा संबंध पूर्ण देशाशी आला तसा त्यामुळे आपली खाद्य संस्कृती मध्ये बदल झाला.
आपल्याकडे चांगल्या पंचपक्वनाचे वर्णन पेशवाई थाट अशा शब्दात केले जाते. कारण पेशवाईत जेवणावळी हा तसा विशेष प्रपंच होता.
पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी लाकडा च्या जागेवर कोळसे वापरले जात. इतकेच नव्हे तर या पंगतींचे भोजन बनविण्यासाठी कंत्राट दिले जात असत. बेतही खासा असे.
केशरी भात, कागदासारख्या पातळ पाटवडया, पुरणपोळी, मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी... पानाच्या बाजूच्या द्रोणात दूध, ताक, दही, द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशव्यांच्याच कालखंडात भोजनप्रसंगी पदार्थ कसे आणि कोठे वाढावे याबद्दलची वाढपाची पद्धत सुरु झाली. जी आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहे. पूर्वी महाराष्ट्रात चू.नि. असा विशेष उल्लेख असायचा. याचा अर्थ चूल निवतठेवा. म्हणजे थंड ठेवा. आज रोजी कोणी घरात चूल म्हणून पेटवू नये. असेही आग्रहाचे निमंत्रण असे.
बाहेरील आक्रमणांचा काय परिणाम झााला हे तपासणे विशेष संशोधनाची बात आहे आणि तसेच महत्वाचे ठरते. मुक्ताबाईने आपल्या बंधुंना मांडे खाऊ घातल्याची कथा सर्वांना माहीत आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सतत लढाया आणि् अस्थिरता यामुळे पारंपरिक खाद्य पदार्थांनाच महत्त्व दिले गेले. सण व परंपरा खाद्यपदार्थांच्या अनुषंगाने सांभाळल्या गेल्या.
पेशवाई मध्ये कोशिंबरीचे 56 हून अधिक प्रकार असे(जुन्या काळी त्याचे पुस्तक पण होते). भाताचे पण असंख्य प्रकार.दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांना १८०३ मध्ये केळीच्या पानावर साग्र संगीत जेऊ घातले होते. सर बॅरी क्लोज पुण्यात इंग्रजांचा रेसिडेंट असताना व्हॅलेन्शिया या इंग्रज अधिकाऱ्याने पुण्याला भेट दिली होती. त्यांच्या बाजीराव साहेबांनी हिराबागेत खास ब्राह्मणी जेवणाची मेजवानी दिली.केळीच्या पानावर डाव्या बाजूला चटणी, लोणचे, पापड, कुरडया, कोशिंबीर, उजव्या बाजूला सात प्रकारच्या भाज्या, मध्यभागी साधा वरण-भात, साखरभात व सुरळी केलेलीपुरणपोळी, शिर्‍याची मूद. पानाबाहेर सार, कढी, आमटी, तूप, खीर अशा पातळ पदार्थांनी भरलेले द्रोण. अशी ह्या थाळीची मांडणी होती. आख्या पुण्यात अश्या जेवणावळींच्या विविधतेने भरलेल्या पंगती रंगात अस
त्यानंतर पेशवाईत मराठी माणसाची जीभ तृप्त होईल अशी भोजनव्यवस्था असल्याचे इतिहास सांगतो. मग इंग्रजांनी दिडशे वर्ष आणि मुघल बहामनी आणि तुर्क असे 690 वर्ष राज्यनंतर भारतीय जीवनावर त्यांचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते. मात्र महाराष्ट्रातील खाद्यजीवन त्यामुळे फारसे प्रभावित झालेले दिसत नाही. महाराष्ट्राने आजही आपली खाद्यपरंपरा टिकवून ठेवली आहे.

२) पेशवाईचे कर्जे

· कर्ज काढून ती फेडण्यात पेशवाई बुडाली अस म्हणतात. कुठल्याही कारणाशिवाय जेवणावळी घातल्या जायच्या असा आरोप काही लोक करतात, पण हे सर्व काही उत्तर पेशवाई मध्ये घडले तेही माधवराव यांच्या मृत्यू नंतर.
पेशव्यांना कर्ज देणारे मोठे मोठे सावकार पण होते.उदाहरणार्थ: विठोबा नाईक रास्ते, श्रीधर पाठक, सीताराम श्रोत्री, रामकृष्णभट वैद्य, अंतोबा भिडे, जिनभट गाडगीळ, बालंभट वैद्य, रघुनाथराव पटवर्धन, सुरुवातीला शिवाजी महाराज ते संभाजी महाराज आणि राजाराम· महाराजांच्या काळात परिस्थिती वेगळी होती. दुसऱ्या राज्यावर विजय मिळविल्यावर झालेल्या तहात खंडणीचे कलम असे. युद्ध झाल्यानंतर शत्रूच्या प्रदेशातील खंडणी तिथल्या तिथेच सर्वच्या सर्व लगेच गोळा करत धावडशीकरासारखा धार्मिक वृत्तीचा स्वतःला मिळालेली दाने आणी देणग्या साठवून पुढे मोठा सावकार बनला. ह्या ब्रम्हेन्द्रस्वामीने पेशव्यांना व इतर सरदारांना लाखो रुपयांची कर्जे दिल्याची पत्रे उपलब्ध आहेत. बाजीरावाने ब्रम्हेन्द्र स्वामींकडून कर्ज घेतले होते. ते दिलेले कर्ज व्याजासहित परत मिळावे म्हणून ब्रम्हेन्द्रस्वामी यांनीबाजीरावाकडे तगादा लावल्याचे पत्र आहे.
· सावकारामार्फत हुंड्याच्या स्वरूपात त्यांची वसुली करण्यात येई. १७५३ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीत मराठ्यांनी दहा लाख नऊशे रुपयांची खंडणी आकारली होती. ह्या खंडणीची रक्कम सातारच्या बारा सावकारांच्या पेढ्यांच्या नावाने गोळा केली गेली होती.ह्या सावकाराच्या कर्जामुळे पेशव्यांना अश्या सावकारांना देऊन कायम खुश ठेवावे लागत असे. एवढेच नव्हे तर ह्या प्रकरणांमुळे पेशव्यांनी सावकारां घरात लग्नही करावी लागले
1.बाळाजी विश्वनाथ पेशव्याची पत्नी राधाबाई ही सावकार बर्वे यांची मुलगी आहे. राधाबाई पेशवे अत्यंत मुत्सद्दी होती. बाकीच्या पेशव्यांची लग्नही सावकार घरात करण्याची प्रयत्न राधा बाई नी केला.
2. पहिली बाजीराव ची बायको काशीबाई हि महादजी कृष्ण जोशी चासकर सावकार यांची मुलगी होती.थोरली नात सून गोपिकाबाई हि भिकाजीपंत शामजी रास्ते गोखले-वाईकर यांची मुलगी होती. ते सावकार होते
3.नानासाहेब पेशव्याची दुसरी बायको राधाबाई हि पैठणच्या नारायणराव वाणवळे सावकारांची मुलगी होती. सावकार सासरेबुवांनी जावई बापु साहेबांसाठी पैठणला मोठा तीन चौकी वाडाही बांधला होता.
4.रघुनाथराव पेशव्याची बायको आनंदीबाई हिचे वडील रघुनाथ महादेव ओक हे हि सावकार होते.
ह्या सगळ्यांचे वडील हे पेशव्यांस कर्ज देत असत आणि पेशवे ह्या सावकारांचे देणे लागत असत.पेशव्यांच्या सोयरिकीमुळे आपल्याला राजाश्रय मिळेल आणि आपली भरभराट होईल अशी विचारसरणी सावकारांची असावी असे दिसते.
जसे बाजीराव पेशव्याला कर्जाने छळले तसेच बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशव्यालाही कर्जाने छळले. अंतस्थ कारभारातील बेबंदशाहीमुळे नानासाहेब पेशव्याचे कर्ज वाढत गेले.आपल्याला पैश्यांची किती गरज आहे हे दाखवून देणारे एक पत्र उपलब्ध आहे. हे पत्र नानासाहेब पेशव्याने मल्हारराव होळकर आणि जयाप्पा शिंदे याना लिहिलेले आहे.
पत्रात म्हंटले आहे, " नालबंदीस तोटा तूर्त दहा लाखाचा आला. तुम्हीही ऐवज न पाठविला. यास्तव जरूर पोटाचे संकटामुळे रसदा घेतल्या. सर्वांपुढे इलाज आहे.पोटापुढे काही इलाज नाही. तो विचार तरी काय लिहावा."
मल्हारराव होळकरांनी नानासाहेब पेशव्याची मोठं मोठी कर्जे फेडली होती. तशी कर्जे जयाप्पा शिंद्यांनीही पेशव्यांची फेडावीत अशी विनंती पत्रे नानासाहेब पेशव्याची आर्थिक गरज किती भयंकर होती हे दर्शवितात.
उत्तर हिंदुस्थानातून चाळीस लाख पाठवून दिले तर बरे होईल; पण असे काही होताना दिसत नाही अशी नानासाहेब पत्रात बोलून दाखवितो.
नानासाहेबावर कर्जाचा बोजा वाढत असतानाच पानिपतचे युद्ध झाले
'जवळचे सगळे पैसे संपले असून नानासाहेब आजून पैसे पाठवा..' असे सांगणारी भाऊसाहेब ची पत्रे अत्यंत वाईट आहेत.बाबूजी नाईक बारामतीकरांसारखे सावकार तर इतके जबरदस्त होते कि पेशव्यांनी वेळेत कर्जफेड केली नाही तर पेशवाईवर हक्क दाखविण्याचे धाडसही ते करून दाखवत असत.

'पेशवे यांचे कालखंड
1707 ते 1740 : 33 वर्ष
पहिल्या बाजीराव ना त्यांच्या वडील बाळाजी या दोघांना उसंत नाही मिळाली ना उत्कृष्ट खाणे आणि पिणे करून मौज करावी. दोघांनी पूर्ण भारतभर आपल्या पराक्रमाचे डंके गाजवले.
1740 ते 176133 वर्ष स्थिरतेची गेली असली तरी शाहू महाराजांचे (संभाजी पुत्र) यांचे निधन 1749 ला झाले म्हणजे आम्ही 9 वर्ष हे शाहू महाराजांनी बऱ्यापैकी नियंत्रित परिस्थित होती. त्यात सुद्धा पेशेवे नी खाण्यात गेली असे आपण नाही म्हणू शकत.1749 ते 1761 म्हणजे पनिपतच्या युद्धापर्यंत नासाहेब पेशवे बऱ्यापैकी स्थिरावले. सांगोला तह झाला 1755 ला पेशवे हे अनभिषिक्त राजे झाले आणि भोसले हे नाममात्र राहिले. त्याकाळी पुण्याचा विकास झाला.पेशव्याचं महत्त्व वाढले. त्यात शनिवार वाडा वरून पूर्ण भारताची राजकारणाची खलबते होऊ लागली. आधी सातारा पण त्यात असे. पण आता सर्व लक्ष शनिवार वाड्यात स्थिरावली. ठिकठिकणच्या राजांची नवाबाची , फ्रेंच इंग्रज यांचे नजराणे जे आधी भोसले कुटुंब कडे यायची ती आता शनिवार वाड्यावर येऊ लागली. त्यात नाटक शाळा आणि बाकीच्या गोष्टी आल्या. प्रचंड लोक आल्यामुळे लोकांच्या जेवणाच्या पंगती उठू लागला. त्यामुळे खाणे पिंने चे जिन्नसे आणि सर्व प्रकार वाढू लागले.
सावकार कडून घेऊन कर्ज वाढीस लागले. 1757 ते 1758 पर्यंत राघोबा दादांनी आपल्या मराठ्यांचे घोड्याचे टापा वाजवत अटकेपार झेंडे लावले. बंगाल मध्ये राघोजी भोसले आणि भास्कर पंडित ने प्रचंड लूट केली. अवघं शी संबंध चांगलेच होते. दिल्ली मराठ्यांच्य इशाऱ्यावर चालत होती. पहिल्या बाजीराव कडून मार खाल्ले निझाम आपल्या वारसा मध्ये संघर्ष होत होता. टिपू आणि हैदर च उदय झाला नव्हता. राजस्थान माळवा हे शिंदे होळकर फौजांनी जेरीस आणले होते. राघोबा द्दनी जी अब्दालीच्या मुलाला अफगाण पर्यंत हकालासून दिले होते. लाहोर कराची बलुचिस्तान पाकिस्तान बांगलादेश आताचा पूर्ण भारत मराठ्यांच्य तालावर नाचत होता. त्यामुळे सत्तेत स्थिरता आलेली आणि ऐश आराम आणि खानावळी पंगत होणे साहजिक होते.
1761 ते 1772
1761 ला पानिपत झाले आणि सर्व धुळीस मिळाले. माधवराव पेशवे झाले. नि मूळचा ऐयाशी स्वभाव नसलेले माधवराव चे राजकारण कडे दुर्लक्ष झाले . आणि पूजा व्रत कैवाल्याकडे लक्ष होते. न्यायाधीश रामशास्त्री नी त्यांना खडासावल्यानंतर ते राजकारणाकडे पुन्हा लक्ष दिले. खूप कमी वयामध्ये झालेला हा पेशवा पूजा व्रत कैवल्य तर सोडा पान आपल्या आई आणि काकांचा सल्ला झुगारून स्वतः राजकारण करू लागला. माणसाची पारीख असलेला हा पेशवा शिवाजी महाराजांच्या आणि शंभू महाराजां च खऱ्या अर्थाने वारसा चालवत होता असे म्हणालो तर नवल नाही. थोडासा अफरातफरकेल्याच्या आरोपावरून त्यांनी गांगोबा चंद्रचूड जे होळकरांचे मुख्य सचिव होते त्यांना वेताच्या छडीने 100 फटाके मारले. एका प्रतिष्ठित सरदाराने त्यांच्या मुलांना सांगितले की माधवराव च्या पुढे विनाकारण पुढे पुढे करू नका. त्यांना माणसाची जान आहे. त्यांना शंका आली तर तुमची खैर नाही. आपल्या कामाशी काम ठेवा . कामाचा मोठा आव आणू नका.
माधवरावांनी पेशवाई मध्ये कोणत्याही प्रकारचा खेलखंडोबा केला नाही. राघोबादादा मात्र त्यांच्या छंदीपणा चालू ठेवला पण मधवमवरावांचे त्यांचे वर पूर्ण नियंत्रण होते. माधवरावांनी महादजी अहिल्याबाई नाना फडणवीस पुढे आणले. आपल्या काकाच्या गटतले असून साडेतीन शहाणे पैकी सखाराम बोकील यांना राज्य हितासाठी उपयोगी पडेल अशी वागणूक आणि प्रयत्न केले .त्याचा फायदा मराठा साम्राज्याला नंतर बार भाई वेळीस झाला.
1771 ते 1798
पहिल्यांदा नारायणराव पेशवे नंतर काहीकाळ राघोबादादा नंतर बरभाई मग सवाई माधवराव पेशवे या कळत मराठा साम्राज्य अंतर्गत कारणा झालेला
1798 ते 1818
दुसऱ्या बाजीराव च्या काळात नाना फडणवीसांचा अंकुश नव्हता त्यामुळे पेशवाई मधील झालेली सर्व दुकृत्ये दुसरा बाजीरावपेशव्यांनी केली. नाच गाणे, पंगती, उधळपट्टी, असे अनेक प्रकार झाले

संदर्भ : -
१) वैद्य दप्तर - खंड २ व ४
 २) मराठी रियासत - खंड ८
 ३) पुरंदरे दप्तर - खंड ३
 ४) मराठी दप्तर - भाग दुसरा
 ५) काव्येतिहास संग्रह पत्रे व यादी
उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121725

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
बाजीरावांचा मृत्यू कोठे झालं?
पुण्यातील शनिवार वाडा कोणी बांधला?